अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन दि. ५ ते ८ फेब्रुवारी २०२१
संपर्क :- ९१३००९१६२१/२२/२३/२४/२५
प्रतिनिधी/ मुंबई
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने शेती उत्पन्नात व उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होण्याच्या दिशेने कृषी क्षेत्राची वाटचाल सुरु असून, याकामी राज्यातील कृषी महोत्सवाचे योगदान महत्वपूर्ण आहे. मार्च महिन्यात लागू झालेले लॉकडाऊन त्यानंतर सुरु झालेला कोरोना विषाणूचा प्रकोप यामुळे बरेचसे कार्यक्रम शासनाने बंद केले होते. कोरोना काळात फक्त शेतीचा जीडीपी हा इतरांच्या तुलनेत सरस होता. त्यामुळे सरकारला कृषी क्षेत्राकडे कानाडोळा करून चालणार नव्हते. त्यामुळे सरकारने आता कृषी संबंधित निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. देश आता अनलॉकच्या प्रक्रियेतून जात असतांना आता राज्यातील शेतकऱ्यांना महत्वपूर्ण असे कृषी महोत्सव घेण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या १६ सप्टेंबर च्या बैठकीत राज्यात कृषी महोत्सव योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. कृषी महोत्सव हा ५ दिवसच राहणार असून कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यास चालू वर्षी अन्यथा पुढील वर्षी आत्मा नियामक मंडळाच्या मार्फत हे महोत्सव आयोजित केले जातील.
या महोत्सावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतमाल थेटपणे ग्राहकांना विक्री करता येतो, त्याचप्रमाणे विविध कृषी संशोधन केंद्र व कृषी विद्यापीठ यांना आधुनिक शेतीची माहिती लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे शक्य होते. त्यामुळे शेतकरी वर्गासाठी हे महोत्सव म्हणजे जणू कृषीपंढरीच ठरते.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन दि. ५ ते ८ फेब्रुवारी २०२१
संपर्क :- ९१३००९१६२१/२२/२३/२४/२५