• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

इस्राइल ॲग्रीकल्चर ते प्लॅस्टिकल्चर

इस्राइल दुधा - मधाचा देश

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in यशोगाथा
0
इस्राइल ॲग्रीकल्चर ते प्लॅस्टिकल्चर
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT
  • अर्ध्याहून अधिक भाग वाळवंटाने व्यापलेल्या इस्राइलची लोकसंख्या ८,५००,००० लाख  इतकी आहे. देशात पावसाचे प्रमाण नगण्य, एकही मोठी नदी नाही, क्षेत्रफळ कमी, पाऊसमान कमी, सतत चोहू बाजूंनी शत्रूची आक्रमणे, मृत समुद्र किनारा लाभलेला, पाण्याचं दुर्भिक्ष असणारा हा देश जगभरातून हाकललेल्या मूठभर माणसांनी दिशा देऊन घडविला आहे. जगाच्या पाठीवर दोनशे सत्तावन्न देश असतानांही इस्राईल हा एकमेव देश असा आहे कि ज्याचा कृषि क्षेत्रातील दबदबा व तंत्रज्ञान संपूर्ण जगाने मान्य केले आहे. आकारमानाने महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या जवळपास असलेल्या व दक्षिण पश्चिम आशियामध्ये स्थित इस्राइलला भारताच्या स्वातंत्र्याच्या जवळपास एक वर्षानंतर म्हणजे 14 मई 1948 ला स्वंतत्र मिळाले. ज्युडाईझम, इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी या तीन महत्वाच्या धर्मांची पवित्र भूमी असलेला व विविध अडीअडचणीत जन्मलेला हा देश आपल्या भारताइतक्याच वयाचा झाला आहे.  कृषी व संरक्षण या क्षेत्रातील या देशाचे योगदान संपूर्ण जगाला प्रेरणादायी असे आहे.

भारत व इस्त्राइल
            इस्त्राइलला भारताप्रमाणेच ५,००० वर्षांहून अधिक कालावधीचा वैभवशाली इतिहास व संस्कृती आहे.  इस्त्राइल हा जगभरातील ज्यू लोकांनी मिळून बनलेला देश असून येथे सुमारे ७० हून अधिक देशांतून ज्यू लोकं आले आहेत. विशेष म्हणजे यापैकी सुमारे एक लाख ज्यू भारतातून आले आहेत. मुंबई-कोकण परिसरातील मराठी भाषिक बेने-इस्त्राईली लोकांची संख्या यात सर्वात अधिक असून केरळ मधील कोचीन ज्यू आणि मिझोराममधील बेने-मेनाशे या ज्यू समुदायांचा त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे भारत हा असा एक देश आहे जेथे ज्यू लोकं २००० हून अधिक वर्षे गुण्यागोविंदाने, कोणत्याही त्रासाशिवाय रहात आहेत. जगभरात ज्यू धर्मिय लोकांचा छळ झाला त्याला भारत मात्र अपवाद आहे. इस्त्राइलमधील ज्यू धर्मियांची संख्या साधारणतः ७६% असून मुस्लिम, ख्रिश्चन, ड्रूझ आणि अन्य अल्पसंख्यांक समुदायांचे लोकंही इथे मोठ्या प्रमाणात आहेत.
भारताप्रमाणेच इस्त्राइलमध्येसुद्धा जैवविविधता आहे. पश्चीमेकडे भूमध्य समुद्र, पूर्वेकडे मृत समुद्र आणि दक्षिणेकडे तांबड्या समुद्राचे किनारे, बर्फाच्छादित शिखरे, हिरवीगार कुरणे तसेच ओसाड वाळवंटे अशी नैसर्गिक विविधताही पुष्कळ आहे. या दोन्ही देशातील नैसर्गिक परिस्थितीप्रमाणेच संस्कृतीदेखील सारख्याच आहे. भारताप्रमाणेच ज्यूईश पारंपारिक कालगणना चंद्रावर आधारीत आहे त्यांचा महिना देखील प्रतिपदेला सुरु होतो. ज्यू लोकांचे नवीन वर्षं ‘रोश हशन्ना’ हे सप्टेंबर किंवा  ऑक्टोबरमध्ये येते आणि ब-याचदा आपल्याकडे त्यादिवशीच नवरात्रींना प्रारंभ (घटस्थापना) होतो. त्यांचा सर्वात पवित्र सणं ‘यॉम किप्पुर’ आणि आपला दसरा एकाच दिवशी येतात. रंगीबेरंगी ज्यूईश कार्निव्हल म्हणता येईल असा ‘पूरिम’ हा सण आपल्याकडील आवडत्या  ‘होळी’ दरम्यान येतो.

चौकट
इस्त्राइल व भारतातील महत्वाचे सण आणि उत्सव हे शेतीच्या कॅलेंडरशी निगडीत असतात म्हणजेच साधारणतः सुगीच्या दिवसांत साजरे केले जातात. महत्वाचे म्हणजे आपल्याप्रमाणेच त्यांचे सणं आणि उत्सव हे केवळ मौजमजेसाठी नसतात तर आपल्या देशांच्या अविभाज्य भाग असलेल्या आपल्या समृद्ध आणि वैभवशाली इतिहासांतील महत्वाच्या घटनांचे स्मरण म्हणून ते साजरे केले जातात.

भौगोलिक स्थिती
दक्षिण पश्चिम आशिया मध्ये स्थित इस्त्राईल हा कृषी तंत्रज्ञानात जरी अग्रेसर असला तरी वास्तवात देशाचा भूगोल नैसर्गिकदृष्ट्या शेतीस अनुकूल नाही . निम्म्याहून अधिक भूभागात वाळवंट आहे. जलसंपत्तीचा अभाव व प्रतिकूल हवामान शेतीस अनुकूल नाही. केवळ 20% भूभाग नैसर्गिकरित्या शेतीयोग्य आहे.  येथे पाण्याची कमतरता ही एक मोठी समस्या आहे. सप्टेंबर ते एप्रिल दरम्यान पाऊस पडतो. देशभरात असमान प्रमाणात पाऊस पडतो.  उत्तरेकडील भागात २८  इंच  तर दक्षिणेस १ इंचपर्यंत कमीपर्यंत पाऊस पडतो.  वार्षिक पर्जन्यमानाच्या 75%  पाणी शेतीसाठी वापरले जाते.  इस्त्राईलचे बहुतेक गोड्या पाण्याचे स्त्रोत पंपिंग स्टेशन, जलाशय, कालवे आणि पाइपलाइनचे जाळे हे आहे. हे सर्व स्रोत नॅशनल वॉटर कॅरियरला जोडलेले आहे .त्याद्वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे पाणी हस्तांतरित केले जाते.
शेतीचे प्रकार
       इस्राईलच्या नागरिकांना ५००० वर्षाचा शेतीचा वारसा असून, शेती त्यांच्यासाठी केवळ उपजीविकेचे साधन नसून त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. इस्राईलची लोकसंख्या गेल्या ७० वर्षांत तब्बल 12 पट वाढली, परंतु शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांचं प्रमाण 60% हून खाली येत आज सुमारे 3% आहे. असं असूनही इस्राईल अन्नधान्याच्या उत्पादनात जवळपास स्वयंपूर्ण असून मोठ्या प्रमाणावर कृषीमालाची निर्यात करतो. आज इस्राईलचे एकूण कृषी उत्पन्न 25,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक असून सुमारे 6,000 कोटी रुपयांच्या कृषीमालाची निर्यात केली जाते. शेतीचे दोन मुख्य प्रकारात विभाजन केले आहे. किब्बुत्झ व मोशाव
किब्बुत्झ :- 1909 साली किब्बुत्झ ही शेती पद्धत सुरु झाली. अल्पावधीत ती सर्वत्र पसरली. सहकार हे किब्बुत्झचं वैशिष्ट्यं आहे. स्री-पुरूष समानता, कामाची विभागणी, मुलांचे सामुहिक संगोपन, आई-वडिलांनी शेतात काम करायचे आणि मुलांना सामुहिक पाळणाघरात एकत्र वाढवायचे, एक किब्बुत्झ एक स्वयंपाकघर अशा अनेक गोष्टी किब्बुत्झमध्ये असतात. वैयक्तिक स्वार्थाला यात बिलकूल स्थान नसते. मुलांनी शाळेनंतर कोणतं शिक्षण घ्यायचं याचा निर्णय मुलं किंवा त्यांचे पालक न करता ग्रामसभेद्वारे केला जायचा. जे काही आहे ते समाजाचे अशी ज्वाजल्य देशभावना त्या गटात असते.  भविष्यात व्यक्तीवादाला महत्त्व प्राप्त होऊ लागल्यानंतर किब्बुत्झ चळवळ ओसरली आणि कालांतराने त्यात अनेक बदल केले गेलेत. पण इस्राईलच्या शेतीचा विकास व  पाया रचला तो किब्बुत्झ चळवळीनेच.
मोशाव:- बदलत्या जागतिकीकरणाच्या स्पर्धत 110 वर्षांनंतर किब्बुत्झमध्ये बदल घडून आले. अनेक किब्बत्झुनी खाजगीकरणाचा मार्ग स्विकारून सहकारी तत्त्वावर काम करणार्‍या कंपन्या स्थापन केल्या ज्यांना मोशाव म्हटलं जातं. किब्बुत्झमध्ये जमिनीची मालकी सामुदायिक असते. तर मोशावमध्ये ती वैयक्तिक असते. मोशावमध्ये कोणतं पिक घ्यायचं ते शेतकरी स्वत: ठरवतात, पण त्याचं व्यवस्थापन आणि विपणन इ. गोष्टी व्यावसायिकदृष्ट्या सर्वांनी ठरवून पाहिल्या जातात. आज इस्राईलमध्ये सुमारे 270 किब्बुत्झ आणि 450 मोशाब आहेत. शेतीबरोबर अन्न-प्रक्रिया, कृषी-पर्यटन, अपारंपारिक ऊर्जा निर्मिती अशा अनेक क्षेत्रात ती काम करतात. काही किब्बुत्झ हाय-टेक कंपन्या देखील चालवितात. ऑलिव्ह महोत्सव, वाईनरीची यात्रा, चीज व दुग्धपदार्थ निर्मिती, वाळवंटातील शेती, ग्रामोद्योग अशा अनेक कल्पना कृषी पर्यटनासाठी विकसित केल्या गेल्या असून त्याद्वारे शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते.

