राज्याच्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये “यलो अलर्ट” ची स्थिती असून त्यातल्या त्यात पुणे, नाशिक, रायगड, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, बुलढाणा,पालघर, ठाणे येथे ढगांची दाटी अधिक दिसत आहे. राज्यभरात विजांच्या गडगडाटासह सहित मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याचे हवामानतज्ज्ञ डॉ. के. एस. होसळीकर यांनी ट्विट करुन वर्तवली आहे.
डॉ. के. एस. होसळीकर यांचे 4.51 pm चे ट्विट..
तामिळनाडू किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र..
तामिळनाडू किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा गोव्यावर प्रभाव कायम आहे. राज्यात आज (शुक्रवारी) पासून पुढील 3 ते 4 दिवस तळ कोकणात मुसळधार तर राज्याच्या उर्वरित जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार विजांच्या गडगडाटासह पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच ताशी 40 किमी वेगाने वारेही वाहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाकडून “यलो अॅलर्ट”..
8 ऑक्टोबर : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, अहमदगनर, उस्मानाबाद, नाशिक, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड , धुळे, नंदुरबार, जळगाव
9 ऑक्टोबर : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, अहमदगनर, उस्मानाबाद, नाशिक, बीड,औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड
10 ऑक्टोबर : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, अहमदगनर, उस्मानाबाद, नाशिक, बीड,
11 ऑक्टोबर: पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर