• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

बी.एस.सी. अ‍ॅग्री की बी.टेक. अ‍ॅग्री इंजिनिअरिंग? कृषी पदवीसाठी कोणता पर्याय अधिक उत्तम…

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 24, 2022
in तांत्रिक
2
कृषी पदवी

कृषी पदवी

Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात करिअर करू पाहणार्‍या विद्यार्थ्यांना नेहमीच प्रश्न पडतो – बी.एस.सी. अ‍ॅग्री की बी.टेक. अ‍ॅग्री इंजिनिअरिंग? हे दोन्हीही कृषी क्षेत्रातील अभ्यासक्रम लोकप्रिय असून चार वर्षांचेच आहेत. कृषी पदवीसाठी कोणता पर्याय अधिक उत्तम, ते आपण जाणून घेऊ…

बॅचलर ऑफ सायन्स इन ग्रीकल्चर (बी.एस.सी. अ‍ॅग्री) म्हणजेच कृषी विषयात विज्ञान पदवीधर तर बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन अ‍ॅग्रीकल्चर (बी.टेक. अ‍ॅग्री) म्हणजेच कृषी विषयात अभियांत्रिकी (तंत्रज्ञान) पदवीधर.

मधाचा गोडवा अन् रोजगाराचीही संधी ; असा घ्या मधकेंद्र योजनेचा लाभ
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/TgyUpPxd5Ao

उत्तम तांत्रिक कौशल्याला कृषी क्षेत्रात मागणी
भारतातील राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. यामुळेच या क्षेत्रात उत्तम तांत्रिक कौशल्य असलेल्या व्यावसायिकांची मागणी निर्माण झाली आहे. तथापि, या क्षेत्रातील अभ्यासक्रमांच्या वाढीबद्दल आणि भविष्यातील संभावनांबद्दल जागरूकतेचा मात्र अभाव आहे.


बी.एस.सी. अ‍ॅग्री अभ्यासक्रमाची रचना
बी.एस.सी. इन अ‍ॅगी्रकल्चर ही चार वर्षांची पदवी आहे, ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांना कृषी विज्ञानाच्या मूलभूत संकल्पनांचा परिचय करून देणे आहे. शेतीच्या मूलभूत गोष्टी शिकण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यासाठी हा एक आदर्श पर्याय आहे.

Ajeet Seeds

अमेझॉन-ॲग्रोवर्ल्ड शेतकरी सवलत योजना

शेतीच्या पद्धतींशी परिचित होण्यास मदत
लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या (एलपीयु) कृषी विद्यालयाचे उपअधिष्ठाता चंद्र मोहन मेहता म्हणाले, या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना शेतीच्या पद्धतींशी परिचित होण्यास मदत होते. कोर्समध्ये मिळालेले प्रशिक्षण त्यांना उत्पादकता कशी वाढवायची आणि शाश्वत पद्धतीने कृषी गुणवत्ता कशी सुधारायची याचा विचार करण्यास मदत करते. त्यांना पर्यावरणपूरक आणि जैव-सुरक्षित पद्धतींचा वापर करून शेती कशी करावी, हे शिकवले जाते.

बी.टेक. अ‍ॅग्री अभ्यासक्रमाची रचना
बी.टेक. अ‍ॅगी्रकल्चर (कृषी अभियांत्रिकी / तंत्रज्ञान) हा चार वर्षांचा अभ्यासक्रम आहे. यात विद्यार्थ्यांना कृषी आणि अन्न उत्पादनामध्ये तंत्रज्ञान आणि ऑटोमेशन वापरण्याची पद्धत शिकवली जाते.


अ‍ॅग्रीसाठी देशातील उत्कृष्ट संस्था
भारतात काही उत्कृष्ट खाजगी आणि सरकारी कृषी महाविद्यालये आहेत. रायपूर येथील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ, जोधपूर येथील कृषी विद्यापीठ, आयटीएम विद्यापीठ ग्वाल्हेर येथे उत्तम बी.टेक. शिक्षण दिले जाते. महाराष्ट्रातील राहुरी कृषी विद्यापीठ, जालंधर येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, बीकानेर येथील स्वामी केशवानंद राजस्थान कृषी विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्था, यांमध्ये बी.एस.सी. अ‍ॅग्रीकल्चर या पदवीचे उत्तम शिक्षण आहे.


अन्न-धान्यातील तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योगाने परिचय

बी.टेक. अ‍ॅग्री या कोर्समध्ये, शेतीमध्ये तंत्रज्ञान कसे वापरले जाते, यावर भर दिलेला असतो. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित कृषी प्रक्रिया यापुढे आवश्यक आहे. त्यामुळेच सर्व भारतीय कृषी शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये बी.टेक. अ‍ॅग्री अभ्यासक्रम आता सुरू झालेले आहेत, असे एलपीयुचे चंद्र मोहन मेहता यांनी सांगितले.

NIrmal Seeds

कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षणाची व्याप्ती
यशस्वीरित्या बीएससी पूर्ण करणार्‍या उमेदवारांना अ‍ॅग्रीकल्चरमध्ये अ‍ॅग्री-बिझनेस मॅनेजमेंट कोर्स, अ‍ॅग्रीकल्चरमध्ये स्पेशलाइज्ड मास्टर ऑफ सायन्स (एमएससी) पदवी किंवा एमबीए करण्याचा पर्याय निवडता येतो. सार्वजनिक आणि खाजगी संस्था/ कंपन्यांमध्ये त्यांना चांगली व्यावसायिक पदे व वेतनमान मिळू शकते.

बी.टेक. अ‍ॅग्री विद्यार्थ्यांसाठी अनेक सरकारी नोकर्‍या
कृषी अभियांत्रिकी / तंत्रज्ञान बी.टेक. विद्यार्थ्यांना नॅशनल सीड कॉर्पोरेशन, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, विविध राज्यातील फार्म कॉर्पोरेशन्स, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्त्रो) मध्ये नोकर्‍या मिळू शकतात. या व्यतिरिक्त, ते अभियांत्रिकीमधील पदवीधर अभियोग्यता चाचणी (गेट) देण्यास पात्र ठरतात. मात्र, उच्च शिक्षणाच्या अनेक शक्यता असल्या तरी, व्यक्तींना तांत्रिक क्षेत्राऐवजी संशोधनात अधिक रस असेल तर कृषी विषयातील बीएससी हा श्रेयस्कर पर्याय असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले.

बी.टेक. पदवीधरांना अधिक चांगल्या नोकरीच्या संधी
कृषी अभियांत्रिकी म्हणजेच बीटेक ग्रीला बी.एस्सी. अ‍ॅग्रीपेक्षा वरचढ नोकरीच्या संधी आहेत. रोजगार पर्याय आणि वेतनमान याच्या दृष्टीने बी.टेक. अधिक फायद्याचे राहू शकते. बी.एस्सी. अ‍ॅग्री पदवीधरांना वार्षिक सरासरी पॅकेज म्हणून सुमारे 3 लाख रुपये ऑफर केले जातात. तथापि, कृषी अभियांत्रिकीमधील बी.टेक. पदवीधरांसाठी सरासरी पॅकेज प्रति वर्ष 7 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते. या प्रचंड तफावतीचे एक कारण म्हणजे कृषी शेतीच्या आधुनिक तंत्राची सध्याची गरज. बी.टेक. ग्रॅज्युएट्सना त्यांच्या समकक्ष बी.एस्सी. अ‍ॅग्री पदवीधरापेक्षा जास्त पगार दिला जातो. इंडियन एक्स्प्रेसच्या द राईट चॉइस या शैक्षणिक मालिकेत शिक्षणासंबंधी सामान्य प्रश्न, गैरसमज आणि पदवीपूर्व प्रवेशासंबंधीच्या शंकांचे निराकरण केले जाते. त्यातच लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या (एलपीयु) कृषी विद्यालयाचे उपअधिष्ठाता चंद्र मोहन मेहता यांनी ही तुलनात्मक माहिती सांगितली आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • धक्कादायक Climate Change : हवामान बदलामुळे वाढतेय उष्णता; दिल्लीत दीर्घकाळ उन्हाळ्याची शक्यता तब्बल 30 पटीने वाढली
  • नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

Share this:

  • Facebook
  • X
Tags: अन्न उत्पादनअन्न-धान्यातील तंत्रज्ञानकृषी पदवीनॅशनल सीड कॉर्पोरेशनप्रक्रिया उद्योगफूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियालव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी
Previous Post

धक्कादायक Climate Change : हवामान बदलामुळे वाढतेय उष्णता; दिल्लीत दीर्घकाळ उन्हाळ्याची शक्यता तब्बल 30 पटीने वाढली

Next Post

Amazing : पुण्यात आयव्हीएफ तंत्रज्ञानाने साहिवाल वासरू घातले जन्माला; 27 किलो वजन

Next Post
आयव्हीएफ तंत्रज्ञानाने साहिवाल वासरू

Amazing : पुण्यात आयव्हीएफ तंत्रज्ञानाने साहिवाल वासरू घातले जन्माला; 27 किलो वजन

Comments 2

  1. Pingback: Relief: रिटर्न मान्सूनला अनुकूल परिस्थिती निर्माण होणार; पुढील 3 दिवसात शेवटचे कमी दाब क्षेत्र - Agro World
  2. Pingback: Medicinal Plants Nursery : शेतकऱ्यांना पूरक उत्पन्नासाठी फायदेशीर औषधी वनस्पती नर्सरी

ताज्या बातम्या

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

कृषी उडान

“कृषी उडान”च्या लाभासाठी असा करा अर्ज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

कृषी उडान

जळगाव, नाशिकसह 6 विमानतळांवरून “कृषी उडान” स्वस्तात पाठवा कृषीमाल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.