पिके
      हवामानातील विविधतेमुळे देशात विविध पिके घेतली जातात.त्यात प्रामुख्याने गहू,ज्वारी,मका यासारखी पिके 215,000 हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते. यापैकी 156,000 हेक्टर क्षेत्र हिवाळी पिकांसाठी वापरले जाते. भूमध्य किनारपट्टीच्या मैदानावरील शेतीमध्ये मुख्यतः फळ आणि भाजीपालापिके घेतली जातात. यामध्ये लिंबुवर्गीय फळे, एवोकॅडो, किवीफ्रूट, पेरू आणि आंबे हे उत्पादन घेतले जाते. टोमॅटो, काकडी, मिरची आणि स्थानिक भाजीपाल्याचे उत्पादन सामान्यतः देशभरात घेतले जाते. हिवाळ्यातील महिन्यांमध्ये खरबूज पिकतात. देशातील उपोष्णकटिबंधीय भागात केळी आणि खारीक तयार होतात, तर उत्तर डोंगरांमध्ये सफरचंद, नाशपाती आणि चेरीचे उत्पादन घेतले जाते. शिवाय येथील द्राक्षबागामुळे देशातील वाइन उद्योगही जागतिक स्तरावर भरभराटीला आला आहे.
28,570 हेक्टरवर कापूस लागवड केली जाते. हेक्टरी ५० क्विंटल कच्च्या कापसाचे उत्पादन मिळते. त्यातील सर्व क्षेत्र हे ठिबक सिंचनाखाली आहेत कोणत्याही शेताला मोकळे (पाटाने) पाणी दिले जात नाही.

सूक्ष्म सिंचन इस्रायलच्या शेतीचा आत्मा.

