• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

उत्पादन वाढीसाठी अशी करा कांदा लागवड… जाणून घ्या संपूर्ण व्यवस्थापन

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 12, 2022
in इतर
0
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे : दररोजच्या आहारात वापरल्या जाणाऱ्यकांद्याला वर्षभर मोठ्या प्रमाणात मागणी असतेबर्याचदाबाजारात मागणी आणि पुरवठा यात तफावत असते. ज्यामुळे कांद्यांचे भाव अस्थिर असतात. त्यामुळे कांदा शेतकर्यांना कधी हसवतो तर कधी रडवतो देखील. असे असले तरी शेतकरी कांद्यांची लागवड केल्याशिवाय राहत नाही. कांदा लागवडीपासून प्रत्यक्ष कांदा उत्पादन हाती येईपर्यंत काय काळजी घ्यावी व कांदा लागवडीचे व्यवस्थापन कसे करावे, याची माहिती शेतकर्यांना असणे अत्यंत गरजेचे आहे.

जळगाव येथे रविवारी 23 जानेवारीला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजीत “हिरवे सोने – बांबू कार्यशाळा” 🎋… बांबूला मिळतोय ऊसापेक्षा दुप्पट भाव.. कारण.. बांबूपासून आता इंधनाला पर्याय ठरलेल्या इथेनॉलची निर्मिती… बांबूचा औष्णिक ऊर्जा केंद्रात कोळशाला पर्याय म्हणून वापर… कमी अधिक पावसाचाही बांबूवर फारसा परिणाम नाहीच उलट शाश्वत उत्पन्न… बांबू लागवडीपासून ते थेट विक्री / बाजारापर्यंत माहितीसाठी कार्यशाळेसाठी तत्काळ नोंदणी करा.. प्रवेश मर्यादित..* 🎋

 

कांदा लागवडीचा हंगाम
रब्बी हंगामात कांद्याची लागवड करणे जास्त फायद्याचे ठरते. कांदा लावल्यापासून काही दिवस कांद्याला थंड हवामान हवे असते. त्यानंतर कांद्याची वाढ होताना हवामानातील तापमान हे थोडे जास्त असेल तर कांद्याच्या कंद वाढीला त्याचा फायदा होतो. महाराष्ट्रात खरीपासह उन्हाळी हंगामातही कांदा लागवड केली जाते. खरीप हंगामात जून-जुलै महिन्यात लागवड करावी तर उन्हाळी हंगामात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात लागवड करावी. कांदा लागवडीसाठी मध्यम ते कसदार जमीन उपयुक्त ठरते. ही जमीन पाण्याचा निचरा करणारी व भुसभुशीत असावी. जमिनीमध्ये सेंद्रिय घटक चांगल्या प्रमाणात असावेत, ज्यामुळे कांदा पिकाची उत्तम वाढ होते. लागवडीसाठी जमीन तयार करताना उभी आडवी नांगरणी करून कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडून घ्यावी व ती भूसभुशित करावी. जमिनीत एकरी १५ टन शेणखत टाकावे, जेणेकरुन कांद्याला आवश्यक असलेले सेंद्रिय घटक जमिनीत उपलब्ध होतात.

शुद्ध घ्या.. शुद्ध खा.. तेही माफक दरात.. अ‍ॅग्रोवर्ल्ड मार्फत जळगाव शहरात 15 जानेवारीला अस्सल व भेसळमुक्त प्रसिद्ध सांगलीची सेलम हळद पावडर उपलब्ध..

