बागायती कापूस
* पांढर्या माशीचा प्रादुर्भाव समजण्यासाठी व नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे (25 प्रति हेक्टर) शेतात लावावे.
* रस शोषणार्या किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त दिसून आल्यास इमिडाक्लोरोप्रीड 17.8 एस.एल. 2.5 मिली किंवा अॅसीफेट 75 एम पी.10 ग्रॅम किंवा फ्लोनिकॅमिड 50 डब्ल्यू जी. 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
* पांढर्या माशीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त असल्यास ट्रायझोफॉस 40 ई. सी.25 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
* कामगंध सापळयामध्ये सतत 2-3 दिवस, 8-10 गुलाबी बोंडअळीचे पतंग दिसून आल्यास प्रोफेनोफॉस 50 ई.सी. प्रमाणे 20 मिली किंवा लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन 5 ई.सी. 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
* बुरशीजन्य करपा रोगाच्या नियंत्रणासाठी पायरोक्लोस्ट्रोवीन 20 डब्ल्यू़ जी. 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. लाल्या रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास 2 टक्के डायअमोनियम फॉस्फेट खताचे द्रावण 15 दिवसाच्या अंतराने दोन वेळेस पिकावर फवारावे.
* टिप-औषधांचे प्रमाण साध्या पंपासाठी आहे. जर पेट्रोल पंपाच्या साह्याने फवारणी करणार असल्यास औषधाचे प्रमाण तिप्पट करावे.
ऊस
* सहा ते आठ आठवडे वयाच्या आडसाली लागणीस को.86032 जातीसाठी शिफारशीत (500ः200ः200 किलो नत्र,स्फुरद,पालाश) खत मात्रेच्या 40 टक्के नत्र खताची दुसरी मात्रा देण्यासाठी 434 किलो युरिया (200 किलो नत्र) तर इतर जातीसाठी शिफारशीत (400ः170ः170 किलो नत्र, स्फुरद, पालाश) खतमात्रेच्या 40 टक्के नत्र खताची दुसरी मात्रा देण्यासाठी 347 किलो युरिया (160 किलो नत्र) प्रती हेक्टरी वापरावी. तसेच सदरची खतमात्रा देताना 6 किलो युरियासाठी 1 किलो या प्रमाणात निंबोळी पेंडीची भुकटी चोळून द्यावी.
* आडसाली उसाची लागण केलेल्या क्षेत्रात उगवण विरळ झालेल्या ठिकाणी रोप लागण पध्दतीने वेळीच नांग्या भरुन घ्याव्यात.
* पूर्वहंगामी ऊस लागणी करीता पूर्व मशागतीची कामे पूर्ण करा. मशागत केलेल्या क्षेत्रात हेक्टरी 25 टन शेणखत किंवा कंपोष्ट खत वापरावे. यापैकी अर्धे शेणखत (12.5 टन) दुसर्या नांगरटीपूर्वी व अर्धे शेणखत (12.5 टन) लागणीपूर्वी सरी सोडण्यापूर्वी द्यावे.
* पांढरी माशीचा प्रादुर्भाव वाढल्यास कोषग्रस्त पाने कापून काढावीत व नंतर मेलॅथिऑन 50% प्रवाही हे किटकनाशक 20 मिली. 10 लिटर पाण्यातून फवारावे.
* उसाच्या पानांवरील तांबेरा व पोक्का बोईंग या रोगांच्या नियंत्रणाकरिता 0.3 टक्के मँकोझेब किंवा 0.1 टक्के कार्बेन्डॅझीम या बुरशीनाशकाची 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात 15 दिवसाच्या अंतराने स्टिकर वापरुन फवारणी करावी.
* आडसाली ऊस 6 ते 8 आठवडयाचा असताना व्दिदलवर्गीय तण नियंत्रणासाठी 2 – 4 डी या तणनाशकाचा 1.25 किलोग्रॅम 500 लिटर पाण्यात मिसळून प्रती हेक्टरी जमिनीवर फवारणीसाठी वापर करावा. फवारणी करताना जमीन तुडवू नये. फवारणीनंतर तीन ते चार दिवस त्या क्षेत्रामध्ये कोणतीही मशागत करु नये.