इस्राईलमधील 65% कोरडवाहू जमीन दक्षिणेकडे असून गोड्या पाण्याचे 80% स्रोत उत्तरेकडे आहेत. त्यावर उपाययोजना म्हणून इस्राईलने महत्त्वकांक्षी राष्ट्रीय जलजोडणी योजना राबविली. या प्रकल्पाद्वारे इस्राईलच्या उत्तरेकडील पाणी पाईपलाईनद्वारे सुमारे 400 कि.मी. दक्षिणेकडे आणले जाते. त्याचबरोबर जमिनीखालच्या पाण्याचे रिचार्जिंग समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी बनवणे आणि सांडपाण्याचं शुद्धीकरण असे अनेक उपाय अवलंबण्यात आले. समुद्राचे पाणी गोडे बनविण्याचा जगातील सर्वात मोठे प्रकल्प इस्राईलमधील अश्कलॉन व हदेरा येथे आहेत. आज इस्राईल उपलब्ध पाण्याच्या सुमारे 80% पाण्यावर पुनर्प्रक्रीया करते. गोड्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जातो तर सांडपाणी पेयजलाएवढे शुद्ध करून ते शेतीला दिले जाते. सिंचनाच्या शेतजमिनीचे क्षेत्र १९४८  मध्ये ७४,०००  एकर  वरून आज सुमारे ४६०,०००  एकर पर्यंत वाढले आहे. इस्त्रायली शेतीमालाचे उत्पादन १९९९  ते २००९  दरम्यान २६ % ने वाढले आहे. कारण सूक्ष्म सिंचन हा तर इस्रायलच्या शेतीचा आत्मा आहे. येथे तयार होणारी बहुतेक कृषी उत्पादने स्थानिक बाजारपेठेतच विक्री केले जातात. तर काही उत्पादने युरोपात निर्यात केली जातात. ज्याला जगात तोड नाही असे कृषी क्षेत्रातील अत्युच्च तंत्रज्ञान येथील शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे आणि हे तंत्रज्ञान जगाला विकण्यावर इस्राइलचा मुख्य भर आहे. याच तंत्रज्ञानाच्या जोरावर काटेकोर शेती आणि प्लॅस्टिकल्चरचा वापर करून इस्रायल शेती तंत्रज्ञानाचा जागतिक मार्गदर्शक बनला आहे.

