मुंबई : भारतीय हवामानशास्त्र विभाग म्हणजेच आयएमडीने नुकतेच जारी केले हवामानाविषयी शेतकरी बुलेटिन, त्यात 26 ऑगस्टपर्यंत कशी असेल राज्यातील पावसाची स्थिती वर्तविली आहे. आयएमडी अंदाजनुसार, आज, सोमवार, 22 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवस म्हणजे 24 ऑगस्टपर्यंत राज्यात तुरळक ते सामान्य तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कायम राहील.
मेट ऑफिस, कुलाबा, मुंबई यांनी हे शेतकरी हवामान बुलेटिन जारी केले आहे. या बुलेटिनमध्ये गोव्यासह महाराष्ट्र राज्यासाठी 26 ऑगस्ट 2022 च्या सकाळपर्यंत अंदाज सांगितला आहे.

शेतकरी बुलेटिननुसार अशी राहील राज्यातील पावसाची स्थिती
22 ऑगस्ट :
कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता; विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी.
23 ऑगस्ट :
कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी.
24 ऑगस्ट :
कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता.
25 ऑगस्ट :
कोकण-गोव्यात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस राहू शकेल.
इशारा/ चेतावणी
22 ऑगस्ट :
*मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आणि परिसरात वादळी हवामानाची शक्यता आहे.
23 ऑगस्ट :
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता आहे.
24 ऑगस्ट :
विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे.
25 ऑगस्ट :
राज्याच्या कुठल्याही भागात विजांचा कडकडाट अथवा मुसळधार पाऊस वैगेरे इशारा देण्याइतपत गंभीर स्थिती नाही.
राज्यातील गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान
कोकण व गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमीमध्ये) 1 सेमी पेक्षा जास्त पाऊस पडलेली ठिकाणे पुढीलप्रमाणे:
कोकण-गोवा : मांगे 4.2, लांजा 3.58, सावंतवाडी 3.3, माथेरान, कल्पोई 3.1, कैपे, खालापूर 3.0, कर्जत 2.7, मुरबाड 2.5, कणकवली 2.4, कुडाळ 2.3, वैभववाडी, गुहागर 2.2, डहाणू, चिपळूण 2.0, मालवण 1.8, महाड 1.6, माणगाव 1.5, शहापूर 1.4, पाली, पेडणे 1.3, खेड 1.2, मंडणगड, पनवेल 1.2, पोलादपूर 1.1, पालघर, कल्याण 1.0
मध्य महाराष्ट्र : लोणावळा 4.4, राधानगरी 4.3, महाबळेश्वर 4.2, इगतपुरी 2.1, शाहूवाडी 1.8,, आजरा 1.4, सोलापूर 1.1, दहिगाव 1.0
मराठवाडा : भोकरदन 1.1, जाफराबाद, पाथरी 0.7, चाकूर 0.6, सोयगाव 0.5, मानवत 0.4
विदर्भ : मोरगाव अर्जुनी 6.4, भंडारा 5.1, मोहाडी 4.8, कुरखेडा 4.3, साकोली 3.7, लाखनी, आरमोरी 2.8, ब्रम्हपुरी 2.7, मौदा 2.5, साईज 2.4, सडकअर्जुनी 2.2, रामटेक 1.8, पौनी 1.7, वरूड, धानोरा 1.6, काटोल, चिखलदरा 1.5, कामठी 1.4, तिरोडा 1.3, भामरागड 1.2, एटापल्ली 1.1, वाशिम, पारशिवनी 1.0
घाटमाथा : कोयना (नवजा) 9.4, आंबोली 7.8, ताम्हिणी 7.5, दावडी 7.4, डांगरवाडी 6.8, शिरगाव 6.0, लोणावळा (टाटा), लोणावळा (ऑफिस) 4.3, भिरा 4.2, कोयना (पोपळी) 3.7, खोपोली 3.7, व ळवण 3.3, शिरोटा 2.2, भिवपुरी 1.9, ठाकूरवाडी, वाणगाव 0.7
मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव : तुलसी 1.4. वैतरणा 1.3, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा 1.1, विहार 1.0, तानसा 0.9, भातसा 0.6
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
राज्याच्या “या” जिल्ह्यात 11 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा…
Be Alert ! शुक्रवारपर्यंत पुढील 4 दिवस राज्यात पाऊस – पुणे वेधशाळेचा अंदाज … जाणून घ्या सविस्तर
Comments 2