* शेतातील पावसाचे साठलेले पाणी त्वरीत शेताबाहेर काढून पाण्याचा निचरा होण्यासाठी उताराच्या बाजूने चर काढावा.
हरभरा व्यवस्थापन
* हरभरा पेरणीपूर्वी खोल नांगरट करावी व कुळवाच्या 2-3 पाळ्या देऊन शेत पेरणीस तयार ठेवावे.
* 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत जिरायती हरभरा बीजप्रकिया करुन पेरावा. (2 ग्रॅम थायरम + 2 ग्रॅम बाविस्टीन/ किलो बियाणे व यानंतर 250 ग्रॅम रायझोबियम /10 किलो बियाणे).
* शिफारशीत ख़त मात्रा पेरणीवेळी द्यावी.
भात
* पाणी व्यवस्थापन भात पिकाच्या योग्य वाढीकरिता व अधिक उत्पादनाकरीता भात खाचरात पाण्याची योग्य पातळी राखणे आवश्यक आहे. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार भात खाचरातील पाण्याची पातळी पुढीलप्रमाणे असावी. फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत 10 सें.मी.
* पीक संरक्षण तपकिरी तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी इमिडॅक्लोप्रिड 20 एस.एल. (125 मिली) किंवा थायोमिथॅक्झाम 25 डब्लु.जी. (100 ग्रॅम) किंवा इथोफेनफॉस 10 ई.सी. (500 मिली) किंवा अॅसिफेट 50 डब्ल्यु.पी.(950 ग्रॅम) किंवा बुप्रोफेजीन 25 एस.सी. (1000 मिली)प्रती हेक्टरी फवारावे.
नाचणी पीक
पीक संरक्षण – लष्करी अळी व पाने खाणारी अळी ः खरीपात 30 ते 80 टक्के नुकसान. गवताळ-डोंगरी भागात जास्त प्रादुर्भाव, बंदोबस्त शेतातील/बांधावरील गवत काढून टाकावे. मिथील पॅरॉथिऑन भुकटी हेक्टरी 20 ते 25 किलो धुरळावी.
* मावा – तुडतुडे ः प्रादुर्भाव सुरुवातीच्या काळात जास्त रस शोषून घेतात. कर्बग्रहण मंदावते. बंदोबस्त- रोगर 30 टक्के प्रवाही 10 मि.ली. किंवा मोनोक्रोटोफॉस 36 टक्के प्रवाही 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. * करपा रोग ः प्रादुर्भाव दिसून येताच डायथेन एम-45, 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यातून फवारावे. * पावसाचा ताण पडल्यास संरक्षित पाणी देणे
बाजरी
* पिकाची काढणी व मळणी करावी. धान्य उन्हात चांगले वाळवून साठवून ठेवावेत.
सोयाबीन
* पिकाची काढणी व मळणी करावी व धान्य उन्हात चांगले वाळवून साठवून ठेवावेत.
रब्बी ज्वारी
* पहिला पंधरवडा- शेतजमीन पेरणीसाठी तयार करावी * सप्टेंबर दुसरा पंधरवडा- खालील शिफारशीनुसार ज्वारीची पेरणी करावी.
अ) जमिनीच्या प्रकारानुसार शिफारशीप्रमाणे जातींची निवड करावी.
जमिनीचा प्रकार जातीचे नाव जिरायत/बागायत
हलकी जमीन फुले अनुराधा जिरायत
मध्यम जमीन फुले सुचित्रा जिरायत
भारी जमीन फुले वसुधा जिरायत
मध्यम ते भारी जमीन फुले रेवती बागायत
विशेष उपयोगासाठी फुले मधुर-हुरडा, फुले पंचमी – लाह्या
फुले, रोहिणी-पापड
ब) जमिनीच्या प्रकारानुसार रासायनिक खताची मात्रा शिफारशीप्रमाणे द्यावी.
जमिनीचा प्रकार खताचे हेक्टरी प्रमाण (किलो/हे)
कोरडवाहू बागायती
नत्र स्फूरद पालाश नत्र स्फूरद पालाश
हलकी 25 – – – – –
मध्यम 40 20 – 80 40 40
भारी 60 30 – 100 50 50
नत्र दोन हप्त्यांत (पेरणीवेळी निम्मे व पेरणीनंतर एक महिन्याने निम्मे) संपूर्ण
स्फूरद व पालाश पेरणी वेळेस द्यावे. कोरडवाहू जमिनीस संपूर्ण नत्र व स्फूरद
पेरणीवेळेस द्यावे.
