नाशिक : आजचा युवक शेतीकडे वळतो आहे ही अभिमानाची बाब आहे. तसेच हा युवक शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहत आहे. ॲग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनातून नवनवीन संकल्पना घेऊन हे शेतकरी यशस्वी होतील, असा विश्वास खासदार हेमंत गोडसे यांनी आज (शनिवारी) व्यक्त केला. एव्हढेच नव्हे तर ॲग्रोवर्ल्डच्या प्रदर्शनाचा सोमवारी समरोप होत असून शेतकऱ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ॲग्रोवर्ल्डच्यावतीने नाशिक येथील गंगापूर रोडवरील डोंगरे वस्तीगृह मैदानावर दि. 6 ते 9 जानेवारी दरम्यान चार दिवसीय भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मोफत आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी खा. गोडसे यांच्या हस्ते प्रयोगशील शेतकरी, कृषी उद्योजक, कृषी सल्लागार व दुग्ध उत्पादक या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल ढिकले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रा. डॉ. तुळशीदास बास्तेवाड, गोदावरी बायो फर्टीलायझरचे संचालक डॉ. लक्ष्मणराव डोळे, ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण, प्रयोगशील शेतकरी मनोज जाधव यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
खा. गोडसे यांनी पुढे बोलताना सांगितले की पूर्वी कृषी पुरस्कार म्हटले की टोपी, धोतर घातलेले शेतकरी दिसायचे. परंतु ॲग्रोवर्ल्डच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला जिन्स पँट घातलेले तरुण शेतकरी, कृषी उद्योजक दिसून आले. यावरून काळाप्रमाणे सर्व काही बदलत असल्याचे जाणवले. आजचा युवक शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहत आहे. शेती करतांना चांगले नियोजन, आधुनिक यंत्र, नवतंत्राचा वापर केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते, असे सांगून सोलर पंपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अनुदान मिळावे, शेतकऱ्यांवरील भार कमी व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
गट निहाय पुरस्कारार्थी असे
ॲग्रोवर्ल्ड कृषीरत्न पुरस्कार : योगेश सिताराम पिंगळ, संकेत साहेबराव कावळे, निखील दत्तात्रय कुलवडे, धनंजय शंकर ढवळे, जितेंद्र सुरेश कळमकर, रावसाहेब बारकू ढिकले, सुशांत नरेंद्र शिंदे, अजित रावसाहेब महाले, स्वप्नील सुभाष शिंदे, प्रवीण नंदकिशोर राठी, संतोष पांडुरंग मुठाळ, सुदर्शन रामराव घुमरे.
ॲग्रोवर्ल्ड कृषी उद्योजक पुरस्कार: ऋषीकेश विनोद लगड, मयुर बाळासाहेब जाधव, प्रविण रामराव मोगल, योगेश अशोकराव रिकामे, नंदलाल रंगनाथ दळवी, तुषार उत्तम पेखळे, रामदास भिकाजी मुखेकर.
ॲग्रोवर्ल्ड कृषी सल्लागार पुरस्कार : मधुकर वसंतराव शिंदे, संतोष सुभाष हरिश्चंद्रे, अमोल गोरखनाथ साबळे, सुनिल पोपटराव हळदे, सचिन पांडुरंग गवळी.
ॲग्रोवर्ल्ड आदर्श दुग्ध उत्पादक पुरस्कार : गणेश किसान वारुळे, दिपक विष्णू थोरात, अर्जुन सुहास भंडारे, एकनाथ गजानन वाणी, केवळ घेवर जाधव, प्रल्हाद पुंजाजी उफाडे, सुनिल बाबुशा वाघ, संदीप विेशनाथ रहाणे.
ॲग्रोवर्ल्ड कर्मयोगी पुरस्कार : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रा. डॉ. तुळशीदास बास्तेवाड, गोदावरी बायो फर्टीलायझरचे संचालक डॉ. लक्ष्मणराव डोळे.
द्राक्ष विज्ञान मंडळाचे अध्यक्ष वसंत ढिकले यांनी सुत्रसंचालन तर ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.