नाशिक (प्रतिनिधी) – कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी उगाव, ता.निफाड, जि. नाशिक येथे ओम गायत्री समूहाच्या विविध युनिटला भेट दिली. हा औपचारिक समारंभ दि. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी संपन्न झाला. ओम गायत्री समूहाच्या शेती क्षेत्रातील योगदानाद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते उगावच्या ओम गायत्री अॅग्रो मॉलचे उदघाटन करण्यात आले. यादरम्यान त्यांनी नर्सरी, बेंच ग्राफ्टिंग. अॅग्रो मॉल, फार्मर प्रोड्युसर कंपनी व माती-पाणी परीक्षण लॅबचे पाहणी केली.
कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी बेंच ग्राफ्टिंग या द्राक्षामधील नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे शेतकऱ्यांना होणारे लाभ यासंबंधी विशेषत्वाने जाणून घेतले. त्याचबरोबर माती-पाणी परीक्षण याचे महत्व लक्षात घेता ओम गायत्री समूहाने यात पण स्तुत्य पुढाकार घेतल्याचे नमूद केले. या मंगल प्रसंगी समूहाचे अध्यक्ष मधुकर गवळी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करून समूहाची वाटचाल नर्सरी पासून कशी सुरु झाली व शेतकरी हित सर्वोपरी या अनुषंगाने त्यामागची भूमिका विशद केली. त्याच बरोबर सर्व युनिटच्या चालू असलेल्या उपक्रमासंबंधी माहिती दिली.
या प्रसंगी संपर्क प्रमुख भाऊ चौधरी, आ. अनिल कदम, मा. जि. प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, पं. स. सभापती शिवा सुरासे, उपजिल्हा प्रमुख निलेश पाटील, किरण लभडे, नितीन बनकर, आशिष बागुल,राज्य बियाणे समिती सदस्य, खंडू बोडके-पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, प्रांत पूजा गायकवाड, उप विभागीय कृ. अ.गोकुळ वाघ, तहसीलदार शरद घोरपडे, निवासी नायब तहसीलदार श्रीमती निकुंभ, ता. कृ. अ. बी. जी. पाटील, मं. कृ. अ. व्ही. जी. पाटील, श्री.सोमवंशी, कृषी पर्यवेक्षक श्री.गायमुखे, कृषी सहाय्यक धर्माधिकारी आदी उपस्थित होते. प्रतिष्ठित नागरिक व सर्व शेतकरी, साहेबराव पानगव्हाणे, सदाशिव आहेर, प्रभाकर मापारी, हॅरीसग गवळी, सागर निकासे, जयवंत ढोमसे यांची उपस्थिती होती.