समुद्र किनारपट्टीवर येणारे हे फळ पठारी तसेच उष्ण वातावरणात जळगावातील शेतकऱ्यांनी गेल्या काही दशकांपासून अतिशय कष्टपूर्वक जोपासले, रुजविले एवढेच नव्हे तर दर्जा तसेच उत्पादकतेतहि देशाचा देशात अव्वल स्थान राखले, मात्र गेल्या काही वर्षापासून केळीवर रोग तसेच किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्यस्थितीत कांदेबाग (आँक्टोंबर- नोव्हेंबर महिन्यात लागवड झालेल्या) बर्याच बागांमध्ये मुखेत्वेकरून निसलेल्या केळीच्या फळांवर फुलकिंडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पक्व झालेल्या फळांवर लालसर काळ्या रंगाचे टाचणीच्या टोकासारखे ठिपके (टिकल्या) पडून फळांची प्रतवारी खालवल्यामुळे प्रती क्विंटल दर कमी मिळाल्यामुळे मोठे नुकसान केळी उत्पादकांना सहन कारावे लागते.
केळीला नुकसान पोहचविणाऱ्या फुलकिड्यांच्या चार प्रजातीपैकी, महाराष्ट्रात थ्रीप्स हवाईन्सीस व चिटँनोफोथ्रीप्स सिग्निपेनीस या दोन प्रजाती आढळतात.
लक्षणे व नुकसान चा प्रकार-
थ्रीप्स हवाईन्सीस- प्रजातीमध्ये प्रौढ मादी अपरिपक्व फळांच्या सालीमध्ये अंडी घालते. चार-पाच दिवसांनी अंड्यातून गुलाबी रंगाची बाल्यावस्था बाहेर पडते, यामुळे सालीतून अन्नद्रव्ये बाहेर स्रवतात व वाळल्यानंतर त्या ठिकाणी काळ्या रंगाचे उंचवटे तयार होतात. फळे पक्व झाल्यानंतर उंचवट्यांच्या ठिकाणी बुरशीचा शिरकाव होऊन लालसर काळ्या रंगाचे टाचणीच्या टोकासारखे ठिपके (टिकल्या) पडतात.
- चिटँनोफोथ्रीप्स सिग्निपेनीस- याला रेड रस्ट असेही संबोधतात. या प्रजातीमध्ये प्रौढ मादी केळीचे खोड, पाने व फण्यांच्या बेचक्यात अंडी घालते. आठ ते दहा दिवसात ही अंडी उबतात व त्यातून बाल्यावस्था बाहेर येते. प्रौढ व बाल्यावस्थेतील फुलकिडी अपरिपक्व केळीची साल खरवडून बाहेर येणारा अन्नरस शोषण करतात. या खरडलेल्या ठिकाणच्या पेशी मृत झाल्याने त्या ठिकाणच्या पेशी मृत झाल्याने त्या ठिकाणचा हिरवा रंग जाऊन फळांवर तांबूस तपकिरी किंवा लालसर रंगाचे चट्टे पडतात. कालांतराने या ठिकाणची साल खडबडीत होऊन तेथे बारीक तडे पडतात. फुलकिड फळांच्या गरात शिरत नाही, पण केळीच्या सालीवर डाग पडल्यामुळे फळांची गुणवत्ता खालावते परिणामी योग्य बाजारभाव मिळत नाही अशी फळे निर्यातीस अयोग्य ठरतात.
- एकात्मिक व्यवस्थापन-
- अँझाडीरँक्टीन १ टक्का (५ मिली प्रती लिटर पाण्यात विरघळून) प्रती बड २ मिली द्रावण इंजेक्शन द्वारा
द्यावे. किंवा इमिडाक्लोरोप्राईड १७.८ एस एल (०.३ मिली इमिडाक्लोप्राइड ५०० मिली पाण्यात विरघडून) प्रती बड १ मिली द्रावण इंजेक्शन द्वारा द्यावे. (केळफुल/ केळ कमळ हे निघाल्यानंतर उभ्या स्थितीत ३० डिग्री कोनात असतांना वरचा एक चतुर्थांश भाग सोडून इंजेक्शन द्यावे).
संदर्भ- वरील उपाययोजनाद्वारे भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि राज्य कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प-फळे यांच्या अंतर्गत घेतलेल्या तीन वर्षीय चाचणीत थ्रीप्स च्या चिटँनोफोथ्रीप्स सिग्निपेनीस या प्रजाती ला नियंत्रण करण्यात यश मिळाले आहे. (जर्नल ऑफ एंटोमोलॉजी एंड जूलॉजी स्टडीज २०१८; ६(५)).
- घडांचे नियमित निरीक्षण करावे.
- घडातील सर्व फण्या निसवल्यानंतर त्वरित केळफुल तोडून त्याची बागेबाहेर विल्हेवाट लावावी, चुकून ते बागेत टाकू नये.
- बाग नेहमी तणमुक्त व स्वच्छ ठेवावी.
- बागेत सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी.
- केळफूल बाहेर पडते वेळी केळफूल व पानांच्या बेचक्यात अॅसिटामिप्रिड (२० एसपी) ०.१२५ ग्रॅम किंवा डायमिथोएट (३० इसी) दोन मि.लि. किंवा व्हर्टिसीलीयम लेकॅनी तीन ग्रॅम किंवा अॅझाडिरेक्टिन (१५०० पीपीएम) पाच मि.लि. अधिक स्टिकर एक मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- केळफूल बाहेर पडल्यावर वरील प्रमाणे फवारणी करून घड सहा टक्के सच्छिद्रता असलेल्या १०० गेज जाडीच्या प्लास्टिक पिशवीने झाकावा. (केळीच्या चार ते पाच फण्या पडल्यावर).
- श्री. हर्षल डी. पाटील,
लेखक संशोधन आणि विकास विभागात, सल्फर मिल्स लिमिटेड, येथे कार्यरत आहे.
- श्री. जयेश डी. पाटील
ज्वारी लागवड कशी करावी
Please give me complete information of banana cultivation