दुग्धोत्पादन
इस्राइलला दुधा-मधाचा देश असे म्हटले जाते आणि खरोखरच त्याने हे बिरुदावली सार्थ ठरविली आहे. २०११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या देशाच्या सांखिकी हवालानुसार देशातील गायींचे दुग्ध उत्पादन हे १०२०८ किलोग्रॅम (जवळपास १०००० लिटर ) होते. हे अमेरिकेलाही मागे टाकते तेथील गायींचे दुग्धोत्पादन प्रती गाय 9,331 किलोग्रॅम, जपान (7,497), युरोपियन युनियन (6,139) आणि ऑस्ट्रेलिया (5,601) इतके आहे.
आज इस्रायलची दूध उत्पादकता जगात सर्वोच्च आहे. येथील गाय एका वेतामागे 11 हजार लिटर दूध देते. उच्च संशोधनातून हे शक्य झाले आहे. 20 व्या शतकाच्या सुरूवातीला इस्राईलमध्ये दुधाचं उत्पादन नगण्य होते. इस्राईली लोकांनी युरोपातील दुधाळ गायींचे अरबस्थानातील उष्णतेत चांगले दुध देणार्‍या गाईंशी संकर करून इस्राईली गाईंच्या सर्वोत्तम प्रजाती तयार केल्या. इस्राईलमधील प्रत्येक दुध देणार्‍या जनावरांचा रेकार्ड ठेवला जातो. गोठ्यांमधील तापमान नियंत्रित केले जाते. गाईच्या पोटात इलेक्ट्रॉनिक चिप सोडून त्याद्वारे गाईच्या आरोग्याचे मापन केले जाते. गाईच्या मोकळ्या जागेत चरण्यावर प्रतिबंध असून यंत्राद्वारे गाईचा आहार तयार केला जातो.व दूधही यंत्राद्वारेच काढले जाते.
मधमाशीपालन
      100 वर्षांहून अधिक काळापासून इस्त्राईलमध्ये मधाची व्यावसायिक निर्मिती केली जात असली तरी हजारो वर्षांपूर्वीपासून येथे या उद्योगाचे अस्तित्व आहे. आज देशात मधउत्पादन करण्यासाठी मधमाश्या पाळणे हा एक मोठा उद्योग आहे ज्याचे उत्तर पासून दक्षिण पर्यंत देशभरात १०,००,००० पियर्स पसरलेले आहेत. याद मोर्डेचाईचामधील दक्षिणी किबुट्झ हे  इस्त्रायली मध उद्योगाचे प्रणेते आहे. १९३६ मध्ये इस्रायलमध्ये तैनात ऑस्ट्रेलियन आणि ब्रिटीश सैनिकांनी किबुट्झला मधमाश्या पाळण्याचे तंत्र शिकवले.
1948 मध्ये स्वातंत्र्ययुद्धानंतर जेथे मधमाशीपालन होत असे त्यांनी इस्रायलमधील मध उद्योगाला एकत्रित केले आणि नाविन्यपूर्ण पद्धती आणि प्रगत गुणवत्ता नियंत्रण तंत्राचा वापर करून जागतिक स्थरावर नेले. या काळात मोर्दचाई हनी सर्वात प्रसिद्ध आणि देशव्यापी मधाचा ब्रांड विकसित झाला. आज जगभरातील मधमाश्या अत्यंत बिकट परिस्थितीत आहेत, बदलत्या नैसर्गिक वातावरणामुळे त्यांची संख्या धोक्याने कमी होत आहे. सुदैवाने कित्येक नाविन्यपूर्ण रणनीतींमुळे, इस्त्राईलच्या मधमाश्यांवर इतर देशांच्या तुलनेत फारच कमी परिणाम झाला आहे. त्यामुळे येथील मधमाशांची संख्या स्थिर असून हा व्यवसाय अजूनही प्रगतीचे नवनवीन आलेख तयार करीत आहे.
सद्यस्थितीत देशातील इतर बर्‍याच भागात दर्जेदार मध उत्पादन करणारी शेकडो मधमाशीपालक आहेत. स्थानिक पर्यटक आणि विदेशी पर्यटकांना मधमाश्या पाळण्याच्या आणि त्यांच्या जीवनशैलीविषयी कार्यशाळांमध्ये भाग घेणे यासाठी सुविधा उपलब्ध आहे. आजारपणातील संक्रमणांवर लढा देण्यास आणि जखमांना बरे करण्यात वापरले जाणारे रॉयल जेली आणि प्रोपोलिस यासारख्या मधमाश्याद्वारे तयार केलेल्या माधविषयी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी व मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केल्या जातात.
कुकुटपालन व मत्स्यपालन
    इस्रायलमधील पोल्ट्री उद्योग आज जगात सर्वोत्तम आहे. पोल्ट्री खाद्य, उत्पादन, ब्रीडर फार्म, हॅचरीज, व्यावसायिक ब्रॉयलर फार्म्स, कोंबड्यांचे कत्तलखाने, प्रक्रिया, विक्री या प्रत्येक टप्प्यावर येथील शेतकऱ्यांनी नेत्रदीपक प्रगती केली आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब कसा वापरायचा, याचा धडा इस्रायलने जगाला दिला. शिवाय मत्स्योत्पादनातही या देशाने कमाल करून दाखवली. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सागरी व गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीत नवे मापदंड उभे केले. समुद्राचे खारे पाणी वळवून ‘केजफिश फार्मिंग’ हा प्रकार अत्यंत यशस्वी केला आहे. गेल्या वर्षी भारताचे पंतप्रधान इस्राइल दौऱ्यावर गेले होते त्यावेळी समुद्राच्या खऱ्या पाण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून गोड्या पाण्यात रुपांतर केले व ते पाणी पंतप्रधानांनी पिल्याचे दृश्य आपण सर्वांनी माध्यमामध्ये पहिले असेलच.


