जळगाव (प्रतिनिधी) ः कृषी आणि ग्रामविकासाचा ध्यास घेतलेल्या अॅग्रोवर्ल्डने यंदाच्या दिवाळी अंकात शेतीसंदर्भातील प्रसिद्ध केलेल्या दर्जेदार यशोगाथा शेतकर्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार्या आहेत. शेतीतील बदलांचा आढावा घेत असताना अॅग्रोवर्ल्डने शेतकर्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करण्यासाठी प्रेरीत केल्याने अॅग्रोवर्ल्डचा हा अंक शेतकर्यांसाठी खर्या अर्थाने मार्गदर्शक ठरला आहे, असे गौरवोद्गार राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले.
येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहावर आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते अॅग्रोवर्ल्ड फार्मच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण यांनी ना. गुलाबराव पाटील यांना दिवाळी अंक भेट देताना या अंकासह 21 ते 24 जानेवारी 2022 दरम्यान होणार्या राज्यस्तरीय अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचीही माहिती दिली. ना. श्री. पाटील म्हणाले, की अॅग्रोवर्ल्डतर्फे आयोजित केले जाणारे कृषी प्रदर्शन ही शेतकर्यांसाठी पर्वणीच असते. हे प्रदर्शन खान्देशातील सर्वोत्कृष्ठ प्रदर्शन ठरेल, असे नियोजन करु, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. प्रकाशनप्रसंगी अॅग्रोवर्ल्डचे व्यवस्थापक किरण पाटील, उपसंपादक आनन शिंपी उपस्थित होते.
Dear sir.
Please Send me Agro world Diwali Ank.
I will Subscribe it.
Also Give me Membership of Agroworld Annually or Permanently I Will Subscribe fees.
Thanks.
Dr.Ranjitsinh Raosaheb Nimbalkar.
At.Savatgaon.Post.Malinagar.Tal.Malshiras.Dist.Solapur.
Pin.Number.413108.
Mobile number.9763633523.
Please Send me a Agroworld Diwali Ank.