• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अखंड वीज पुरवठा व रोहित्रांबाबत मंत्रालयात उच्चस्तरीय आढावा बैठकीत उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले निर्देश

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 29, 2021
in हॅपनिंग
3
रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अखंड वीज पुरवठा व रोहित्रांबाबत मंत्रालयात उच्चस्तरीय आढावा बैठकीत उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले निर्देश
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) – रब्बी हंगामात शेतक-यांना अखंडीत सेवा देण्यासाठी आणि रोहित्रे नादुरुस्त होऊ नयेत यासाठी ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून वीज पुरवठा अखंडित राहील याची काळजी घ्यावी, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मंत्रालयात दिले. रोहित्र बंद पडून वीज पुरवठा ठप्प होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

 

रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर महावितरण, महापारेषण व महानिर्मिती यांच्या तयारीचा आढावा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत घेतला. या बैठकीत राज्याच्या ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, संचालक (संचालन) संजय ताकसांडे, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे यांच्यासह ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

गेल्या वर्षी २०२० च्या रब्बी हंगामामध्ये तिन्ही कंपन्यांनी उत्तम समन्वय साधून ग्राहकांना खास करून कृषी ग्राहकांना चांगली सेवा पुरवली याबद्दल तिन्ही कंपन्यांचे ऊर्जामंत्र्यांनी अभिनंदन केले.

 

या ही वर्षी महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडत आहे. किंबहुना दुष्काळी भागातही अतिवृष्टी होत आहे. तसेच हळुहळु लॉकडाऊन मागे घेतला जात असून जीवन पूर्वपदावर येत आहे. यामुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासाठी मागील वर्षीप्रमाणेच तिन्ही कंपन्यांनी पुन्हा समन्वय साधून २०२१ चा रब्बी हंगामात शेतकऱ्यांना उत्तम प्रकारची सेवा देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

 

सर्व क्षेत्रिय अधिकारी व कर्मचारी यांना सतर्क राहून पुरेशी काळजी घेण्यास सांगावे…

महावितरणच्या मुंबई मुख्यालयाने तेलाचा व वितरण रोहित्रांचा पुरेसा साठा उपलब्ध करून घ्यावा, जेणेकरून मागणीनुसार त्याचा पुरवठा केला जाईल. यंत्रणेची पूर्व हंगामी दुरूस्ती वेळेवर करावी. यंत्रसामुग्री व देखभालीसाठी लागणारे साहित्य क्षेत्रीय कार्यालयांना वेळेवर उपलब्ध करून द्यावे,” अशा सूचना डॉ. राऊत यांनी केल्या.

 

नादुरुस्त रोहित्र तत्काळ दुरुस्त करावे..

“रोहित्रे, यंत्रणा वारंवार ना-दुरूस्त होण्यामागील कारणांचा सखोल अभ्यास करून मुळासकट याचे निवारण करण्यासाठी तातडीने उपाय हाती घ्यावे. सोबत वीज चोरीला कसा आळा घालता येईल याचा तसेच महावितरणची हानी कशी टाळता येईल, याचेही वरिष्ठांनी नियोजन करून क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करावे,” असे निर्देशही त्यांनी दिले.

 

स्थानिक लोकप्रतिनिधी जसे खासदार, आमदार जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच इत्यादींशी चांगला संपर्क ठेवून परिस्थिती आपण कशी हाताळणार याची कल्पना देण्याची सूचनाही त्यांनी केली.

 

ज्याठिकाणी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल अशा ठिकाणी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी, तहसिलदार संबधीत पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची मदत घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

 

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाला थांबणे आवश्यक

सध्या सर्वदूर अतिवृष्टी चालू आहे. अशाप्रसंगी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाला थांबणे आवश्यक आहे. याबाबत सर्वांना सूचना द्याव्यात, असे निर्देशही ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले आहेत.

 

वीज विकत घेण्यासाठी महावितरणला वीज पुरवठादारांना रोजच पैसे द्यावे लागतात. तसेच देखभाल व दुरुस्तीवर खर्च होत असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या चालू बिलासोबत थकबाकी भरावी. शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त करण्यासाठी नवीन कृषिपंप धोरण तयार करण्यात आले असून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ राऊत यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: डॉ. नितीन राऊतदिनेश वाघमारेनादुरुस्तनिर्देशरब्बी हंगामविजय सिंघलवीज पुरवठासंजय ताकसांडे
Previous Post

फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (FPC) ला मिळणारे विविध फायदे आणि योजना.. FPC ची नोंदणी झाल्यापासून पुढील ५ वर्षे तिच्या नफ्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही.. जास्तीत जास्त कर्ज मिळण्यामध्ये सुलभता असून कर्जावरील व्याज दर दुसऱ्या कंपन्यांच्या तुलनेत कमी असतो.. चला तर जाणून घेऊ या FPC चे फायदे व योजना..

Next Post

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात “फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (FPC) – स्थापना ते व्यवस्थापन” या विषयावर शनिवारी 2 ऑक्टोबरला एकदिवसीय कार्यशाळा..

Next Post
फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (FPC) ला मिळणारे विविध फायदे आणि योजना.. FPC ची नोंदणी झाल्यापासून पुढील ५ वर्षे तिच्या नफ्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही.. जास्तीत जास्त कर्ज मिळण्यामध्ये सुलभता असून कर्जावरील व्याज दर दुसऱ्या कंपन्यांच्या तुलनेत कमी असतो.. चला तर जाणून घेऊ या FPC चे फायदे व योजना..

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात "फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (FPC) - स्थापना ते व्यवस्थापन" या विषयावर शनिवारी 2 ऑक्टोबरला एकदिवसीय कार्यशाळा..

Comments 3

  1. संजय धनगर says:
    4 years ago

    ह्या लोकांनी शेतकर्यांना कधीच मदत केली नाही

  2. मिलिंद नेवे says:
    4 years ago

    दोन वर्ष झाले नवीन रोहित्र साठी अर्ज करून काही उपयोग नाही हे फक्त कागदी घोडे नाचवता..पण प्रत्यक्ष फिल्ड वर 10 टक्के पण काम करत नाही.. तरी मीडियाने प्रत्यक्ष फील्ड वर येऊन सत्य परिस्थिती सरकारला निदर्शनास आणून द्यावी .म्हणजे झालं…

  3. Pingback: जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील शेतकऱ्यांच्या वीज तोडणीवर मूग गिळून गप्प का..? "शिंगाडे मोर्

ताज्या बातम्या

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

कृषी उडान

“कृषी उडान”च्या लाभासाठी असा करा अर्ज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.