• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पावनखिंड भाग – ३१ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Team Agroworld by Team Agroworld
January 16, 2021
in इतर
0
पावनखिंड भाग – 5  बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

‘तो आप भागकर आये!’
चिकाच्या पडाद्यातून संतप्त आवाज दरबारात उमटला.
आदिलशाहीचा खडा दरबार भरला होता. रुजाम्याच्या गालिच्यांनी दरबाराची जमीन आच्छादली होती. मोतीलगांनी आणि नामांकित रत्नांनी तख्ताचा चांदवा भरलेला होता.भारी वस्त्रांनी तख्ताची बैठक सजली होती. कोवळ्या वयाचा बादशहा त्यावर बसला होता. धूपाचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. तख्ताच्या उजव्या बाजूला चिकाचा पडदा सोडला होता. त्याकडं नजर वळवण्याचीही कुणाला हिंमत नव्हती. दरबाराचे खासे सरदार हात बांधून आदबीनं उभे होते. शिवाजीकडून पराभूत होऊन आलेले फाजलखान आणि रुस्तुमेजमा अधोवदन उभे होते. बडी बेगम त्यांची हजेरी घेत होती. भर दरबारी बेगमच्या शिव्याशापाच्या बरसातीनं दोघेही जर्जर झाले होते.
चिकाच्या पडद्याआड संतप्त झालेली बडी बेगम त्या दोघांना खाऊ, की गिळू, या नजरेनं पाहत होती. तीचा आवाज उमटला.
‘फाजलखान, रुस्तुमेजमा…’


‘जी, बडी बेगमसाहेबाss’ फाजलखान थरथरत म्हणाला.
‘हम पूछते है, तो आप भागकर आये!’ बेगमेनं विचारलं.
‘अर्ज आहे. आम्ही खूप शिकस्तss’
‘शिकस्त! कसली? पळून येण्याची? फौजेची बरबादी केलीत. त्याऐवजी त्या मैदानात मेला का नाहीत?’ बेगमेनं वजिरांना सवाल केला, ‘फर्जंद शहाजीराजे अजून दरबारी हजर का झाले नाहीत?’
वजिरानं मान झुकवली. त्यानं सांगितलं,
‘बेगमसाहेबा, फर्जंद शहाजीराजे दरबारात येत आहेत.’
साऱ्यांच्या नजरा दरबाराच्या प्रवेशद्वाराशी खिळल्या. शहाजीराजांनी मस्तकी राजपूत पगडी परिधान केली होती. पगडीवरचा रत्नखचित शिरपेच झगमगत होता. निळाभोर, जरीकलाबूत केलेला रेशमी अंगरखा आणि पायी चुणीदार सुरवार हा त्यांचा वेष होता. रुंद कपाळावर शिवगंध रेखाटलं होतं. दरबार निरखीत, दमदार पावलं टाकीत ते दरबारात येत होते. चिंतेचा लवलेशही त्यांच्या मुखावर दिसत नव्हता.
तख्ताधीश बादशहाला शहाजीराजांनी त्रिवार मुजरा केला. नंतर त्यांची दृष्टी चिकाच्या पडद्याकडं वळली. शहाजी राजांनी परत मुजरे केले आणि ते हात बांधून उभे राहिले.
‘फर्जंद शहाजी राजे! आम्ही तुम्हांला का फर्मावलं, माहीत आहे?’
‘जी, नाहीं!’ शहाजीराजे म्हणाले.
‘तुमच्या त्या शिवानं आमच्या खिलाफ बगावत केली. अफजलखान माहमदशाहीची दगा करून कत्तल केली. आज या घडीला तो आमचा मुलूख लुटतो आहे.’
‘यात माझा कसूर?’
‘कसूर एकच! तो तुमचा मुलगा आहे. त्याची जबाबदारी तुमची आहे.’
‘आमची?’
‘हो, तुमची! दरबारला शक आहे.’
‘कसला?’
‘दरबारला शक आहे, तुमची त्या मक्कार शिवाला दिलचस्पी आहे.’
‘असं कोण म्हणतं?’ शहाजी राजांचा करडा सवाल दरबारात उमटला.
‘सारा दरबार म्हणतो!’ चिकाच्या पडद्याआडून तेवढाच खंबीर आवाज आला.
‘बेअदबीची माफी असावी, बेगमसाहेबा.’ शहाजीराजे साऱ्या दरबारावरून नजर फिरवीत म्हणाले. ‘दरबार म्हणजे हेच ना? हे फाजलखान! बाप मेला, तर त्याची लाश कुठं पडली, याची चौकशी न करता पळून आले. तो वीर अफजल, त्यानं आपल्या इमानापायी आपली जान कुर्बान केली. पण हे बाजारी भटीये जीव संभाळून पळत आले. बेगमसाहेबा, माझा सवाल आहे, शिवाजीशी लढत देत असता यातला एकही कारीगर का झाला नाही?’


