• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

इस्राईलमध्ये तयार होतोय नेक्स्ट जनरेशन रोबोटिक मजूर; फळबागांमध्ये करणार फळतोडणी

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 13, 2022
in हॅपनिंग
3
इस्राईलमध्ये तयार होतोय नेक्स्ट जनरेशन रोबोटिक मजूर; फळबागांमध्ये करणार फळतोडणी
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

तेल अविव : इस्त्रायली तांत्रिक अभियंता सध्या नेक्स्ट जनरेशन रोबोटिक मजूर तयार करण्यात गुंतले आहेत. त्याचा प्रोटोटाईप तयार केला गेला असून फील्ड ट्रायल सुरू आहेत. उद्योगांना, हॉटेलमध्ये किंवा कार्यालयात लागणारे रोबो ही मर्यादीत कामे अचूकरित्या करण्यास सक्षम असतात. त्यात साधारणतः फक्त रोबोटिक आर्म्स वापरले जातात. मात्र शेती क्षेत्र हे ठराविक चाकोरीतले नसल्याने इथे फक्त रोबोटिक आर्म्स वापरून चालणार नाही. त्यामुळे रोबोटिक आर्म्ससोबतच ड्रोन तंत्रज्ञान आणि ग्राऊंड कंट्रोल स्टेशन यांच्या समन्वयातून हा नव्या पिढीतील रोबोटिक मजूर आकाराला येत आहे. यशस्वी ट्रायलनंतर तो प्रत्यक्ष शेतात उतरविला जाईल, तेव्हा फळबागांमध्ये सहजपणे आणि अगदी अचूकतेने फळतोडणी करण्यास सक्षम असेल. आधीच्या काही फसलेल्या ॲग्री रोबोंपेक्षा फळबागांमधील इतर सर्व कामेही नव्या रोबोटिक तंत्राने अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने पार पडतील, असा इस्त्रायलमधील शास्त्रज्ञांना विश्वास आहे.

 

AGROWORLD’s Upcoming Exhibitions @ JALGAON, @ NASHIK, @ SHAHADA….

 

जगभरात जाणवतेय मजुरांची टंचाई

सध्या इस्राईलसह अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया , व्हिएतनाम, भारत, चीन अशी जगभरातील अनेक देशांमध्ये शेतमजूर आणि शेती-संसाधनांची कमतरता जाणवत आहे. मजुरांअभावी वेळेवर अथवा कापणीच न झाल्याने उत्पादनांची गुणवत्ता तर खालावतेच शिवाय प्रचंड आर्थिक नुकसानही होते. विशेषत: फळांच्या बाबतीत, सध्या हे अंगमेहनतीचेच काम असून कापणी प्रक्रियेदरम्यान मजुरांची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवते. जगाची लोकसंख्या वाढतेय तसतसे भविष्यात ही समस्या अधिक गंभीर होण्याचा धोका आहे. 2050 पर्यंत जगाची लोकसंख्या 9 अब्जांपेक्षा अधिक होईल आणि त्यासाठी खाद्यान्न उत्पादनाचे प्रमाण 35 ते 60 टक्क्यांपर्यंत वाढवणे आवश्यक आहे, जे केवळ आधुनिक माहिती-तंत्रज्ञानाच्या रूपाने शक्य होऊ शकेल. सध्या धान्य कापणीचे स्वयंचलित मशीन तंत्र बर्‍यापैकी विकसित झाले आहे. एकत्रितपणे धान्य कापणी करणे आजकाल या अत्याधुनिक मशीन्समुळे खूपच सोपे झाले आहे. काही स्वतंत्र ऑपरेटरद्वारे हे मशीन चालवले जातात व त्वरीत नेव्हिगेट करून कार्यक्षमतेने अनेक एकरांवर प्रक्रिया करतात. शेतातील पिकांमध्ये, संपूर्ण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कापणी सहज करणे आणि वेगवेगळ्या झाडावरून विविध उंचीवरील खाण्यायोग्य फळे एक-एक करून निवडून काळजीपूर्वक हाताळण्याची गोष्ट वेगळी ठरते. त्यामुळे फळबागांमध्ये अजून ती परिपूर्ण तंत्रज्ञानाची सोय नाही.

अ‍ॅग्रोवर्ल्ड.. आता “युट्युब” वरही..! 🌱

https://youtu.be/LqVqe0JkRS8

 