 

बियाणांची निवड
खरीप व रब्‍बी हंगामासाठी बसवंत ७८० ही जात योग्‍य मानली गेली आहे. या जातीचा रंग गडद लाल असतो. कांदे आकाराने मध्यम ते मोठे असतात. ही जात शंभर ते ११० दिवसात तयार होते. त्यापासून हेक्‍टरी उत्‍पादन २५० ते ३०० क्विंटल उत्पादन मिळते. खरीप हंगामासाठी एन- ५३ ही जात योग्‍य ठरते. हा कांदा १०० ते १५० दिवसांत तयार होते. या जातीचा रंग लालभडक असतो. हेक्‍टरी उत्‍पादन २०० ते २५० क्विंटल मिळते. रब्बी हंगामासाठी एन-२-४-१ ही जात योग्‍य मानली गेली असून रंग भगवा व विटकरी असतो. हा कांदा आकाराने मध्‍यम गोल असतो. त्याची साठवणूक केली तर हा कांदा अतिशय चांगल्‍या प्रकारे टिकतो. ही जात १२० ते १३० दिवसात तयार होऊन त्याचे हेक्‍टरी ३०० ते ३५९ क्विंटल उत्‍पादन मिळते. याशिवाय पुसा रेड जातीचाही कांदा लागवडीसाठी योग्य ठरतो. एका एकरमध्ये कांद्याचे ४ ते ४.५ किलो बियाणे आवश्यक असते.

 

अशी करावी लागवड
कांदा लागवड ही वाफा पद्धतीने किंवा सरी पद्धतीने करता येते. मात्र, त्याआधी कांद्याची रोपे तयार करणे महत्वाचे आहे. गादी वाफे तयार करून त्यामध्ये कांद्याची रोपे तयार करावीत. जेथे गादी वाफे तयार करायचे आहेत ती जमीन व्यवस्थित नांगरून व कुळवून घ्यावी व मग त्या ठिकाणी एक मीटर रूंद ३ मीटर लांब १५ सेंटीमीटर उंच वाफे बनवावेत. या वाफ्याच्या रूंदीशी समांतर अशा ५ सेंमी बोटाने रेषा पाडाव्‍यात आणि यात बी ओळीत पातळ पेरावे व नंतर मातीने झाकून टाकावे. बी उगवून येईपर्यंत झारीने पाणी घालावे व बी उगवल्‍यानंतर गरजेप्रमाणे पाटाने पाणी द्यावे. रोपांना हरबर्याच्या आकाराची गाठ तयार झाली, की ते लागवडीसाठी तयार आहेत असे समजावे. खरीप हंगामातील कांद्यांची रोपे ही ६ ते ७ आठवडयांनी तर रब्‍बी हंगामात लागवड केलेली रोपे ही ८ ते ९ आठवडयांनी तयार होतात. रोपे काढण्याआधी २४ तास गादी वाफयास पुरेसे पाणी द्यावे.

 

खत व पाणी व्‍यवस्‍थापन
कांदा पिकास हेक्‍टरी ५० किलो नत्र, ५० किलो स्‍फूरद व ५० किलो पालाश लागवडीच्‍या वेळी घ्‍यावे. त्‍यानंतर १ महिन्‍याने ५० किलो नत्र प्रति हेक्‍टरी दयावे. कांदा पिकाला नियमित पाणी देणे महत्‍वाचे असते. खरीप हंगामात १० ते १२ दिवसाच्‍या अंतराने तर उन्‍हाळी रब्‍बी हंगामात ६ ते ८ दिवसांनी गरजेनुसार पाणी द्यावे. आंतरमशागतीमध्ये रोपांच्‍या लागवडीनंतर शेतात तण दिसल्‍यास हलकी खुरपणी करावी. काढणीपूर्वी ३ आठवड्यांअगोदर पाणी बंद करावे म्‍हणजे पानातील रस कांद्यामध्‍ये लवकर उतरतो.