फळ आणि भाज्या
      इस्राएलमध्ये चाळीसपेक्षा जास्त प्रकारची फळे पिकतात. यामध्ये लिंबुवर्गीय फळे, द्राक्ष, टेंगेरिन्स आणि डाळिंब यासह, इस्त्राईलमध्ये विकसित करण्यात आलेल्या  द्राक्षाचे आणि एक पोमिलो यांचे संकर pomelit हे फळ पिकविले जाते. लिंबूवर्गीय व्यतिरिक्त, अव्होकाडोस, केळी, सफरचंद, चेरी, प्लम्स, नेक्टायरीन्स, द्राक्षे, खजूर, स्ट्रॉबेरी, काटेरी नाशपाती, पर्सिमॉन, लोक्वाट (शेक्स) आणि डाळिंब याचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. जपान नंतर इस्त्राईल लोक्वाट (शेक) उत्पादनात आघाडीवर आहे.
१९७३ मध्ये हेम राबिनोविच आणि नचूम केदार या दोन इस्त्रायली शास्त्रज्ञांनी गरम हवामानातील सामान्य टोमॅटोच्या तुलनेत हळू पिकणारे टोमॅटोचे वाण विकसित केले. त्यांच्या संशोधनामुळे जगातील पहिल्या लांब शेल्फ-लाइफ कमर्शियल टोमॅटोच्या वाणांचा विकास झाला. या शोधामुळे इस्रायलमधील शेती अर्थशास्त्राचा कायापालट झाला आणि बियाणे निर्मिती व निर्यातीला प्रोत्साहन मिळाले. याचा जागतिक स्तरावरही परिणाम झाला आणि दीर्घकाळ टिकण्याच्या क्षमतेमुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढ झाली. पूर्वी, शेतकऱ्याचा 40% माल खराब होत असे तो प्रश्न या वाणामुळे संपला. अश्याच प्रकारचे संशोधन विविध फळ,भाजीपाला पिकात देशातील संशोधकांनी केले आहे.
फुले

इस्त्राईलच्या उत्पादित फुलापैकी मोठ्या प्रमाणात फुले निर्यात केली जातात. 2000 च्या  सरकारी आकडेवारीनुसार फुलांची निर्यात ६० दशलक्ष डॉलरच्या पुढे गेली. सर्वात जास्त फुलाचे क्षेत्र म्हणजे कॅमेलोसीयम (waxflower) आणि त्यानंतर गुलाबाचा क्रमांक लागतो, जो सरासरी 214 हेक्टर क्षेत्रावर घेतला जातो. लिली, गुलाब आणि ट्यूलिप्ससारख्या पश्चिमेतील वातावरणास अनुकूल असलेल्या फुलांच्या व्यतिरिक्त, इस्त्राईल वाळवंटातील उत्पादित वाणांची निर्यात करतो. विशेषत: हिवाळ्यातील महिन्यांमध्ये पारंपारिक युरोपीय फुलांचा पुरवठादार म्हणून जागतिक स्तरावरील फुलांच्या उद्योगात प्रमुख निर्यातदार झाला आहे.
अ‍ॅग्रीटेक प्रदर्शन
इस्राईलमध्ये शेतीसाठी मनुष्यबळाचा तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे इस्राईलने शेतीचे यांत्रिकीकरण करण्यावर भर दिला असून प्रति शेतकरी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. 1955 साली एक इस्राईली शेतकरी 15 माणसांच्या पुरेसं अन्न पिकवायचा. आजचा इस्राईली शेतकरी 100 माणसांची अन्नाची गरज भागवतो. आज इस्राईलचे एकूण कृषी उत्पन्न 25,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक असून सुमारे 6,000 कोटी रुपयांच्या कृषीमालाची निर्यात केली जाते. आपल्या गरजेच्या 70% कृषी उत्पन्न इस्राईलमध्ये पिकते. इस्राइलने विकसित केलेले हेच तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी जगभरातून शेतकरी येथे भेट देतात. जगातील इतर कोणत्याही देशात आयोजित होत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात इस्राईलमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन आयोजित केले जाते. अ‍ॅग्रीटेक कृषी प्रदर्शन या नावाने आयोजित प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय कृषी तंत्रज्ञान, हायटेक फार्मिंग, नवनवीन प्रगत पिकांची वाण, डेअरी व कृषी आधारित पूरक व्यवसाय यातील नवनवीन माहिती या दर तीन वर्षांनी एकदा आयोजित करण्यात येणाऱ्या अ‍ॅग्रीटेक प्रदर्शनाच्या माध्यमातून जगभरातून येणाऱ्या शेतकऱ्यांना मिळते. हे प्रदर्शन विविध देशातील कृषी मंत्री, कृषीतज्ञ, कृषी व्यावसायिक आणि हजारो शेतकऱ्यांना आकर्षित करते. कृषी क्षेत्रातील अद्ययावत घडामोडी आणि प्रगत कृषी तंत्रज्ञान, विशेषत: सिंचन, जल व्यवस्थापन, कोरडवाहू शेती, हरितगृह, नवीन बियाणे वाणांचा विकास आणि सेंद्रिय शेतीची माहिती व तंत्रज्ञान त्याबाबत या माध्यमातून माहिती मिळते.
सरकारी नियमन

