• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कृषीव्यवसायासाठी ‘स्मार्ट’ ची संजीवनी

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in हॅपनिंग
0
कृषीव्यवसायासाठी ‘स्मार्ट’ ची संजीवनी
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

                शेती आणि निसर्ग या दोन्ही संस्था श्वाश्वत आहेत.शेतीत मानवीकार्य असले तरी शेतीची सगळी सूत्रे निसर्गाकडे अबाधित आहेत,अशी आजवरची बळीराजाची धारणा हळूहळू बदलत चालली आहे. शेतीला निसर्ग नियंत्रित करतो या परंपरागत विचारात आता मोठा बदल आलेला आहे.गेल्या काही वर्षापासून शेती स्वतःची ओळख जगाला सांगत आहे.याची जाणिव बाधांवर गेलेल्या भूमीपूत्रांना झालेली आहे.शेती बोलत आहे,तीला स्वतंत्र ओळख आहे,या भूमिकेतून बळीराजा व्यवस्थेची कूस बदलण्यासाठी स्वतःला सिद्ध करीत आहे.शेतकरी राजाचा”शेती हा धर्म” आहे.परंतू आता शेती हा ‘उद्योग’असला पाहिजे,अशी गरज निर्माण झाली आहे.शेतीधर्मात पावित्र्य आहे,मात्र जगाचा व्यवहार लक्षात घेता आधुनिक कृषी व्यवस्थेत शेतक-यांनी  स्वतःला सक्षम केले पाहिजे.जो शेतमाल पिकविला तो बाजारात विकला,हा विचार मागे सारून बाजाराच्या मागणीनूसार शेतमालाचे उत्पादन घेणे,हा कृषीक्षेत्रातील महत्वाचा टप्पा म्हणता येईल.जग बदलत आहे,तर शेती मागे कशी राहू शकते? शेतीला बदललं पाहिजे,हा विचार नवतरूणाई करीत असून त्यादृष्टीने उद्योगाकडे वाटचाल सुरू झाली आहे.कृषीक्षेत्रात नव्याने जाहिर झालेल्या अध्यादेशामुळे शेतक-यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण बदल घडत आहेत.

शेतीचा प्रपंच कायम अथक कष्टाचा,अतोनात संकटांचा राहिला आहे.बळीराजाच्या पदरी सुखासुखी काहीही पडत नाही.रक्तांचं पाणी करूनही शेतमालाला हक्काचा भाव मिळत नाही.या वहिवाटीत नवं तरूणाईने आपल्या बुद्धीमत्ता व कौशल्याच्या बळावर जो पराक्रम जगासमोर आणला आहे,त्याकडे बघता होणा-या ग्रामीण परिवर्तनाचे चित्र बदलू शकते.

बांधावरचा शेतकरी असंघटित आहे.देशातील 80 टक्क्याहून जास्त शेतकरी बांधव अल्पभूधारक आहेत.अनेक गोष्टींच्या मर्यांदा शेती विकासाला कुंपण घालत आल्या आहेत.अश्या सगळ्या समस्येने ग्रासलेल्या परिस्थितीत जागतिकीकरणाने सर्व क्षेत्राला एक महत्वपूर्ण गोष्ट शिकविली,’साथी हात बढाना..एक अकेला थक जायेंगा,मिलकर बोझ उठाना…’. यापुढील वैयक्तिक शेती उत्पादने ही कालबाह्य कल्पना ठरणार आहे.शेतक-यांनी शेतमालाच्या उत्पादनासाठी संघटित होऊन जोमाने कामाला लागले पाहिजे.शेतीपुढे नेण्याच्या विचारप्रवाहाचे ‘अमृतमंथन’ सुरू असून कोविड -19 च्या आपत्तीने जगाला भानावर आणले आहे. कृषी क्षेत्राने या संकटाशी दोन हात केले आहे. सर्व महत्वाच्या निर्णयात कृषीक्षेत्र केंद्रस्थानी असले तरी शेतक-यांचा बांधा मात्र अस्वस्थआहे. या वास्तवाकडे सर्व जबाबदार घटकांचे लक्ष वेधण्याची आवश्यक्ता निर्माण झाली आहे.