शहाजी राजांच्या भाषणानं उफाळलेल्या फाजलखानानं आपल्या तलवारीच्या मुठीवर हात ठेवला.
त्याच्याकडं एक तुच्छतेचा दृष्टीक्षेप टाकून शहाजीराजे म्हणाले.
‘फाजलखान, त्या मुठीवरचा हात काढा! हा पराक्रम जावळीत दाखवला असता, तर बरं झालं असतं.’
‘फर्जंद!’ बेगमेचा आवाज उमटला.
‘जी, बेगमसाहेबाs’
‘जुबाँपर पाबंदी रख्खो, राजे! आमच्या दरबाराचा शक घेण्याआधी तुमच्या इमानाची साक्ष आम्हांला हवी.’
‘साक्ष! आमच्या इमानाची!! आपण विचारता’ शहाजी राजांना संताप आवरत नव्हता, ‘बेसावध असता अफजलखानांनी आम्हांला, आमचा काही कसूर नसता पकडलं. या विजापुरातून आमची धिंड काढली. आम्हांला भिंतीत चिणून मारण्याची धमकी दिली. त्या वेळी आमची आबरू राखायला दरबार आला होता? आमचा थोरला मुलगा याच अफजलखानांनी कनकगिरीच्या लढाईत संगती नेला आणि त्याचा वध झाला, म्हणून मी कधी दरबारी तक्रार केली होती? बेगमसाहेबा, विजापूरपासून तंजावरपावेतो आपली दौलत मी वाढवली. हुकमत आणि वसूल यात कधी अंतर पडू दिलं नाही. माफ करा, बेगमसाहेबा! नजर वर करून बोलतो. आम्ही एवढं सहन करूनही कधी इमान सोडलं नाही. मनात आणलं असतं, तर तेव्हाच आमच्या मुलखात आम्ही गेलो असतो. दिल्लीच्या सेवेला रुजू झालो असतो. आपला शक नेहमी आमच्यावर राहिला, पण आम्ही कधी गयारी केली नाही. केली असलीच, तर ती तुमच्या रुस्तुमेजमानं!’
भर दरबारी शहाजीराजांच ते धिटाईचं बोलणं ऐकून सारे अवाक् होते. रुस्तुमेजमा बेभान होऊन ओरडला,
‘हम् ये बरदाश्त नहीं करेंगे! कभी नहीं!’
‘खामोश!’ शहाजीराजे बोलले, ‘कुणाला सांगता हे? शिवाजी आणि तुमची दिलचस्पी दरबारला माहीत नाही, असं का वाटतं? शाही दौलतीवर ऐशआराम करण्याची तुमची आदत! तुम्ही प्राणपणानं लढाल कशाला?’
बडी बेगमेला तो सारा प्रकार अकल्पित होता. शहाजीराजे दरबारी असे उफाळतील, असं कधी तिला वाटलं नव्हतं. ती म्हणाली,
‘फर्जंद शहाजीराजे, आम्ही आपला संताप समजतो. आम्ही बेचैन आहोत.’
‘ही आपली कृपा आहे, बेगमसाहेबा! त्याबद्दल आम्ही आपले शुक्रगुजार आहोत. गेल्या कैक वर्षांत मी त्या मुलाचं तोंडही पाहिलं नाही. त्यानं आमची बारा मावळची जहागीर बळकावली आहे. माझा त्याच्याशी काही रिश्ता राहिला नाही.’
‘मग आपणच ही मोहीम का घेत नाही?’ रुस्तुमेजम्यानं उसन्या अवसानानं विचारलं.
‘जरूर! माझा मुलगा झाला, म्हणून मी मागे सरेन, असं वाटतं काय?’
‘फर्जंद! आपण शिवाजीवर चालून जाल?’ बेगमेनं विचारलं.
‘आपली आज्ञा आम्ही कधी डावलली नाही. आम्ही जरूर जाऊ. पण आपले हे सरदार आणि त्यांची निष्ठा यांमुळं जर दुर्दैवानं पराभव पत्कारावा लागला, तर आपणच मला दोषी धराल. म्हणाल, मुलाच्या प्रेमापोटी हा फर्जंद शहाजी गद्दार ठरला. आपण हुक्म केलात, तर मी बेंगरुळला जाऊन माझी फौज घेऊन केव्हाही शिवाजीवर चालून जाईन.’
बेगमेनं वजिराकडं पाहिलं आणि ती म्हणाली,
‘दरबार संपला आहे.’
अवघडून बसलेला बादशहा उठला. साऱ्यांचे मुजरे झडले. अल्काबांचे आवाज उठले. बादशहा, बडी बेगम दरबारातून निघून गेली. बादशहाचा दरबार मोकळा पडला होता.

त्या रात्री दिवाण-इ-खास मध्ये बडी बेगमा बसली होती. फाजलखान, रुस्तुमेजमा, सादतखान आणि वजीर एवढेच होते.
‘आणि फर्जंद शहाजीला शिवाजीवर पाठवला, तर?’ बेगमेनं विचारलं.
‘काट्यानं काटा काढल्यासारखा होईल.’ फाजलखान म्हणाला.
‘अर्ज आहे, बेगमसाहेबा!’ रुस्तुमेजमा म्हणाला.
‘बोला, इजाजत.’
किती केलं तरी, रुस्तुमेजम्याचे वडील आणि शहाजीराजे यांचा स्नेह होता. तोच स्नेह शिवाजी आणि रुस्तुमेजम्यामधे टिकला होता. बाप-लेकांनी एकमेकांसमोर वैरी म्हणून उभं राहावं, हे रुस्तुमेजम्याला पटत नव्हतं. तो म्हणाला,
‘बेगमसाहेबा, मला वाटतं, हे करू नये!’
‘का?’ बेगमेनं विचारलं.
‘आज शिवाजीनं पन्हाळगडपर्यंतचा मुलूख काबीज केला आहे. या क्षणी तो मिरजेला वेढा घालून बसला आहे. आपल्या मुलखात त्याच्या फौजा शिरल्या आहेत. अशा वेळी शहाजीराजे आपली फौज घेऊन गेले आणि ते शिवाजीला मिळाले, तर?’
बडी बेगमा विचारात पडली. वैतागून ती म्हणाली,
‘मग तो शिवा विजापुरात यायची वाट बघायची?’
वजीर उस्मानखाँ मान तुकवून म्हणाला,
‘शाही तख्ताला शरणागत आलेले सिद्दी जौहर विजापूरला दाखल झालेले आहेत.’
बडी बेगमेची काळजी दूर झाली. ती आनंदानं म्हणाली,
‘उद्या दरबार भरवा. भर दरबारी आम्ही सिद्दी जौहरला या शिवाजीवर नामजाद करू.’

अदिलशाही दरबारातून सन्मानित झालेला सिद्दी जौहर राजमहालाच्या पायऱ्यांवर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान विलसत होतं. दरबारी मिळालेला शिरपाव त्यानं मस्तकावर धारण केला होता. सन्मानित खिलत पाठीवरून जमिनीवर रुळत होता. बडी बेगमेनं सिद्दी जौहरला शिवाजीवर नामजाद केलं होतं. ‘सलाबतखान’ हा किताब दिला होता. हवी तेवढी फौज, खजिना आणि सरदार घेण्याची त्याला मुभा होती. त्या सन्मानानं भारावलेला सिद्दी महालाच्या पायऱ्या उतरला आणि आपल्या अश्वदळासह छावणीकडं जाऊ लागला.
त्याच रात्री शहाजीराजांच्या वाड्यातून, खलिता घेतलेले दोन घोडेस्वार मिरजेच्या रोखानं रवाना झाले.


🚩क्रमशः🚩
सौजन्य :- सर्व क्रमशः लेख ( श्री. सागर पाटील – सोशल मिडिया ) 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: अफजलखानखराटेगोदाजीजगतापजाधवनेताजी पालकरपांढरेफाजलखानबाजी प्रभूभीमाजीमहाडिकमानाजींयशवंतरुस्तुमवाघविजापूरशिवाजी महाराजसय्यदखानसिदोजी पवारसिद्दीसुभानरावहिरोजी इंगळेहिलाल
Previous Post

आधारकार्डचा गैरवापर होतोय का ? असं तपासून बघू शकता …!

Next Post

कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारी- कोथिंबीर

Next Post
कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारी- कोथिंबीर

कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारी- कोथिंबीर

ताज्या बातम्या

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.