औरंगाबाद – ‘महाडीबीटी’ पोर्टल वर तुषार सिंचन, ठिबक सिंचनसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा होती. पात्र झालेल्या लाभार्थ्यांना हे अनुदान वितरित केले जाणार आहे. त्यासाठी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) काढण्यात आला आहे.
पात्र लाभार्थ्यांना इतके टक्के अनुदान
या योजनेअंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांना जे बहु-भूधारक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी 45 टक्के तर जे अल्पभूधारक आहेत त्यांच्यासाठी 55 टक्के या प्रमाणामध्ये अनुदान दिले जाते. अशा लाभार्थ्यांना केंद्र सरकारमार्फत अनुदानाद्वारे वितरित करण्यात येणारा निधी हा याआधीच मंजूर करण्यात आला होता.
केंद्र व राज्य अनुदान निधीचा हिस्सा सम प्रमाणात
या अनुदानात केंद्र व राज्य या दोघांचाही समप्रमाणामध्ये हिस्सा असतो. राज्य शासनाकडून देखील निधी वितरित करण्यात येतो. तो निधी अद्यापपर्यंत दिला गेला नव्हता. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्याची प्रतीक्षा होती. तर ही प्रतीक्षा आता पूर्ण होणार असून पात्र झालेल्या लाभार्थ्यांना याचे वर्गनिहाय अनुदान दिले जाणार आहे.
राज्याकडून 43 कोटींचे वितरण
राज्य शासनाकडून 43 कोटी 48 लाख रुपये निधीचे वितरण करणे बाकी होते तर तो निधी आता वितरित करण्यात आला आहे. हाच निधी महाडीबीटी पोर्टल द्वारे लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावा अशा सूचना दिनांक 19 जानेवारी 2022 रोजी जाहीर करण्यात आलेल्या जी-आर द्वारे देण्यात आल्या आहेत.
माझा शेतात कमी प्रमाणात उत्पादन होतं आहे माझी शेती खुप छान आहे तरी ही उत्पादन कमी होते