क) बीजप्रक्रिया- पेरणीपूर्वी बियाण्यास गंधक 4 ग्रॅम किंवा थायरम 3 ग्रॅम प्रति 1 किलो व अॅझोटोबॅक्टर किंवा अॅझोस्पिरिलियम किंवा पीएसबी 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅमप्रमाणे जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
ड) बियाण्याचे प्रमाण व पेरणीचे अंतर- पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे. दोन ओळीतील अंतर 45 सें. मी. व दोन रोपातील अंतर 15 सें. मी. ठेवावे.
इ) खोडमाशी नियंत्रण ः पेरणीनंतर 7-8 दिवसांनी क्युनॉलफॉस 25 ईसी प्रवाही 750 मिली व 500 लीटर पाणी प्रती हेक्टरी फवारणी करावी.
फळबाग व्यवस्थापन
डाळिंब – पक्व फळांची काढणी करावी.
सिताफळ – डोळे पडलेल्या फळांची काढणी करावी.
बोर – भुरी व फळे पोखरणार्या माशीवर नियंत्रण करावे.
अंजीर – मध्यम ते हलकी छाटणी करावी.
जांभूळ – बाग ताणावर सोडावी.
कागदी लिंबू – शिफारशीत खतमात्रेच्या 30 टक्के नत्राची मात्रा द्यावी.
हस्त बहाराचे नियोजनासाठी 1000 पीपीएम सायकोसील (सीसीसी) ची फवारणी करावी.
रस शोषणारा पतंग ः गंध सापळ्याचा वापर करावा (200 मिली क्लोरोपायरीफॉस + 1 किलो गुळ + 1 लि. मोसंबीचा रस + 10 लि. पाणी मिसळून त्यामधून प्रत्येकी 500 मिली द्रावण घेऊन हेक्टरी 15-20 सापळे लावावे.)
कँकर / खैर्या रोग ः स्ट्रेप्टोसायक्लीन 1 ग्रॅम + कॉपर ऑक्सीक्लोराईड 30 ग्रॅम प्रति 10 लि. पाणी लिंबू बागेमध्ये खैर्या रोगाच्या नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन 1 ग्रॅम + कॉपर ऑक्सीक्लोराईड 30 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.
भाजीपाला व्यवस्थापन
* कांदा पिकामधील तण नियंत्रणासाठी लागवडीपासून 21 दिवसांनी रासायनिक तणनाशकाची फवारणी करावी. फवारणीवेळी शेतामध्ये वापसा स्थिती असावी याची काळजी घ्यावी.
* कांदा पीक एक महिन्याचे झाल्यावर नत्र खताचा पहिला हप्ता द्यावा.
* कांदा पिकावर येणारा करपा व फुलकिडे यांचे नियंत्रण करावे.
* खरीप टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी, गवार व वेलवर्गीय भाजीपाला तसेच कोबी व फ्लॉवर पिकामध्ये खांदणी करून झाडांना भर लावावी.
* टोमॅटो पिकास ताटी पध्दतीने आधार द्यावा.
* वेलवर्गीय भाजीपाला पिकांना मंडप अथवा ताटी पध्दतीने आधार द्यावा.
* खरीप भाजीपाला पिकांना नत्र खताचा दुसरा हप्ता द्यावा.
* खते देण्यापूर्वी पीक खुरपून स्वच्छ करावे.
* आवश्यकतेनुसार पीक संरक्षणाचे उपाय करावे.
* जास्त पाऊस किंवा सततच्या ढगाळ हवामानामुळे पिकांवर सुध्दा अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिसताच सुक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी.
* रसशोषून घेणार्या किडींपासून विषाणूजन्य रोगांचा प्रसार होतो अशा किडींचे वेळीच नियंत्रण करावे.
* पीक संरक्षणाचे उपाय करतांना जैविक किटकनाशकांचा वापर करावा.
* शेवटच्या आठवड्यात रांगडा कांद्याची लागवड करावी.
(सौजन्य ः म.फु.कृ.वि. राहूरी..)