• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांना शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून देण्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश…

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 9, 2021
in हॅपनिंग
0
औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांना शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून देण्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश…
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

औरंगाबाद (प्रतिनिधी) ः जिल्ह्यातील धरण व कालव्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करुन शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याचे सुक्ष्म नियोजन करावे व शेतकर्‍यांना शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.

 

शहरातील सिंचन भवनात कालवा सल्लागार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पालकमंत्री देसाई यांनी पाण्याचा वहनव्यय, कालव्याची देखभाल दुरस्ती व बांधकाम, पाणी आवर्तन, पाणीपट्टी वसुलीबाबतचा आढावा देखील या बैठकीत घेतला. यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कालवा सल्लागार समिती सदस्यांनी संयुक्त पाहणी करुन आठ दिवसांत अहवाल सादर करावा. त्यानंतर लोकप्रतिनिधी व शासनस्तरावर उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले जाईल असेही पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.


बैठकीला खासदार इम्तीयाज जलील, आमदार प्रशांत बंब, आमदार रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबादचे के. बी. कुलकर्णी, लाभक्षेत्र विकासा प्रधिकरण विभागाचे अधिक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्रधिकरण बीडचे स. न. निकुडे, एस. बी. कोरके, कार्यकारी अभियंता श्री. गलांडे, म. सु. जोशी, रुपाली ठोंबरे, प्रशांत जाधव पाणी वापर संस्थेचे सदस्य राजेंद्र खिल्लारी, पंडीत शिंदे यांच्यासह इतर सदस्य व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

 

पाणीपट्टी वेळेत वसुली करावी
श्री. देसाई यांनी सांगितले, की कालवा सल्लागार समिती सदस्य व जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍याने औरंगाबाद जिल्ह्यातील उपलब्ध पाणी साठ्याचे योग्य नियोजन करुन शेतकर्‍यांना जास्तीत जास्त पाणी कसे उपलब्ध करुन देता येईल यासाठी तांत्रिक अडचणी आणि त्रुटी दूर कराव्यात. तसेच बाह्य यंत्रणेकडून पदभरतीचा पर्याय अवलंबून पाणी पट्टी वसूली वेळेत करावी. पाणी वापर संस्थेच्या सदस्यांना प्रशिक्षण द्यावे, जेणेकरुन पाणी लाभक्षेत्र वाटप आणि याचा फायदा किती शेतकर्‍यांना झाला याचा आढावा घेता येईल. तसेच भूसंपादनाचा ज्या शेतकर्‍यांना मोबदला मिळाला नाही तो मिळण्यासाठी शासनाकडे अतिरिक्त निधीच्या मागणीचा प्रस्ताव पाठवण्याबाबत निर्देश दिले.

 

त्या त्या जिल्ह्याचे नियंत्रण असावे
आमदार रमेश बोरनारे म्हणाले की, जिल्ह्यासाठी ज्या धरणाची व कालव्याची निर्मिती झाली आहे त्या धरणाचे व कालव्याच्या पाण्यावर वापरण्याबाबतचे नियत्रंण देखील त्या-त्या जिल्ह्याचे असावे. तसेच गंगापूर, वैजापूर, कोपरगाव या तालुक्यातील धरण व कालव्यासाठी अधिग्रहण केलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी निधीबाबतचा प्रस्ताव विभागामार्फत शासनाकडे पाठवावा. तसेच पाणी वापर, देखभाल, वितरण यासाठी यांत्रिकीकरणाव्दारे जो खर्च केला जात आहे त्यात दुरस्ती करण्याबाबत सांगितले.

 

पाणी वापराचे नियोजन करावे
आमदार प्रशांत बंब यांनी मराठवाड्यातील पीक निहाय, पाण्याची गरज, वहनामध्ये होणार्‍या पाण्याची घट यावर तांत्रिकदृष्ट्या अभ्यासकरुन जास्तीत जास्त पाणी वाया न जाता ते शेतीसाठी वापरण्याचे नियोजन सादर करण्याबाबतची मागणी बैठकीत बोलताना केली. कालवा समिती सदस्य सल्लागार बैठकीच्या सुरुवातीला अधिक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांनी कालवा समितीच्या बैठकीसमोर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या जायकवाडी प्रकल्प रब्बी व उन्हाळा हंगाम 2021-22 प्राथमिक सिंचन कार्यक्रम, पाणी आवर्तनाचे प्रस्तावित प्रकल्प व्यवस्थापणातील अडचणी, पाणी वापर संस्थेची सद्यस्थिती, मागील पाच वर्षातील प्रत्यक्ष पाणी साठा, झालेला पाणी वापर, सिंचन उद्ष्टि, मागील पाच वर्षातील पाणीपट्टी वसूलीचा तपाशिल तसेच नांदूर मधमेश्वर कालवा प्रकल्प या विषयांची माहिती संगणकीय सादरीकरणाव्दारे माहिती दिली.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: आमदार प्रशांत बंबखासदार इम्तीयाज जलीलगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळजलसंपदा विभागपालकमंत्री सुभाष देसाईभूसंपादनलाभक्षेत्र विकास प्रधिकरण
Previous Post

जळगावात 13 नोव्हेंबरला केळी निर्यात संधी कार्यशाळा. कार्यशाळा मोफत, परंतु आगाऊ नाव नोंदणी आवश्यक फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स व अ‍ॅग्रोवर्ल्ड यांचा संयुक्त उपक्रम

Next Post

अ‍ॅग्रोवर्ल्डचा 112 पानी वाचनीय व खुमासदार विषयांनी सजलेला दिवाळी विशेषांक..; ‘कृषी पराशर ते प्रिसिजन फार्मर’ बदलांचा वेध..

Next Post
अ‍ॅग्रोवर्ल्डचा 112 पानी वाचनीय व खुमासदार विषयांनी सजलेला दिवाळी विशेषांक..; ‘कृषी पराशर ते प्रिसिजन फार्मर’ बदलांचा वेध..

अ‍ॅग्रोवर्ल्डचा 112 पानी वाचनीय व खुमासदार विषयांनी सजलेला दिवाळी विशेषांक..; 'कृषी पराशर ते प्रिसिजन फार्मर' बदलांचा वेध..

ताज्या बातम्या

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

इराण युद्ध

इराण युद्धामुळे केळी निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

द्राक्षाचे भाव

दुबईत द्राक्षाचे भाव रात्रीतून तिप्पट; नाशिक-सांगलीच्या शेतकऱ्यांना मात्र 1,500 कोटींचा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

इराण

इराण युद्धाचा कांदा निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

कृषी क्षेत्रावर परिणाम

आखात युद्धाचा कृषी क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 2, 2026
0

खत अनुदान

270 रुपयांचा युरिया 2,400 रुपयांना? खत अनुदानातील ‘डीबीटी’ क्रांती की शेतकऱ्यांसाठी नवी अडचण!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 27, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish