भारत सरकारने सुरु केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजेनेअंतर्गत शेतकऱ्यांना ६ हजार रु रक्कम तीन टप्प्यात मदत म्हणून मिळणार आहे. हि ६ हजाराची मदत मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना आपला आधारकार्ड क्रमांक नोंदविणे बंधनकारक आहे. हा क्रमांक नोंदविण्यासाठी ३० नोव्हेंबर २०१९ हि नवीन मुदतवाढ देण्यात आली आहे.
बुधवारी मा.पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नवी दिल्ली येथील अर्थविषयक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती केंद्रीय महिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजेनेचा लाभ देशातील पात्र ७ कोटी शेतकऱ्यांना ऑगस्ट २०१९ पर्यंत झाला आहे. यावर्षी अतिवृष्टीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची रब्बीची कामे पाहता हि मुदतवाढ देण्यात आली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ रब्बीच्या पेरणीसाठी होईल.
ज्या शेतकऱ्यांची अजून नोंदणी झाली नाही. ते कोणत्याही CSC, सेतूकेंद्र, संगणक चालकाकडे
अथवा https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus/BeneficiaryStatus.aspx
या वेबसाईटवर स्वत: नोंदणी करू शकतात करू शकता, अथवा आपले नाव यात आहे किंवा नाही ते सुद्धा पडताळणी करू शकतात.
गणेश वाघ
CSC केंद्र चालक, तोंडापूर ,जामनेर