यापूर्वी फसलेल्या शेतीतील रोबोंपासून धडा घेत सुधारणा

यापूर्वीही सातत्याने शेतीसाठी उपयुक्त रोबो बनविण्याचे प्रयत्न झाले आहेत. त्यात अमेरिकेतील ॲबंडंट रोबोटिक्स कंपनीने विकसित केलेला सफरचंद वेचणारा रोबो लक्षवेधी ठरला होता. हा रोबो न्यूझीलंडमधील टी अँड जी ग्लोबल कंपनीसाठी एका मिनिटात 40 सफरचंदे झाडावरून वेचून बास्केटमध्ये टाकेल, असा दावा केला गेला होता. कंपनीने हा रोबो झाडावरील 90 टक्के फळे ओळखेल, असाही दावा केला होता. मात्र, शेतीतील वैविध्यपूर्ण वातावरणात टार्गेट ओळखण्यात म्हणजे फळे ओळखून वेचण्यात या रोबोला अनेक मर्यादा येत होत्या. प्रतिसादाअभावी आता ही कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. ॲग्री रोबो क्षेत्रात इस्त्रायलच्या एफएफ रोबोटिक्स आणि टेवेल; तसेच ऑस्ट्रेलियाची राईप रोबोटिक्स या तीन अग्रगण्य कंपन्या आहेत. “टेवेल”ने गेल्यावर्षी “फ्लाइंग हार्वेस्टर”साठी रोबोटिक्समधील नावीन्य आणि कल्पकतेचा जागतिक पुरस्कारही मिळविला आहे. आता यापूर्वीच्या रोबोना आलेल्या मर्यादा व अडचणी ओळखून “टेक्निऑन”चे (इस्त्राईल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) प्रा. अमीर देगानी यांच्या नेतृत्त्वात अधिक परिपूर्ण, सर्वसमावेशक अशा शेतीतील रोबोचा प्रोटोटाईप विकसित करण्यात आला आहे.

शेतीतील परिस्थितीचे विश्लेषण करून स्वतः निर्णय घेईल नवा रोबो

प्रा. देगानी सांगतात, “आजवर आपण पाहत असलेल्या रोबोटिक आर्म्सना पूर्वनियोजित ऑपरेशन कसे करावे, हे माहिती असले तरी, त्यांची संवेदना, तसेच निर्णय घेण्याची क्षमता मर्यादित असते आणि शेतीसाठी ते योग्य ठरत नाही. शेतीचे जग हे पूर्वनिर्धारित प्रोग्रॅम केलेल्या रोबोसाठी अधिक कठीण ठरते. प्रकाश आणि बाहेरील परिस्थितीत होणारे चढ-उतार, या बदलांमुळे शेती म्हणजे रोबोजना एक अनिश्चित, अनोळखी वातावरण वाटू लागते. त्यांचे सेन्सर काम करेनासे होतात. त्यामुळे शेतीसाठीच्या रोबोमध्ये जटिल संवेदना आणि निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने, हा नवा रोबो विकसित करण्यात आला आहे, ज्यामध्ये फळबागांमध्ये आवश्यक ऑपरेशन्स करण्यासाठी एक किंवा अनेक लहान आकाराचे ड्रोन वापरण्याची क्षमता आहे. हा रोबो सध्या मजुरांवर येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत खूप महागही नसेल, अन्यथा अनेक शेतकऱ्यांना ते परवडणार नाही. टेक्निऑनच्या इस्रायली संशोधकांचा हा नवा रोबो जगभरातील शेतमजुरांच्या समस्येवर उत्तम पर्याय ठरेल व तोडणी आणि कापणीची प्रक्रिया अधिक सोपी, वेगवान व स्वस्त होऊ शकेल.”

 

फळबागांमध्ये असे काम करेल नवा रोबो

प्रा. अमीर देगानी आणि त्यांच्या टीमने विकसित केलेला नवा रोबो बागेत गस्त घालून सर्व झाडांमधून चक्कर मारेल आणि विविध “एआय” (कृत्रिम बुद्धिमत्ता) फीड प्रोग्रॅमनुसार पिकलेली फळे शोधून, ते नेमके कुठे-कुठे आहेत, याची नोंद घेईल. यापूर्वीची रोबो बागेचे वातावरण व जमिनीवरील स्थिती एकसंध नसल्याने गोंधळात पडायचे. त्यात बागेतील बहुतेक झाडे एकसारखीच नसल्यामुळे जीपीएस रिसेप्शन मार्किंग विश्वसनीय नोंदी घेत नव्हते. या अडथळ्यामुळेतच नव्याने विकसित तंत्रात ग्राउंड मोबाईल रोबो आणि ड्रोन यांच्यात संपर्क-समन्वय, संबंध प्रस्थापित करण्याच्या कल्पनेला जन्म दिला गेला. लहान ड्रोनचा वापर करून रोबो फळबागा काढण्यासाठी आवश्यक ऑपरेशन्स करेल. कमी उंचीवर उडणारे लहान ड्रोन फळबागेचे 360 अंधात निरीक्षण करतील. हे ड्रोन एकेका झाडाभोवती फिरून बागेतील प्रत्येक झाडाची तपशीलवार त्रिमितीय प्रतिमा (थ्री-डी इमेज) तयार करेल. त्यातून प्रत्येक झाडाला डिजिटल ओळख प्रदान केली जाईल. शेतीचे अचूक, आधुनिक मॉडेल प्रतिबिंबित करणे, कापणी/तोडणी प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी आवश्यक आहे. पुढे जाऊन प्रत्येक झाडासाठी सर्वोत्तम परिस्थिती प्रदान करून उत्पादनाचे प्रमाण वाढवणे शक्य होईल. प्रत्येक झाडाला/रोपाला आवश्यकतेनुसारच पाणी, खत दिले जाईल. त्यामुळे संसाधनांचा अतिरिक्त वापर वाचवणे शक्य होईल. याशिवाय, कीटकनाशकांच्या संभाव्य धोकादायक परिणामांपासून बचाव करण्याचाही मार्ग दिसू शकेल. प्रत्येक झाड/रोपाच्या आसपास नेव्हिगेट कसे करावे, अचूक यांत्रिक ऑपरेशन्स कसे करावे आणि पिकलेल्या फळांची तोडणी, फुलांतील परागकणाची वेचणी, कशी करावी हे माहित असलेले रोबो भविष्यात अधिक उत्पादनक्षम आधुनिक शेतीचे नवे मार्गही दाखवू शकतील.

