प्रतिनिधी/पुणे
राज्यातील २७ जिल्ह्यात रेशीम उद्योगासाठी आवश्यक असलेल्या तुतीची लागवड केली जाते. रेशीम शेतीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या तुती पिकाला आत महाराष्ट्र सरकारने कृषी पीक म्हणून मान्यता दिली आहे. या आशयाचा जीआर सोमवारी (दि.११ जानेवारी २०२१) कृषी विभागाने काढला आहे. तुती रेशिमला कृषी विभागाकडून हा दर्जा मिळाल्यामुळे रेशीम शेती करणाऱ्यांना आता कृषी क्षेत्रासाठी लागू असलेल्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे.
महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यात तुती रेशीमची लागवड केली जाते. या पिकामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या अर्थकारणात बदल झाला आहे. परंतु शासनाच्या विविध योजना व अनुदान यांचा लाभ या शेतकऱ्यांना मिळत नव्हता, किंतु आता या सर्वच शेतकऱ्यांना या निर्णयामुळे लाभ होईल. राज्यात तुती व टसर अशा २ प्रकारच्या रेशमाचे उत्पादन घेतले जाते. सहकार व पणन विभागाकडून कृषी उत्पन्न पणन अधिनियमातील तरतुदीनुसार तुतीचा शेती उपजाच्या अनुसूचित समावेश करण्यास मान्यता मिळाली. नियोजन विभागाने तुतीला वृक्षाचा दर्जा दिला आहे.
तुती लागवड उद्योगाचा समावेश वास्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत होता. त्यामुळे शेतीच्या विविध योजनांचा लाभ मिळत नव्हता. या पिकाचा कृषी पिकात समावेश झाल्याने हे सर्व लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे.
कृषी पिकात समावेश करण्याची मागणी सोलापूर सिल्क असोसिएशन व रेशीम उत्पादकांनी तत्कालीन सहकार-वास्रोद्योग मंत्र्यांनी केली होती. आता मान्यता मिळाल्याने तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज, पीक विमा संरक्षण, योजनानिहाय अनुदान, नैसर्गिक आपत्तीत भरपाई व कृषी योजनाच्या लाभाचा मार्ग मोकळा झाला आहे.
[email protected]
Kailash [email protected]