• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पावनखिंड भाग – ३८ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Team Agroworld by Team Agroworld
January 23, 2021
in इतर
0
इतिहास  गौरवशाली स्वराज्याचा – पावनखिंड भाग – १  बाजी प्रभू
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

सिद्दी जौहर हा निष्णात सेनापती. जेव्हा त्यानं पन्हाळगड पाहिला, तेव्हाच त्याला गडाच्या मजबुतीची कल्पना आली होती. त्यानं राजापूरच्या इंग्रजांकडं मदत मागण्यासाठी आपली माणसं पाठविली होती. पन्हाळगडावरून झालेल्या तोफांच्या माऱ्यानं तो अधिक संतापला होता. येणाऱ्या पावसाळ्याची त्याला भीती होती. मुंगीलाही वाव मिळू नये, असा वेढा त्यानं घातला होता.
सायंकाळच्या वेळी वाड्यासमोर राजांचा विश्वास घोडा खोगीर चढवून तयार होता. त्याखेरीज पाच-सहा घोडी खोगीरांनी सज्ज होती.
राजे सदरेवर आले. साऱ्यांनी मुजरे केले.
‘बाजी, त्र्यंबकजी! चला.’
राजे स्वार झाले. राजांचं पथक गडकोटाची पाहणी करीत गडावर फिरत होतं. राजदिंडी, पुसाटीचा बुरूज, तीन दरवाजा, चार दरवाजा एवढी चक्कर घेऊन राजे वाड्यावरून सदर महालात आले.
दोन प्रहरी राजांना जागं करण्यात आलं.
‘काय झालं?’ राजांनी विचारलं.


‘सदरेवर किल्लेदार आल्यात जी!’ सेवकानं सांगितलं.
राजे सदरेवर आले, तेव्हा चिंतातूर त्र्यंबकजी आणि बाजी उभे होते. त्यांच्या मागं यशवंत जगदाळे उभा होता.
‘काय झालं, त्र्यंबकजी!’ राजांनी विचारलं.
‘राजे! टोपीकरांनी घात केला. ते सिद्दीला मिळाले.’
‘खोटं!’ राजे म्हणाले.
‘नाही, राजे! अनुस्कुरा वाटेनं टोपीकर दोन लांब पल्ल्याच्या तोफा घेऊन सिद्दीच्या तळावर हजर झाले आहेत.’
राजांचा संताप उफाळला. कधीही संयम न सोडणारे राजे म्हणाले,
‘ही हिंमत! दारोजीनं राजापूरवर स्वारी केली. या गोऱ्या माकडांना पकडलं. भीक मागत आमच्या दाराशी आले. आदिलशाहीला मदत करणार नाही, असा तह करून आपला जीव वाचवून गेले. बेइमान! करार मोडून आज आमच्यावर चालून येतात?’
राजे क्षणभर थांबले. दीर्घ श्वास त्यांनी घेतला. आणि खिन्नपणे ते हसले—
‘बाजी, ही टोपीकरांची जात फार हुशार. सातासमुद्रांवरून आलेत ना! बोलून चालून व्यापारी. ते हा सौदा सोडतील कसा? शास्ताखान चालून येतो, हे त्यांना माहीत असणार. सिद्दीच्या वेढ्यात आम्ही पुरे अडकलो आहो, हे ते जाणतात. या दुहेरी संकटातून आम्ही वाचणार नाही, हा त्यांचा अंदाज! ठीक आहे. जगदंबेच्या कृपेनं आम्ही या संकटातून तरलो, तर त्या टोपीकरांना जरूर धडा शिकवू.’
‘त्यांच्या जवळ दूरवरचं पाहण्याचं यंत्र आहे, म्हणे!’ त्र्यंबकजी म्हणाले.
‘असेल! त्यांना दूरवरचं दिसतं. आम्हांला दिसत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. बाजी, आम्हांला भीती ना आदिलशाहीची, ना दिल्ली तख्ताची. खरी भीती वाटते, ती या टोपीकरांची. सातासमुद्रांवरून आलेले हे व्यापारी नाहीत. त्यांच्या लांब पल्ल्याच्या तोफा, बंदुका त्यांसह ते येतात, ते का व्यापारासाठी! एक ना एक दिवस, हेच टोपीवाले आसेतुहिमालय कबज्यात घेऊन मोकळे नाही झाले, तर नशीब!’
राजांनी थोडी उसंत घेतली. ते बाजी, त्र्यंबकजींकडं वळून म्हणाले,
‘कठीण वेळ आहे खरं! आपला तोफखाना सज्ज ठेवा. पण ही बातमी आणली कुणी?’
बाजींनी सांगितलं,
‘यशवंत जगदाळे घेऊन आला.’
राजांनी विचारलं,
‘यशवंता गडाखाली उतरला होता?’
‘जी!’
राजांची नजर यशवंतावर खिळली. कठोर शब्द उमटले,
‘यशवंत! हे फिरतीचे दिवस नाहीत. शत्रूगोटाभोवती फिरणं हे धोक्याचं असतं, हे तुम्हांला कळायला हवं होतं. बाजी, आमच्या आज्ञेखेरीज कोणीही गडाखाली उतरत नाही, याची दखल घ्या. आम्हांला थोडा एकांत हवा. आम्ही जातो.’
राजे गेले. आणि पडल्या चेहऱ्याच्या यशवंताकडं पाहत बाजींनी विचारलं,
‘मिळाली शाबासकी? पण, यशवंता, तू गडाखाली गेलाच कशाला?’
यशवंतानं आवंढा गिळला.’
‘सांग ना!’ बाजी म्हणाले.