शेतकरी जगासोबत चालण्याची तयारी करीत आहे.केंद्र शासनाने ‘वन नेशन-वन मार्केट’ची घोषणा केली.शेतीतून आवाज आला,’ग्लोबल मार्केट’!.आपल्या देशातील शेतकरी जागतिक बाजारपेठांकडे डोळे लावून बसले आहेत.महाराष्ट्रातील शेतक-यांना ‘ग्लोबल मार्केटिंगची’दृष्टी कृषीक्षेत्रातल्या नामवंत डोळस नेतृत्वाने दिली. नाशिकच्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष श्री.विलास शिंदे यांनी द्राक्ष उत्पादकांसाठी जो ‘जागतिक बाजारपेठांचा मळा’फुलविला, त्यातून राज्यातील शेतमाल उत्पादकांना नवचैतन्याचा कैफ चढला,तर आपण भाग्यवान ठरू!

कृषीव्यवसायासाठीआज राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्याची आवश्यक्ता निर्माण झाली आहे.शेतमालाच्या उत्पादनापासून उपभोगापर्यंत सर्व कार्यांची व घटकांची मूल्यसाखळी यापुढे अधिक मजबूत होण्याची आवश्यक्ता आहे.राज्यात अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या अस्तित्वात येत आहेत.ही प्रगतीपथाची चुणूक असली तरी या दिशेने अधिक विकेंद्रीकरण झाले पाहिजे.शेतकरी उत्पादक कंपनी स्थापण्यामागे शेतकरी संघटित होणे ही सामान्य वाटणारी पार्श्वभूमी असली तरी बळीराजाच्या जीवनाची घडी सुव्यवस्थित करण्याची ही सुरूवात आहे.

देशांतर्गत आणि विदेशात शेतमालाची शेतक-यांकडून विक्री होणे,ही आजवर एक अवघड,किचकट,तांत्रिक प्रक्रीया समजल्या गेली होती.मात्र कोविडच्या संकटाने समाज आणि शेतकरी यांच्या परंपरागत कल्पनाच बदलून टाकल्या आहेत.या संकटात शेतक-यांनी शेतमाल थेट ग्राहकांच्या दारी विकून बाजाराला ताब्यात घेण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले.या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आणि प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी आणि ग्रामीण क्षेत्राच्या विकास आणि परिवर्तनासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत.बळीराजाच्या सर्वांगसुंदर विकासासाठी प्रयत्नशील शासनाची जागतिक बँकेच्या सहाय्याने कृषी व उपजीविका क्षेत्रातील  ‘स्मार्ट’ प्रकल्प कृषी व्यवसाय व उद्योग निमिर्ती करणे, जागतिक बाजारपेठांमध्ये प्रवेश करणे,तसेच पिकांची उत्पादकता वाढविणे व हवामानाच्या बदलानूसार जोखिम व्यवस्थापन करणे या ध्येयामुळे बळीराजाच्या शेतीसाठी स्मार्ट प्रकल्प नवसंजीवनी ठरू शकते.

मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट)प्रकल्प, लहान आणि सिमांत शेतकरी तसेच कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करणारी व्यवस्था आहे.मूल्यसाखळीचा विकास केल्यामुळे उत्पादित शेतमालाची मालकी एका घटकापासून दुस-या घटकापर्यंत जाते. या प्रक्रियेत शेतमालाच्या किंमतीत वाढ होतांना दिसते.मूल्यसाखळीचा विकास केल्याने ग्राहकाने अदा केलेल्या रूपयामध्ये उत्पादकाचा हिस्सा वाढतो.मूल्यसाखळीत सहभागी असलेल्या घटकांची कार्यक्षमता वाढून घटकांमध्ये समन्वय आणि विश्वासाचे वातावरण तयार होते.त्यामुळे मूल्यसाखळी स्पर्धात्मक बनते.

शेतक-यांसाठी नवसंजीवनी ठरलेल्या ‘स्मार्ट ‘प्रकल्पाची 2100कोटी रूपये  किंमत आहे. जागतिक बॅकेने पहिल्यांदाच स्मार्ट प्रकल्पासाठी 1470कोटीचे कर्ज दिले आहे.राज्यशासनाचा 560कोटीचा हिस्सा असून खाजगी उद्योगक्षेत्राच्या माध्यमातून 70कोटींची उभारणी करण्यात आली आहे.स्मार्टमूळे शेतकरी संघटित  होऊन खरेदीदारांशी थेट जोडले जाणार आहेत.प्रक्रीया उद्योग,निर्यांतदार,संघटित किरकोळ विक्रेते यांना सोबत घेण्याची ही अलैकीक समन्वय पद्धत ठरणार आहे.स्मार्टच्या कार्यातून संपूर्ण मूल्यसाखळीतील सर्व घटकांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.स्मार्टचे खालील लाभार्थी शेतकरी संस्था आहेत.

1)समुदाय आधारीत नोंदणीकृत संस्था(CBO)

2)शेतकरी उत्पादक कंपनी(FPC)

3)लोकसंचालित साधन केंद्र(CMRC)महिला बचत गटाचे संघ

4)प्रभाग संघ(Clf)महिला बचत गटाचे संघ

5)प्राथमिक कृषी सहकारी संस्था(PACS)

6)उत्पादक संघ(Growers Association Federation)

7)आत्मा यंत्रणेकडे नोंदणी झालेले उत्पादक गट(PG)

8) व्हीएसटीएफ गावसमुह इत्यादी.

स्मार्टच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी संघटित असणे,ही प्रमुख अट आहे. बळीराजाचे संघटन पुढील प्रवासात महत्वपूर्ण ठरणार आहे.स्मार्ट प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची यंत्रणा सक्षम असून कृषी विभागासह,पशुसंवर्धन,पणन,सहकार,महिला व बालकल्याण,ग्रामविकास व नगरविकास विभागाचा उत्तम सहभाग या प्रकल्पात दिसून येतो.स्मार्टच्या माध्यमातून शेतक-यांना गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी सहाय्य केले जाणार आहे. औजारे,उपकरणे,गोदाम,काढणी पश्चात पायाभूत सुविधांसाठी आर्थिक व तांत्रिक मदत केली जाणार आहे.या प्रकल्पाचे काही उपप्रकल्प असून बाजार संपर्कवाढ उपप्रकल्प किंवा धान्य गोदाम आधारित उपप्रकल्पातून धान्य साठवणूक व साठवणूक पश्चात धान्य तारणाबाबतचे कार्य या उपक्रमांतर्गत  होणार आहे तसेच ग्रामपातळीवर गोदाम साठवणूक  सुविधांचा लाभ शेतक-यांना मिळणार आहे.

स्मार्टअंतर्गत मूल्यसाखळी विकासशाळा ही नविन संकल्पना राबविण्यात येत असून मूल्यसाखळीतील सर्व घटकांना एका व्यासपीठावर आणून इतर घटकांची संबंधित पिकासंबंधित आव्हाने आणि मुद्दे  समजून घेणे या उद्देशाने मूल्यसाखळी विकास शाळेची(व्हीसीडीएस) संकल्पना पुढे आली आहे.

राज्यातील शेतक-यांच्या शेती उत्पादनासंदर्भात योग्य मार्गदर्शन करण्यासाठी कृषी आयुक्तालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे.कृषी विपणन सेवा कक्षाच्या माध्यमातून जागतिक व देशांतर्गत लागवड क्षेत्र,संभाव्य उत्पादन साठवणूक,मागणी व बाजारभाव या माहितीचे विश्लेषण करून प्रमुख पिकांच्या संभाव्य बाजारभावांचे अंदाज अहवालाचे प्रसारण करणे,लागवडीच्या वेळेस बाजारभावाच्या अंदाजानूसार आगामी हंगामात कोणती पिके घ्यावीत याचे मार्गदर्शन केले जात आहे  तसेच काढणीच्या वेळेस बाजारभावाच्या अंदाजानूसार शेतमाल विक्री करावा अथवा गोदामात साठवणूक करावी याचे दिशादर्शन केले जाते.यासोबतच बाजारभावाच्या अंदाजाचे प्रसारण,मोबाईल संदेश,वेबसाईट,कार्यशाळा,माहितीपुस्तिका,प्रदर्शने या माध्यमातून ‘ स्मार्ट प्रकल्प’ शेतकरी राजापर्यंत पोहचत आहे.यापुढील काळात ‘स्मार्ट प्रकल्प’कृषी व्यवसायासाठी नवसंजीवनी ठरणार आहे,हे निश्चित!

डाॅ.प्रीती सवाईराम
सहाय्यक प्राध्यापक तथा सत्र संचालक.
यशदा,महाराष्ट्र शासन,पुणे.
Preetis2015@yahoo.com
9881372585

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: वन नेशन-वन मार्केटशेतकरी उत्पादक कंपनीसमुदाय आधारीत नोंदणीकृत संस्था
Previous Post

राज्यात दोन आठवडे पावसाची उघडीप; तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

Next Post

आता दोनदा धावणार किसान रेल्वे

Next Post
आता दोनदा धावणार किसान रेल्वे

आता दोनदा धावणार किसान रेल्वे

ताज्या बातम्या

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish