नवी दिल्ली : गाई-म्हशींना मीठ खाऊ घातल्याने त्यांची दूध देण्याची क्षमता खरोखरच वाढते का? हा प्रश्न शेतकऱ्यांना अनेकदा पडतो. आज आपण नेमके याविषयी सारे काही सत्य जाणून घेणार आहोत. गाई आणि म्हशींसाठी मीठ हा खरोखर उपयुक्त आहार होऊ शकतो का? तसे तर, लोह, तांबे, जस्त, आयोडीन, मॅंगनीज, मॅग्नेशियम, सेलेनियम यासह सर्व पोषक तत्व मीठामध्ये आढळतात. हे सर्व घटक मानवी शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. पण प्राण्यांसाठीही ते घटक तेव्हढेच उपयुक्त असतात का? याविषयी आम्ही तुम्हाला सारे सांगणार आहोत.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न काही पिकांनी खरोखरच केले दुप्पट!
गायी-म्हशींचाही मीठाअभावी होऊ शकतो मृत्यू
मीठाची कमतरता प्राण्यांसाठी तसेच मानवांसाठीही खूप घातक ठरू शकते. मीठ खाल्ल्याने प्राणी निरोगी राहतात आणि ते त्यांची अनेक रोगांपासून संरक्षण करते. अनेक रोगांदरम्यान, डॉक्टर अनेकदा मीठ वापरण्याची शिफारस करतात. जर तुम्ही पशुपालक शेतकरी असाल, तर मिठाचे सेवन प्राण्यांसाठी किती फायदेशीर आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. प्राणी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तुमच्या गायी आणि म्हशींचाही मीठाअभावी मृत्यू होऊ शकतो.
मिठाच्या सेवनामुळे प्राणी राहतात निरोगी
भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, बरेलीच्या सेंटर फॉर अॅनिमल डिसीज रिसर्च अँड डायग्नोस्टिक्सचे सहसंचालक डॉ. के.पी. सिंग सांगतात की, दुधाळ जनावरांसाठी मिठाचा आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. हे गाई आणि म्हशी दोन्हीमध्ये पचन सुधारते. त्यामुळे जनावरांची भूक वाढते. हे प्राण्यांमध्ये लाळ सोडण्यास मदत करते. ज्यामुळे प्राणी निरोगी राहतात.
मिठाच्या कमतरतेमुळे कमी होते दूध देण्याची क्षमता
अनेकदा गायी आणि म्हशीमधील दूध देण्याची क्षमता कमी झाल्याची तक्रार पशुपालक करतात. हे त्यांच्या शरीरात मीठ कमी झाल्यामुळे असू शकते. अनेकदा पशुवैद्य कमी दूध देणाऱ्या गाई-म्हशींच्या आहारात मीठाचे प्रमाण वाढवण्यास सांगतात. डॉ.के.पी.सिंग असेही सांगतात की, मिठाचे द्रावण दिल्याने जनावरांची दूध उत्पादनाची क्षमता वाढते. याशिवाय दुभत्या जनावरांची दूध देण्याची क्षमता वाढवण्यासाठी त्यांच्या आहारात मीठाचे प्रमाण वाढवले जाते. अनेकदा गायी आणि म्हशींमध्ये मूत्रमार्गाचे आजार होतात. याशिवाय, मिठाच्या कमतरतेमुळे जनावरांची भूकही मंदावते. म्हशींच्या आहारात मिठाचा अभाव असल्यास अनेक आजारांचा धोका असतो. अशा स्थितीत जनावरांना नियमानुसार दररोज मिठाचे द्रावण द्यावे.
If you are a livestock farmer, feeding salt to cow and buffalo will increase the milking capacity. Apart from this, due to lack of salt, the appetite of animals also decreases & there are urinary diseases.
संबधीत बातम्या वाचण्यसाठी येथे क्लिक करा👇
जनावरांमध्ये “लम्पी स्कीन व्हायरस”ची साथ; पशुधनाच्या मृत्यूमुळे शेतकरी अस्वस्थ
जनावरांमध्ये “लम्पी स्कीन व्हायरस”ची साथ; पशुधनाच्या मृत्यूमुळे शेतकरी अस्वस्थ
रोजगार निर्मितीसाठी ; शेळी समूह योजना
पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची घ्यावयाची काळजी
म्हहिस