मुंबई : राज्यातून उत्तरेकडे सरकत असलेला पाऊस या आठवड्याअखेर मुक्काम हलवेल, असा अंदाज होता. गेले 3-4 दिवस विदर्भ वगळता राज्यात पावसाचा जोर ओसरून पावसाची थोडीफार उघडीप पाहायला मिळाली होती. मात्र, तो आता पुन्हा येणार आहे, शनिवार, 23 जुलैपासून पुन्हा चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस सुरू होणार आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) हा ताजा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांमध्ये रविवार, सोमवारी राहील जोरदार पाऊस
मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत रविवार आणि सोमवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय, उद्यापासून ते सोमवार, 26 जुलैपर्यंत राज्यात मुंबई प्रदेशातील काही भागासह कोकण, नाशिक आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश धरणेही पूर्ण क्षमतेने भरत आल्याने पाऊस सुरू होताच धरणातून विसर्ग सुरू होण्याची शक्यता असल्याने नदी काठच्या नागरिकांना सावधानता बाळगण्याचे सांगण्यात आले आहे.
लातूर, अकोला, अमरावतीसह 14 जिल्ह्यात यलो ॲलर्ट
हवामान खात्याने शनिवारी व रविवारी हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ‘यलो ॲलर्ट’ जारी केला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवेचा दर्जा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये ‘चांगल्या ते समाधानकारक’ श्रेणीत नोंदवला जात आहे. जाणून घेऊया शुक्रवारी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसे असेल?
उद्या-परवा धुळे, जळगावसह 17 जिल्ह्यात पावसाचा इशारा
शुक्रवारी आणि शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील घाट भागात काही ठिकाणी जोरदार गडगडाट आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. शनिवार आणि रविवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, बीड, परभणी, जालना, औरंगाबाद, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांत पाऊस राहील. राज्यातील सातारा, कोल्हापूर, अहमदनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असली तरी हवामान खात्याने कोणताही इशारा दिलेला नाही.
500 रुपये किलोने विकला जाणारा काळा तांदूळ शेतकऱ्यांना बनवेल करोडपती, जाणून घ्या त्याविषयी सारे काही…
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय होत असल्याने देशभरात अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राजधानी दिल्ली, दिल्लीलगतचा परिसर, पंजाब, राजस्थानात तसेच उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ओडिशा राज्यात रेड ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. हैदराबाद, तेलंगणात यलो ॲलर्ट आहे. दुसरीकडे, गुजरातमध्ये भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तापी नदीवरील उकाई धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.
Meteorology Department IMD issued Heavy Rain Alert from Saturday, 23 July in Maharashtra.
संबधीत बातम्या वाचण्यसाठी येथे क्लिक करा👇
राज्यभरातील धरणांमधील पाणीसाठ्यात गेल्या दोन आठवड्यात दहा टक्क्यांनी वाढ
राज्यात शुक्रवारपर्यंत मुसळधार कायम, “रेड ॲलर्ट” जारी; देशातील 25 राज्यात धुवां”धार”
Comments 2