रोग व कीड व्यवस्थापन
कांद्यांवर करपा, फुलकिडे अशा रोगांचा व किडीचा प्रादुर्भाव आढळतो. करपा रोगामुळे कांदा पातीवर लांबट गोल तांबूस चट्टे पडतात व शेंड्यापासून पाने जळाल्यासारखी दिसतात. फुलकिडे कांदा पातीवरील तेलकट पृष्ठभागात खरडतात व त्‍यात स्त्रवणारा रस शोषतात. त्‍यामुळे पातीवर पांढरे ठिपके पडतात. कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य औषधांची फवारणी केल्यानंतर फुलकिडे व करपा रोगावर नियंत्रण मिळवता येते.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: ManagementOnionPlantingRabbi seasonWaterकांदापाणीरब्बी हंगामलागवडव्यवस्थापन
Previous Post

वाढत्या थंडीत जनावरांची अशी घ्या काळजी… गुरांचे जंतू निर्मुलन करा वेळेवर

Next Post

हवामान बदलामुळे महाबीजलाही बसतोय बीजोत्पादनाचा फटका… उन्हाळ्यात बीजोत्पादनाचे नियोजन…

Next Post

हवामान बदलामुळे महाबीजलाही बसतोय बीजोत्पादनाचा फटका… उन्हाळ्यात बीजोत्पादनाचे नियोजन…

ताज्या बातम्या

जपान

जपानचे अस्वलांशी युद्ध: 54,000 अस्वल, सैन्य तैनात आणि 5 धक्कादायक सत्ये

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 8, 2025
0

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 7, 2025
0

एका गावात एकाच दिवशी आले 16 नवे ट्रॅक्टर!

एका गावात एकाच दिवशी आले 16 नवे ट्रॅक्टर! महाराष्ट्राच्या शेतीत नेमकं काय घडतंय?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 6, 2025
0

राज्यात आणखी 2-3 दिवस पाऊस

राज्यात आणखी 2-3 दिवस पाऊस; नव्या कमी दाब क्षेत्राचा प्रभाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 5, 2025
0

ट्रॅक्टरची विक्रमी विक्री

दसरा-दिवाळीच्या काळात ट्रॅक्टरची विक्रमी विक्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 4, 2025
0

शेतकऱ्यांचे नशीब पालटणार?

शेतकऱ्यांचे नशीब पालटणार? ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा ‘महा-प्लॅन’!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 3, 2025
0

लग्नसराईचे वेध: तुळशी विवाहानंतर उडणार लग्नांचा बार, 18 नोव्हेंबरपासून घुमणार सनई-चौघड्याचे सूर!

लग्नसराईचे वेध: तुळशी विवाहानंतर उडणार लग्नांचा बार, 18 नोव्हेंबरपासून घुमणार सनई-चौघड्याचे सूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

यंदा नेमका कधी आहे तुळशी विवाहाचा मुहूर्त? जाणून घ्या नेमकी तिथी अन शुभ वेळ..

यंदा नेमका कधी आहे तुळशी विवाहाचा मुहूर्त? जाणून घ्या नेमकी तिथी अन शुभ वेळ..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

हाय अलर्ट

उत्तर – मध्य महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना आज हाय अलर्ट; नोव्हेंबरच्या स्वागतालाही पाऊस हजरच!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

‘हे’ पिक ठरले गेमचेंजर

‘हे’ पिक ठरले गेमचेंजर ; शेतकरी घेतोय लाखोंचा नफा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 1, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

जपान

जपानचे अस्वलांशी युद्ध: 54,000 अस्वल, सैन्य तैनात आणि 5 धक्कादायक सत्ये

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 8, 2025
0

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

जाणार एकदाचा पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा मोसम सुरू

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 7, 2025
0

एका गावात एकाच दिवशी आले 16 नवे ट्रॅक्टर!

एका गावात एकाच दिवशी आले 16 नवे ट्रॅक्टर! महाराष्ट्राच्या शेतीत नेमकं काय घडतंय?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 6, 2025
0

राज्यात आणखी 2-3 दिवस पाऊस

राज्यात आणखी 2-3 दिवस पाऊस; नव्या कमी दाब क्षेत्राचा प्रभाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish