• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

ओळख महामंडळांची – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

Team Agroworld by Team Agroworld
January 4, 2021
in इतर
0
ओळख महामंडळांची – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (प्रचलित नाव: एस.टी.)      अर्थातच आपली सर्वाची परिचित व सर्वसामान्यांचे वाहन म्हणून परिचित असलेलील लाल परी ही महाराष्ट्र राज्यात रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन झालेली राज्य सरकारची कंपनी आहे. तिच्या सेवा आणि वाहने एसटी या लघुरुपानेच महाराष्ट्रीय जनतेत प्रचलित आहेत.

स्थापना आणि इतिहास 

वाहनांद्वारे सावर्जनिक प्रवासी वाहतूकीची सुरवात महाराष्ट्रात १९३२ च्या सुमारा खासगी व्यावसायिकांद्वारे सुरु झाली. त्यापुढच्या आठ दहा वर्षात या वाहतुकीचे नियमन करण्याची गरज भासू लागली. १९४७ मध्ये भारतातील ब्रिटीशांची राजवट संपुष्टात आली. स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांतात १९४८ मध्ये बॉंबे स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉपोर्रेशन (बीएसआरटीसी) या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात येऊन प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा (पब्लिक ट्रांसपोर्ट) एकाधिकार या कंपनीला बहाल करण्यात आला.

बीएसआरटीसीची पहिली बस जून १, इ.स. १९४८ यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. सदरची बस पुणे येथील पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे व वाहक लक्ष्मण केवटे यांनी चालवली[ संदर्भ हवा ]. पुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निझाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरु राहिला.

सेवा आणि विस्तार 

एसटीची सेवा “गाव तेथे एसटी”, “रस्ता तेथे एसटी” या ब्रीदवाक्यानुसार खेड्यापासून शहरापर्यंत विस्तारलेली आहे. महाराष्ट्रात एकूण ३१ विभागातून एसटीचे विभागीय कामकाज पूर्ण केले जाते. त्याचप्रमाणे आंतरराज्यीय सेवा एसटी महामंडळाकडून पुरविली जाते. गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा व गोवा इ. राज्यात विस्तार झालेला आहे.

आज एसटीकडे वाहतूक सेवेसाठी सुमारे १५ हजार ५५० वाहने आहेत त्यांचा तपशील असा
साध्या बसगाड्या १४०२२
शहर बस गाड्या ६५१
निम आराम बसगाड्या ५४४
मिनी बसगाड्या १९९
डीलक्स बसगाड्या ४८
वातानुकुलित बसगाड्या २६
मिडी गाड्या १०

याशिवाय अधिकारीवर्गाची वाहने, पुरवठ्याची वाहने आदी वाहने महामंडळाकडे आहेत

आधुनिकीकरण

एसटी ने कालानुरूप सेवेत बदल केला आहे. साध्या गाड्या निमआराम बसगाड्यांसोबतच नव्या काळात आधुनिक सेवाही एसटीने सुरू केल्या आहेत. डिसेंबर २००२ मध्ये दादर- पुणे मार्गावर अश्वमेध या नावाने वातानुकूलित बससेवा सुरू करून एसटीने आणखी एक पाऊल पुढे टाकले. शिवनेरी, अश्वमेध आणि शीतल या तीन प्रकारच्या वातानुकूलित आरामसेवा एसटी चालवित आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातील महानगरांदरम्यान या सेवा चालवल्या जातात.

एसटीची आगाऊ तिकीट विक्री सेवा एजंटांमार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर स्वतःच्या संकेतस्थळावरून आगाऊ तिकीट विक्रीची सुविधा देऊन एसटीने एक पाऊल पुढे टाकले. मोबाईल ॲपही उपलब्ध करून देऊन त्याद्वारे आगाउ आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बस प्रवासादरम्यान प्रवाश्यांच्या मनोरंजनासाठी अनेक मार्गांवर मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून त्याद्वारे मनोरंजनाचे निवडक कार्यक्रम पाहता येतात. तसेच २०१७ पासून महामंडळाने ‘शिवशाही’ या नव्या आसन व शयनयान श्रेणीतील बसेस ताफ्यात आणल्या आहेत.

महामंडळाची रचना

एसटीच्या संचालक मंडळावर अध्यक्ष आणि कमाल १७ संचालक नेमणूक करण्याची तरतूद आहे़. त्यापैकी अध्यक्ष हा महाराष्ट्र शासनाचा परिवहन मंत्री असतो तर व्यवस्थापकीय संचालक हाच उपाध्यक्ष असून तो भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असतो. विद्यमान वर्तमान संचालक मंडळावर अध्यक्ष (अशासकीय) व ५ शासकीय संचालकांची नेमणूक करण्यात आली आहे. [१]

  • श्री.अ‍ॅड. अनिल परब – अध्यक्ष
  • श्री रणजितसिंग देओल (भा.प्र.से.) – उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
  • श्री. सुधीर श्रीवास्तव – शासकीय संचालक
  • श्री. यशवंतराव इ. केरुरे – शासकीय संचालक
  • श्रीमती इराने चेरियान – शासकीय संचालक
  • श्री. सतीश पुंडलिक दुधे – शासकीय संचालक
  • डॉ. श्री. प्रवीण गेडाम – शासकीय संचालक

प्रशासकीय कार्यालये

  • मध्यवर्ती कार्यालय :

महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४०० ००८.

  • मध्यवर्ती कार्यशाळा :

(१) मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे.
(२) मध्यवर्ती कार्यशाळा, चिकलठाणा, औरंगाबाद.
(३) मध्यवर्ती कार्यशाळा, हिंगना, नागपूर.

  • विभागीय कार्यालय :

(१) मुंबई
(२) पुणे
(३) नाशिक
(4) औरंगाबाद
(५) अमरावती
(६) नागपूर

  • मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था :

मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था, भोसरी, पुणे.

कर्मचारी संघटना आणि व्यवस्थापन

एसटी महामंडळात एकूण २२ कर्मचारी संघटना अस्तित्वात आहेत. श्रमिक संघ मान्यता व अनुचित प्रथा प्रतिबंध कायदा १९७१ नुसार एसटी कामगार संघटना या संघटनेला एकमेव मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे आणि कर्मचाऱ्यांचे धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्याचा व वेतन करार करताना प्रशासनाशी वाटाघाटी करण्याचा अधिकार या एकाच संघटनेला प्राप्त झालेला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सुविधा हा कायमच कर्मचारी संघटना आणि महामंडळाचे व्यवस्थापन यांच्यात वादाचा मुद्दा राहिलेला आहे.

सामाजिक जबाबदारी

महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक पाडे आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे की आपला प्रवास फक्त एसटी बसनेच करावा व एसटी बसची स्वच्छता राखण्यास मदत करावी तसेच एसटीच्या सेवा अविरत चालू ठेवण्यासाठी एसटीला शासनाच्या मालकीचे पूर्णपणे हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न करावे.

माहिती स्तोत्र :- विकासपिडिया

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: एस.टीकर्मचारी संघटनाबसब्रिटीशमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमुंबईमुंबई सेंट्रललाल परीश्रमिक संघ
Previous Post

पावनखिंड भाग – 18 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post

पावनखिंड भाग – 19 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post
इतिहास  गौरवशाली स्वराज्याचा – पावनखिंड भाग – १  बाजी प्रभू

पावनखिंड भाग – 19 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

ताज्या बातम्या

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish