• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

हर्बल फार्मिंग : कलियुगातील संजीवनी असलेल्या नोनी फळाच्या व्यावसायिक शेतीतून कमवा बंपर पैसे, प्रक्रियेतून मिळेल Best A1 नफा

Herbal Farming औषधी वनस्पती लागवड, औषधी शेती, हर्बल शेतीतून मिळवा नफा

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 10, 2022
in इतर
11
हर्बल फार्मिंग : कलियुगातील संजीवनी असलेल्या नोनी फळाच्या व्यावसायिक शेतीतून कमवा बंपर पैसे, प्रक्रियेतून मिळेल Best A1 नफा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

नवी दिल्ली : भारतामध्ये औषधी वनस्पती आणि औषधी पिकांची लागवड म्हणजेच हर्बल फार्मिंग ही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आयुर्वेदातही, वनौषधी जीवनरक्षक मानल्या जातात, ज्याचा उपयोग कर्करोगासारख्या गंभीर आजारावरही केला जाऊ शकतो. नोनी फळ हे देखील असेच एक चमत्कारी औषधी फळ आहे, ज्याला कलियुगातील संजीवनी असेही म्हणतात. कॉफी फॅमिलीतील या फळाला इंडीयन किंवा बीच मलबेरी आणि ग्रेट मोरींडा म्हणूनही ओळखले जाते. काही लोक याला ‘चीज फळ’ किंवा ‘वोमिट फळ’ म्हणूनही ओळखतात. शास्त्रीयदृष्ट्या हे रुबियासी वनस्पती कुटुंबातील फळ असून मोरिंडा सिट्रिफोलिया हे त्याचे शास्त्रीय नाव आहे.

AGROWORLD’s Upcoming Exhibitions @ JALGAON, @ NASHIK, @ SHAHADA….

कोरोनानंतर मागणी नोनी फळची वाढू लागली

कोरोना महामारीच्या काळापासून नोनी आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांना खूप मागणी वाढली आहे, त्यामुळे आजच्या काळात नोनी शेती करणे म्हणजे शेतकऱ्यांसाठी खुली तिजोरी मिळण्यासारखे आहे. सध्या तरी त्याची लागवड भारतात फार कमी प्रमाणात केली जाते.

किनारी भागात नोनी लागवडीचे फायदे

भारताच्या मैदानी भागात नोनी लागवडीचा फारसा ट्रेंड नाही. येथे नोनी वनस्पती आणि बियाणे शोधणे खूप कठीण आहे, परंतु काही शेतकरी तामिळनाडू, केरळ, ओरिसा आणि कर्नाटकसारख्या किनारी राज्यांमध्ये त्याची लागवड करत आहेत. इथल्या हवामानात आणि जमिनीत त्याच्या बिया सहज उगवतात आणि पिकाचे उत्पादनही जास्त मिळते. नोनी या फळाचे एकूण 80 प्रकार आहेत; परंतु आपल्या उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये साधारणतः 3 प्रकार अधिक अस्तित्वात आहेत.

अमेरिकी क्विनोआसारखेच सुपरफूड; पारंपरिक इथिओपियन टेफ आता इस्त्रायली संशोधक नेणार जगभर

गोगलगायचा बंदोबस्त करण्याचे उपाय

https://youtu.be/Xyl3ssIpLRA

हर्बल फार्मिंग : नोनी रोपटे कसे तयार करावे?

1. नोनी बियाणे खूप टणक असतात, त्यामुळे पेरणीनंतर उगवण होण्यास 6 महिने लागतात.

2. अशा परिस्थितीत, तज्ञ शिफारस करतात, की त्याचे बियाणे सल्फ्युरिक ॲसिडमध्ये 2 मिनिटे भिजवावे, जेणेकरून नोनी बियाण्यांचा वरचे आवरण सहजपणे मोकळे होऊ शकेल.

3. हे काम काळजीपूर्वक केले पाहिजे, कारण सल्फ्युरिक ॲसिडमुळे त्वचा जळण्याचा धोका देखील असतो.

4. रोपवाटिकेत नोनी बिया टाकून रोपे तयार केली जातात.

5. नोनी रोपापासून चांगले उत्पादन घेण्यासाठी त्याच्या रोपांची योग्य काळजी घेतली पाहिजे.

6. शेणखताने तयार केलेल्या शेतातील किंवा बागेच्या सुपीक जमिनीत नोनी रोपे लावली जातात.

7. चांगली काळजी आणि सिंचनानंतर पावसाळ्यापर्यंत भरपूर फळे मिळू शकतात.

8. एकदा लागवड केल्यावर नोनी रोपाला वर्षभर फुले येतात. एका झाडापासून दर महिन्याला 10 फळे काढता येतात.

तीन हजार रुपये लिटर दराने विकला जातो ज्यूस

नोनी म्हणजेच मोरिंडा सिट्रीफोलियाची व्यावसायिक शेती करणे खूपच फायदेशीर ठरते. हे औषधी फळ तसेच नगदी पीक आहे, जे व्यावसायिक शेतीपेक्षा अधिक फायदे देते. हर्बल उत्पादने बनवणाऱ्या कंपन्या आणि आयुर्वेदिक संस्था नोनी हातोहात खरेदी करतात. सोबतच शेतकरी त्याची लागवड करून त्यावर प्रक्रिया करून अधिक उत्पन्न मिळवू शकतात. विशेषतः नोनी ज्यूसला बाजारात खूप मागणी आहे. नोनी रस 450 ते 500 मि.ली. हा 1,500 रुपये दराने विकला जातो.

आता सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात इस्त्रायली सुपरफूड ॲव्होकॅडो; ब्रिटनमध्ये एमबीए झालेल्या तरुणाने भारतातच सुरू केलीय अनोखी शेती

काय आहेत कलियुगातील संजीवनीचे औषधी फायदे?

नोनीचा वापर मधुमेहापासून तापापर्यंतच्या अनेक उपचारांसाठी केला जातो. सुरुवातीपासूनच नोनी ज्यूसचे सेवन केल्याने कर्करोग, मधुमेह, वंध्यत्व, हाडांच्या समस्या आणि विविध प्रकारच्या संसर्गांशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे फळ शरीरातील ऊर्जा वाढवते, अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्तोत्र असलेले हे फळ त्वचा मॉइश्चरायझ करते, मेंदुवरील तणाव कमी करते. नोनी रस व्हिटॅमिन सी आणि सेलेनियमने भरलेले असल्याने तारुण्य टिकवून ठेवते. याशिवाय, यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि बुरशीविरोधी गुणधर्म असल्याने टाळूच्या जळजळीवर उपचार करण्यास मदत होऊ शकते. नोनी फळात 150 हून अधिक पोषक घटक असल्याने सध्या अनेक रुग्ण ॲलोपॅथी औषधे सोडून नोनीचे सेवन करत आहेत. नोनी फळामध्ये नैसर्गिक एंजाइम आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अँथ्रागुइनोन आणि पॉलिसेकेराइड असतात. यातील प्रॉक्सेरोनिन हे उपयुक्त जीवनसत्त्वे आणि खनिजे, तसेच जीवनसत्त्वे अ आणि सी शोषण्यास मदत करते.

अमेरिकेत ड्रग व्यसनींच्या पुनर्वसनासाठी वापर

अमेरिकेत, ड्रग व्यसनींचे पुनर्वसन करण्यासाठी नोनी रस देऊन प्रयोग केले गेले आहेत. नोनी फळाचा रस हा मधुमेह, उच्च रक्तदाब, डोकेदुखी, पोटाचे आजार, हृदयरोग, जठरासंबंधी व्रण, रक्ताभिसरण समस्या, मासिक पाळी उत्तेजित करण्यासाठी, कोलेस्टेरॉल कमी करणे, ताप, खोकला आणि सर्दी, उच्च रक्तदाब, संधिवात, एड्स, कर्करोग, आणि खराब पचन, स्ट्रोक, वजन कमी होणे आणि कोणत्याही प्रकारचे संक्रमण रोखण्यासाठी होऊ शकतो. प्रभावित भागात नोनीची पाने गुंडाळल्यास संधिवात, घसा आणि सूजलेले सांधे, पोटदुखी आणि डोकेदुखी बरे होते. कच्चे फळ आणि पानांचे मिश्रण त्वचेच्या संसर्गावर, जसे की फोड आणि जखम यावर उत्तम उपचार आहे.

नोनी फळाचा इतिहास

न्यू गिनीच्या सभोवतालच्या उष्णकटिबंधीय बेटांभोवती नोनी फळे विकसित झाली. तिथे नवीन लावा प्रवाहामध्ये त्याची भरपूर पैदास झाली. अंदाजे 3,200 वर्षांपूर्वी न्यू गिनी भागातून मानवांच्या स्थलांतराने नोनीचे फळ हे फिजी, सामोआ आणि टोंगा सारख्या शेजारील प्रांतात उगवले गेले. नोनीचा प्रसार थेट पॉलिनेशियन लोकांच्या वसाहतीशी आणि संपूर्ण पॅसिफिकमध्ये त्यांची संस्कृतीशी संबंधित आहे. 2,000 वर्षांपासून पॉलिनेशियन लोकांनी नोनी फळ आणि त्याचे झाड जगण्याच्या अनेक मूलभूत गरजांसाठी वापरले आहे. मात्र, त्याच्या अप्रिय चवीमुळे पॉलिनेशियन लोकांनी नोनी फळाला दुष्काळ अन्न मानले. नोनीचे लाकूड पॉलिनेशियन लोकांनी आगीसाठी, जाळण्यासाठी वापरले; तसेच झाडाची साल पिवळ्या आणि लाल कापडाच्या रंगांच्या उत्पादनामध्ये वापरली गेली. या झाडाची पाने पशुपालकांना पूरक आहार म्हणून दिली गेली. तर फळांचा गर हा औषधी उपचार म्हणून वापरला गेला.

Herbal Farming: Since the Corona epidemic, the demand for Noni and its products has increased a lot, so farmers can earn good income through Noni cultivation and processing.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: औषधी वनस्पतीकलियुगातील संजीवनीनोनी ज्यूसमोरिंडा सिट्रीफोलियाव्यावसायिक शेतीहर्बल फार्मिंग
Previous Post

जगातील पहिल्या ड्रायव्हरविना चालणाऱ्या, फुल्ली स्मार्ट इलेक्ट्रिक ट्रॅक्टर कंपनीचे आता भारतातही पदार्पण

Next Post

शेती क्षेत्र, शेतकऱ्यांसाठी आता येणार नव-नवीन विमा पॉलिसी

Next Post
शेती क्षेत्र, शेतकऱ्यांसाठी आता येणार नव-नवीन विमा पॉलिसी

शेती क्षेत्र, शेतकऱ्यांसाठी आता येणार नव-नवीन विमा पॉलिसी

Comments 11

  1. Vasant Savkar says:
    3 years ago

    I want to drive it in my field which is having veri high quality black cotton soil

  2. Pingback: शेती क्षेत्र, शेतकऱ्यांसाठी आता येणार नव-नवीन विमा पॉलिसी - Agro World
  3. Pingback: असे आहेत मंत्रिमंडळाचे कृषी व ग्रामविकासाशी निगडित महत्त्वाचे निर्णय.. - Agro World
  4. Pingback: 500 रुपये किलोने विकला जाणारा काळा तांदूळ शेतकऱ्यांना बनवेल करोडपती, जाणून घ्या त्याविषयी सारे का
  5. Pingback: Cotton Price Outlook Agri News कापूस दर अंदाज
  6. Pingback: आता सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात इस्त्रायली सुपरफूड ॲव्होकॅडो; ब्रिटनमध्ये एमबीए झालेल्या
  7. Pingback: 325 रुपये किलोने विकले जाणारे नाचणीसारखे धान्य सुपरफूड टेफ, इथिओपियन धावपटूंच्या स्टॅमिनाचे रहस
  8. Pingback: Dairy Farming यशोगाथा : आधुनिक दुग्धव्यवसाय कसा करावा? आयआयटी इंजिनियर तरुणाने गावात उभा केला 44 कोटींचा ड
  9. Pingback: पीएम किसान योजना : फक्त वर्षाला सहा हजार रुपयेच एव्हढेच नाही, आणखी 2 महत्त्वाचे फायदे! जाणून घ्या स
  10. Pingback: अशी करा इलायची शेती ज्यातून होईल A-1 बंपर कमाई! - Agro World
  11. Pingback: मजूर समस्येवर मात ; तयार केला इलेक्ट्रिक बैल - Agro World

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

AI

AI, ड्रोनचा शेतीत वापर काळाची गरज – अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2025
0

मका एकरी 75 क्विंटल उत्पादन

खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अ‍ॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.