 

 

रोबोच्या तंत्रानुसार बदलावी लागेल फळबागांची रचना

भविष्यात मानवी मजुरांकडून रोबोकडे शेती शिफ्ट होण्याची चिन्हे आताच दिसत आहेत. त्याशिवाय, वाढीव खाद्यान्न उत्पादनाची पूर्तता होऊ शकणार नाही. यंत्रांच्या सोयीसाठी जगभरात धान्य शेतीची रचना बदलली आहे. त्याच धर्तीवर आता फळबागेची रचना देखील बदलण्याची शक्यता आहे. झाडे वाढवण्याचा मार्गही बदलेल आणि रोबोटिक कापणी, वेचणीसाठी योग्य अशा प्रकारे बागांचे डिझाइन केले जाईल. मानव आणि रोबो दोघांसाठीही सुलभ कापणी,वेचणी, तोडणी सक्षम करण्यासाठी डिझाइन केली जात आहेत. सर्वात कार्यक्षम कॉन्फिगरेशन निश्चित करण्यासाठी सध्या अभ्यास सुरू आहेत. प्रा. देगानी
म्हणतात, “कालांतराने कमी जमीन, कमी संसाधने आणि कमी मनुष्यबळ असेल, यावर सातत्याने उपाय शोधण्याची गरज राहिलाच. मात्र,आधुनिक शेतीतही शेतकरी महत्त्वाचाच राहील; पण त्याला प्रत्यक्ष अंगमेहनतीची कामे स्वतः अथवा मजुरांमार्फत करून घ्यावी लागणार नाहीत. शेत, फळाबागांचा डेटा केंद्रस्थानी असेल, त्याच्या आधारे योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. रोबो फील्डमधील कार्ये पार पाडतील. आज जरी हे अशक्यप्राय आणि स्वप्नरंजन वाटत असले, तरी भविष्यात लवकरच जगभरातील छोट्या-छोट्या शेतातही हे चित्र दिसेल, यात शंकाच नाही.

The Robotic Farmers of the Future : Israeli researchers from the Technion are developing a solution that addresses the shortages in seasonal harvesters: robots that pick fruit for us.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: आधुनिक शेतीइस्त्राईल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीइस्त्रायली शेतीतंत्रकृषी रोबोटेक्निऑनड्रोन तंत्रज्ञानफ्लाइंग हार्वेस्टरभविष्यातील फळबागमजुरांची टंचाईरोबोटिक शेतमजूरॲग्री रोबोॲबंडंट रोबोटिक्स कंपनी
Previous Post

मराठवाड्यातील पिकांवर गोगलगायीचे संकट; धनंजय मुंडे यांनी केली नुकसानभरपाईची मागणी

Next Post

राज्यात शुक्रवारपर्यंत मुसळधार कायम, “रेड ॲलर्ट” जारी; देशातील 25 राज्यात धुवां”धार”

Next Post
राज्यात शुक्रवारपर्यंत मुसळधार कायम, “रेड ॲलर्ट” जारी; देशातील 25 राज्यात धुवां”धार”

राज्यात शुक्रवारपर्यंत मुसळधार कायम, "रेड ॲलर्ट" जारी; देशातील 25 राज्यात धुवां"धार"

Comments 3

  1. Pingback: भारतातील एक अनोखे गाव जिथे दुकाने आहेत, पण दुकानदार नाही; आजवर कधीही झालेली नाही चोरी-लबाडी! - Agro World
  2. Pingback: युक्रेन-रशिया युद्धामुळे जग अन्न संकटाच्या फेऱ्यात! - Agro World
  3. Pingback: अमेरिकेत नव्या पिढीसाठी नव्याने लिहिली गेलीय डॉ. नॉर्मन बोरलॉग यांची जीवनगाथा; सुप्रसिद्ध बालस

ताज्या बातम्या

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

बंगालच्या उपसागरात

बंगालच्या उपसागरात दोन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रभर कोसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 18, 2025
0

पहा राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती

पहा राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.