शेतकरी राजाचे प्रमुख धन असणाऱ्या सर्जा-राजाच्या जोडीत शिंगाच्या कर्करोगाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. जनावारांतील शिंगाचा कर्करोग हा रोग कडक उन्हात शेतात काम करण्यासाठी वापरणारे बैल या रोगास जास्त बळी पडतात. गायीमध्ये तुलनेने हा रोग कमी प्रमाणात होतो. तसेच शेळी व मेंढीत या रोगाचे प्रमाण कमी आढळते. पांढरी त्वचा असलेल्या आणि शिंगाची लांबी जास्त असलेल्या बैलांमध्ये शिंगाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आढळून येते. ज्या बैलांचे वय १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा बैलांमध्ये हा आजार प्रामुख्याने आढळून येतो. वय वाढलेल्या बैलांमध्ये हा आजार कदाचित तणावामुळे जास्त प्रमाणात दिसून येतो. खच्चीकरण झालेल्या बैलांमध्ये हा आजार प्रामुख्याने प्रचलित आहे.
ही आहेत कर्करोगाची कारणे व लक्षणे
· शेतात काम करताना प्रखर सूर्यकिरणामधील अतिनील किरणांमुळे शिंगाचा कर्करोग होतो .
· महाराष्ट्रात नेहमी शिंग कोरून रंग देण्याची पद्धत आहे. रंगाने होणाऱ्या चुर्चुरीमुळे शिंगांच्या पेशींची अतिरिक्त वाढ होते व हि वाढ शिंगांचा कर्करोग घडवू शकते.
· काही शेतकरी जनावरांना दोरीने शिंगास बांधुन ठेवतात. दोरीच्या सततच्या घर्षणाने शिंगांच्या जवळील कातडीच्या पेशींची अतिरिक्त वाढ होते. या पेशींमुळे सुद्धा शिंगांचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
·शिंगे आकर्षक दिसण्यासाठी ती साळली जातात त्यामुळे शिंगाला ईजा होते व त्यामुळे हा रोग होतो.
· बरेच विषाणूही या रोगासाठी कारणीभूत असतात.
लक्षणे:- खाणे कमी करणे, दिवसेंदिवस खंगत जाने हि लक्षणे तर दिसतातच पण त्या बरोबर इतर लक्षणे आजाराच्या वेगवेगळ्या टप्प्या मध्ये दिसून येतात.
पहिल्या टप्पा
शिंगाचा डोक्याजवळचा भाग हा गरम व लालसर जाणवतो. जनावरे शिंग सारखे भिंतीला किवा झाडाला घासतात. शिंग समोरून पहिले असता सममितीत म्हणजे दोन्ही बाजूस सारखी दिसुन येत नाही. शिंगाचा तळभाग नरम, गरम व हात लावल्यास वेदना होतात. तसेच ज्या भागाचे शिंग आहे त्या भागाच्या नाकपुडी मधुन रक्तमिश्रित स्त्राव येतो.
दुसरा टप्पा
शिंग एकाबाजूस झुकते. रक्तमिश्रित स्त्राव येण्याचे प्रमाण वाढते. शिंगाच्या तळास जखम दिसुन येते. घन वास असलेला स्त्राव जखमेतून येण्यास सुरवात होते.
तिसरा टप्पा
शिंग झुकते किवा गळून पडते व शिंगाच्या जागेवर लालसर मास येण्यास सुरवात होते. शिंग पूर्णपणे कर्करोग ग्रस्थ पेशी व मांसाने भरून जातो. डोक्यातील सिनुसेस यामध्ये कर्करोगग्रस्थ पेशी जमा होऊन जनावरे आपले डोके कठीण वस्तुवर आपटून घेऊ शकतात.
हे आहेत उपाय:
पहिल्या व दुसर्या टप्प्यातील लक्षणे असणाऱ्या जनावरांची शस्रक्रियेद्वारे तज्ञ पशुवैद्यकाकडून उपचार केल्यास जानावर ठीक होण्याची शक्यता जास्त असते तर तिसऱ्या टप्प्यातील जनावरामध्ये शल्यचिकित्से नंतर गुंतागुंतीची शक्यता जास्त असते. शल्यचिकित्से सोबत केमोथेरपी हि नेहमी लाभदायक ठरते परंतु त्याचे दुष्परिणाम सुद्धा आहेत.
शिंगाचा कर्करोगावर व्हीन्क्रीस्टीसीनसारखी कर्करोग विरोधी औषधे काम करतात असे आढळून आले आहे. शिंगावर शस्त्रक्रिया करून शिंग बुडापासून कर्करोगासहित काढले जाते. या रोगाचा इतर अवयवामध्ये प्रादुर्भाव झाल्यास शस्त्रक्रियेचा फायदा होत नाही. सारखी सारखी जास्त शिंग कोरु नयेत. जनावरे बांधताना सतत प्रखर उन्हात बंधू नयेत. शिंगाना दोरी नाभून जनावरे बांधू नयेत.
सौजन्य :- समाज माध्यम