देशात उत्पादित पिकासाठी दर स्थिर आहेत.  उत्पादित दूध, अंडी, कुक्कुट आणि बटाटे यासारख्या पिकांना स्थिर दर लागू आहेत.  इस्त्राईलचे सरकार शेती खर्चात कपात करण्यास प्राधान्य देते. ज्या पिकांसाठी पुरेसे फायद्याचे बाजार अस्तित्त्वात नाहीत अशांचे उत्पादन रोखले जाते. कृषी मंत्रालय देशाच्या कृषी क्षेत्राची देखरेख काटेकोरपने करते.
इस्राईलमध्ये शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा पीक पद्धतीनुसार कोटा ठरवून दिला जातो. ठरवून दिलेल्या कोट्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पाणीपुरवठा करणे बंधनकारक आहे. तथापि, ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा जादा पाणी हवे असल्यास शासनाकडे तशी मागणी करावी लागते. शासन पाण्याच्या आवश्यकतेची खात्री करून नेहमीपेक्षा दुप्पट दराने पाणीपुरवठा करते. पाण्याच्या अशा प्रकारे प्रचंड मर्यादा असल्याने प्रत्येक शेतकऱ्याने नियोजनबद्ध रीतीने ठिबक व फवारा सिंचन पद्धतीचा पीक प्रकारानुसार 100 टक्के वापर केलेला आहे. इस्राईलमध्ये पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्यापैकी 60 टक्के पाणी शेतीसाठी, दहा टक्के पाणी उद्योगधंद्यासाठी व 30 टक्के पाणी घरगुती वापरासाठी दिले जाते

संगणक नियंत्रित ठिबक सिंचन :-
      इस्राईलमध्ये सिंचन पद्धतीबाबत अतिशय सखोल अभ्यास करून संगणक नियंत्रित ठिबक व फवारा सिंचन पद्धतीचा वापर सुरू केला आहे. सिंचन व्यवस्थेकरिता इस्राईलच्या शास्त्रज्ञांनी प्रत्येक झाडाचे वैशिष्ट्य शोधून काढले आहे. त्याच्या वयोमानाप्रमाणे तसेच जमिनीची प्रत, हवामान या सर्व बाबींचा बाराकाव्याने अभ्यास करून त्या झाडास पाणी किती व कधी लागेल त्या सर्व बाबी ठरविण्यात आल्या. त्याची सर्व माहिती संगणकास पुरवून ठिबक सिंचनाचा संच संगणकास जोडला जातो.या संगणकाद्वारे पिकास आवश्यक तेवढेच व आवश्यक वेळी पाणी दिले जाते. ठिबक सिंचनाचा वापर करताना पाण्याच्या प्रत्येक थेंबाच्या जाडीचाही त्यांनी विचार केला आहे. एखाद्या झाडास साधारणपणे आठ तासात किती पाणी लागते, त्यासाठी किती जाडीचा थेंब व किती वेगाने तो ड्रीपरमधून बाहेर पडावा अशा प्रकारचे त्या ड्रीपरला छिद्र पाडली जातात. ठिबक सिंचन पद्धतीद्वारे द्रवरूप खते झाडाच्या मुळाजवळच दिली जातात. त्यामुळे खतांचा अपव्यय टाळून त्यांचा योग्य मोबदला मिळतो. रिमोट कंट्रोल बसविलेले संगणक हे काम माणसापेक्षा अतिशय बिनचूक व चांगल्या पद्धतीने करत असल्यामुळे संगणकाद्वारे पाण्याचे व्यवस्थापन करणाऱ्या काही कंपनी इस्राईलमध्ये निर्माण झाल्या आहेत.

