भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्यावतीने फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स (एफआयईओ) व अॅग्रोवर्ल्ड यांच्याद्वारे फक्त जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांसाठी केळी निर्यातीतील संधी, भविष्यात केळी निर्यातीतील व्यवसायात वाढत जाणारी व्याप्ती तसेच जी. आय. टॅगिंग (भौगोलिक मानांकन) चे महत्त्व व फायदे, कृषी निर्यातीसंदर्भात एफआयईओची भूमिका, केळी निर्यात व्यवसाय कसा सुरु करावा व तो कसा यशस्वी करावा या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई येथील तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातून केळी निर्यात करणार्या शेतकर्यांचेही अनुभव कथनाचा लाभ मिळेल. ही एक दिवसीय कार्यशाळा जळगाव येथे 13 नोव्हेंबर (शनिवारी) रोजी डी. पी. डी. सी. हॉल (जिल्हाधिकारी कार्यालय) आयोजित करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा हा देशातील केळीचे आगार आहे. मात्र, उत्पादनाच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यातून अद्यापही केळी निर्यातीस मोठी संधी आहे. ही बाब लक्षात घेऊन व जळगाव जिल्ह्याला केळी निर्यातीच्या दृष्टीकोनातून जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळावे, यासाठीच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेची दिनांक, वेळ व स्थळ -:
दिनांक – शनिवार, 13 नोव्हेंबर 2021
वेळ – सकाळी 9.30 ते दुपारी 4.00
स्थळ – डी. पी. डी. सी. हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
(लेखन साहित्य – पेन, पॅड, फोल्डर, सकाळी चहा – नाष्टा, दुपारी जेवण, सायंकाळी चहा तसेच उपस्थित प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र)
कार्यशाळा मोफत परंतु आगाऊ नाव नोंदणी आवश्यकच…
नाव नोंदणीसाठी संपर्क ः
9130091621 – हेमलता
9130091622 – वैशाली
www.eagroworld.in
Ok
Yes
Nice
Good
Akshay shivar f p c, savda.
I am interested
Export quality
Very important information
I am interested
I want to join the session
कार्यशाळे साठी नाव नोंदणी करायची होती .