• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पावनखिंड भाग – 10 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Team Agroworld by Team Agroworld
December 26, 2020
in इतर
0
पावनखिंड भाग – 5  बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

राजे फुलाजींसह चालत होते. कोवळ्या सूर्यकिरणांत उजळला जाणारा किल्ला पाहत होते. ठायी ठायी धारातीर्थी पडलेल्या वीरांभोवती मूक अश्रू ढाळत बसलेल्या मावळ्यांच्याकडं राजांचं लक्ष जात होतं. ते दृश्य पाहून राजांचं मन विषण्ण बनलं होतं.
‘बाजी, आपापसांतल्या कलहात आपली गुणी माणसं कामी येणं यासारखं दुःख नाही. जगदंबेची इच्छा!’ राजांनी स्वतःला सावरलं. ते म्हणाले, ‘बाजी! तुम्ही, फुलाजी, आबाजी जखमी आहात. प्रथम त्या जखमांकडं लक्ष द्या.’
‘आपण वाड्यात चलावं.’
‘नाही, बाजी! तिथं आम्ही आता जाणं योग्य होणार नाही. ती मंडळी शोकाकुल आहेत. आम्ही काही काळ इथं कुठंतरी थांबू आणि परत जाऊ.’
‘एक विनंती आहे.’
‘बोला.’


‘आपण आमच्या वास्तव्यस्थानी चलावं.’ फुलाजींनी विनंती केली.
‘चला.’
राजांनी फुलाजींच्या घरी जाताच आपल्या वीरांची चौकशी केली. जखमींना औषधोपचार करवले.
राजे म्हणाले,
‘बाजी, आबाजी, फुलाजी, आता तुमची पाळी. अंगरखे उतरा. जखमांची काळजी घ्यायला हवी.’
‘आपण गेल्यावर…’ बाजी म्हणाले.
नकारार्थी मान हलवीत राजे म्हणाले,
‘ते चालणार नाही. तुम्हाला आता उसंत नाही. पडलेल्या वीरांची विल्हे लावायला हवी. इथ वैद्य आहेत ना?’
फुलाजी म्हणाले,
‘वैद्य कशाला? जुनं तूप लावलं, की झालं. दोन दिवसांत जखमांवर खपली धरेल.’
‘तसं करा.’
जुनं तूप म्हणताच आबाजींचा चेहरा गोरामोरा झाला. ते म्हणाले,
‘राजे s s’
राजे हसून म्हणाले,
‘ते चालणार नाही.’
सेवकांनी थाळीतून जुनं तूप आणलं.
तिघांनी आपले अंगरखे काढले.
राजांनी तिघांच्या जखमा पाहिल्या. जखमा फार खोल नव्हत्या.


आबाजीच्या जवळ सेवक आले. आबाजीला घाम फुटला होता. सेवक जखमांवर तूप भरू लागले. जुन्या तुपाची आग शरीरात भिनत होती. राजांच्या अस्तित्वामुळं आबाजीला ओरडता येत नव्हतं, पण होणारा दाह तोंडावर प्रगटत होता.
राजांनी विचारलं,
‘आबाजी, येवढा त्रास होतो?’
डोळ्यांत पाणी भरलेला तरुण आबाजी म्हणाला,
‘महाराज, खरं सांगू? लढताना मेलेलं परवडतं; पण हे जुनं तूप नको!’
राजे हसले.
आबाजीच्या जखमा भरून होताच बाजींच्याकडं सेवक गेले.
बाजींच्या दंडावर एक जखम खोलवर उतरली होती. सेवक त्या जखमेत तूप भरत होते. पण बाजींचा चेहरा शांत होता. त्यावर वेदनेची थोडीही जाणीव दिसत नव्हती.
राजांनी आश्चर्यानं विचारलं,
‘बाजी, त्रास होत नाही?’
‘राजे, त्रास कसला? ज्याला वार झेलण्याची सवय असते, त्याला वेदनेचा सराव असायला हवा!’
‘व्वा ss!’ राजे प्रसन्नपणे म्हणाले, ‘काय सुरेख जबाब दिलात! आम्ही जरूर हा ध्यानी ठेवू.’
तिघांचे औषधोपचार झाल्यानंतर राजे उठले.
‘आम्ही आता चलतो. बाजी, रोहिडा बांदल देशमुखांच्याच ताब्यात राहील. आता तुम्ही आमचे. तुम्ही गडाची जोखीम घ्या. आम्ही आमच्याबरोबर आमची शिबंदी घेऊन जात आहो.’
‘पुरी?’ फुलाजींनी विचारलं.
‘हो! आमचा एकही माणूस या गडावर राहणार नाही. जेव्हा कोणी आपले म्हणून आम्हाला भिडतात, तेव्हा आमच्या मनात शंका नसते. बाजी, गड सांभाळा.’
राजांच्या त्या निर्णयानं बाजी-फुलाजी थक्क झाले होते.
राजे गड उतरले. आपल्या शिबंदीला आज्ञा दिली.
बाजींचा निरोप घेत असता बाजी म्हणाले,


‘राजे, वाटेवरच आमचं सिंद आहे. घरी पायधूळ झाडलीत, तर…’
‘नाही, बाजी! तो आग्रह आता धरू नका. कृष्णाजी बांदलांचं आणि वीरांचं क्रियाकर्म पार पडू दे. नंतर केव्हाही आम्हाला बोलवा. आम्ही आनंदानं आपल्या घरी येऊ. त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहो.’
बाजींचा निरोप घेऊन राजे स्वार झाले आणि आपल्या अश्वदळासह राजगडाच्या दिशेनं दौडू लागले.
भरल्या नजरेनं बाजी-फुलाजी दूर जाणाऱ्या अश्वपथकाकडे पाहत होते.
सौजन्य :- सर्व क्रमशः लेख ( श्री. सागर पाटील – सोशल मिडिया ) 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अश्वदळआबाजीकृष्णाजींगडघोरपडेजगदंबजय भवानीतानाजीपट्टाफुलाजींमोरेशिवाजी राजेसावंतहर हर महादेव
Previous Post

सरपंच आणि सदस्यपदाच्या लिलावाप्रकरणी उमराणे व खोंडामळी ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द -यू. पी. एस. मदान

Next Post

फुफ्फुसांचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी या गोष्टी ठेवा लक्षात

Next Post
फुफ्फुसांचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी या गोष्टी ठेवा लक्षात

फुफ्फुसांचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी या गोष्टी ठेवा लक्षात

ताज्या बातम्या

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.