इस्राइल व महाराष्ट्र 
आज रोजी देशात जे काही ज्यू नागरिक हे भारतातून आलेले आहेत त्यात ७०% हे मराठी आहेत. ह्या कारणामुळेच की काय, इस्राइल मध्ये स्थलांतरित झालेल्या बर्‍याच कुटुंबामध्ये आजही मराठी बोलली जाते. जेंव्हा इस्राइल मध्ये भारतीय ज्यू लोकांचे गेट टुगेदर होते, तेंव्हा सुद्धा तिथे मराठी याच भाषेचा प्रामुख्याने वापर केला जातो. सन १९८५ मध्ये, Mr.Noah Massil यांनी मायबोली या नावाने त्रैमासिक सुरु केले. त्याचे आजही ५०० च्या वर नियमित सभासद आहेत. त्यावेळी इस्राइल मध्ये मराठी टायपिंग अस्तित्वात नव्हते, त्यामुळे मायबोली हे पुर्णपणे हाताने लिहावं लागायचं. Mr.Massil, Mr. Effrahim N.S.  आणि Mr. Aawaskar या तिन्ही मराठी मित्रांनी हे काम मोठ्या आवडीने केले. एक हस्ताक्षरीत प्रत तयार झाली की त्या प्रतिवरुन मग अनेक प्रतींची छपाई व्हायची. तेथील लोक आजही अभिमानाने १ मे ला महाराष्ट्र दिन साजरा करतात. मायबोली हे खर्‍या अर्थाने इस्राइल आणि मराठी बोलणारे लोक ह्यांच्यासाठी एक महत्वाचा असा पूल आहे. पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी ह्यांनी सुद्धा मायबोलीच्या कार्याची दाखल घेतली आहे.

पाण्याची उसनवारी

समुद्रकिनारपट्टीवर असलेल्या जलस्रोतातून दरवर्षी सुमारे 25 कोटी घनमीटर व पर्वतीय विभागातील जलस्रोतातून सुमारे 35 कोटी घनमीटर पाणी उचलले जाते. समुद्रकिनाऱ्याजवळील जलस्रोतातून प्रमाणापेक्षा जास्त पाणी उचलल्यास गोड्या पाण्याची पातळी खाली जाते. त्यामुळे ऍक्विफर (झरे) मध्ये खारे पाणी मिसळून क्षाराचे प्रमाण वाढते त्यामुळे पाणी वापरण्या योग्य राहत नाही. जलस्रोतातून उचललेल्या जादा पाण्याची योग्य पातळी राहावी म्हणून पावसाळ्यात जादा झालेले पाणी बंदिस्त पाइपमधून या जलस्रोतात सोडले जाते. अवर्षणाच्या वेळी जादा उचलले पाणी पावसाळ्यात पुनःश्‍च त्या पातळीवर आणणारा इस्राईल हा जगातील एकमेव देश आहे.

आज इस्राईलचे एकूण कृषी उत्पन्न 25,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक असून सुमारे 6,000 कोटी रुपयांच्या कृषीमालाची निर्यात केली जाते.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: Mr. AawaskarMr.Noah Massilअॅ ग्रीटेक प्रदर्शनइस्राइलकिब्बुत्झदुग्धोत्पादनमधमाशीपालनमोशाव
Previous Post

चक्रीवादळ निर्मिती,नामकरण …

Next Post

मिश्र पिक पद्धतीने शेतीत घडली क्रांती

Next Post
मिश्र पिक पद्धतीने शेतीत घडली क्रांती

मिश्र पिक पद्धतीने शेतीत घडली क्रांती

ताज्या बातम्या

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.