‘मैतरांनी पैज लावली.’
‘कसली पैज?’
‘खालच्या छावनीवर फेरफटका करू ईल, त्याला…’
यशवंत अडखळलेला पहाताच बाजींनी विचारलं,
‘कसली पैज?’
‘कोंबड्याची! जिंकल, तर त्यांनी कोंबडं द्याच. न्हायतर मी…’
‘छान!’ बाजी हसले. ‘इकडे राजांनी मेजवान्या बंद केल्या आणि तिकडं कोंबड्यांची पैज लावता! आणि एवढा जीव स्वस्त केव्हापासून झाला?’
सारे हसले.
बाजी यशवंतासह सदरेबाहेर पडले.

रात्री बाजी, फुलाजी आपल्या निवासात बोलत बसले होते. फुलाजींनी बाजींची चिंता ओळखली होती. आपल्या चिलमीचा बार फुंकत फुलाजी म्हणाले,
‘बाजी, गावावर पाडव्याचा सण जोरात साजरा झाला. पण तू नव्हतास, त्याचं दोन पोरींना फार वाईट वाटलं.’
‘देवीची पालखी गेली ना?’ बाजींनी विचारलं.
‘त्यात काहीही कमी पडलं नाही.’
‘बरं झालं! पण, दादा, आज राजे उदास होते, हे ध्यानी आलं?’
‘होय! राजे कधी नाही ते घोरात दिसले. ते गोरे आले नसते, तर…’
‘दादा, माझ्या मनात एक विचार आहे. उद्या आपली बांदल फौज घेऊन गडाखाली उतरायचं.’
‘राजांना न विचारता?’
‘हां! आणि त्या टोपीकरांच्या दोन्ही तोफा निकामी करून यायचं.’
‘सिद्दीचा वेढा एवढा सोपा वाटला?’ फुलाजींनी चिलमीचा धूर सोडत विचारलं.
‘लई तर काय होईल? मरू एवढंच ना?’ बाजी म्हणाले.
‘तू मरशील. मी मरेन. पण राजे एकटे राहतील, याचा विचार केलास?’
‘म्हणजे?’ बाजींनी विचारलं.
‘त्यांना कोण वाचवणार? नाही, बाजी, हा राजा जपला नाही, तर काही राहणार नाही. या राजावरची नजर हलू न देता त्याला जपायला हवं.’
बाजींच्या डोळ्यांत पाणी तरळलं. त्यांना हुंदका फुटला. डोळे टिपून ते म्हणाले,
‘कोणत्या जन्माचं देणं देतो आहे, कुणास ठाऊक. या राजाचं प्रत्येक पाऊल पाहत असता वाटतं की, याच्यावरून जीव ओवाळून टाकावा! त्याच्या रूपात हरवून जावं! दादा, हा माणूस जगला नाही, तर काही होणार नाही. आमचा मुलूख, आमची माणसं अब्रूनं जगणार नाहीत.’
बाजींना काही सुचत नव्हतं. ते उठले आणि घराबाहेर पडले.
सर्वत्र काळोख पसरला होता. तटावरून गस्तकऱ्यांच्या दिवट्या फिरत होत्या. आवाज उठत होता,
‘हुश्श्यारsss’

🚩क्रमशः🚩
सौजन्य :- सर्व क्रमशः लेख ( श्री. सागर पाटील – सोशल मिडिया ) 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: जय भवानीपन्हाळगडपावनखिंडफाजलबडेखान व रुस्तुमेजमांबाजी प्रभूराजेसिद्दी जौहरहर हर महादेव
Previous Post

पावनखिंड भाग – ३७ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post

जुन्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा मार्चनंतर चालणार नाहीत, RBI ची माहिती

Next Post
जुन्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा मार्चनंतर चालणार नाहीत, RBI ची माहिती

जुन्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा मार्चनंतर चालणार नाहीत, RBI ची माहिती

ताज्या बातम्या

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.