• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

यंदा टोमॅटो लागवड वाढेल की घटेल?

आवक घटली; दर स्थिर

Team Agroworld by Team Agroworld
July 6, 2021
in हॅपनिंग
0
यंदा टोमॅटो लागवड वाढेल की घटेल?
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

राज्यातील नगर जिल्ह्यातील टोमॅटो हंगाम अखेरच्या टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. तरी तो ऑगस्ट अखेरपर्यंत चालेल. संगमनेर बाजार समितीत दररोज टोमॅटोच्या 500 ते 600 क्रेट तर जुन्नर (नारायणगाव) बाजार समितीत 2000 क्रेटच्या आसपास आवक होत आहे. मागील आठवड्यात या दोन्ही बाजार समित्यांत प्रति 20 किलोच्या क्रेटला 100 ते 200 व सरासरी 150 रुपये दर मिळाला. एकंदर एप्रिल महिन्याच्या तुलनेत आवकेत व दरात निम्म्याने घसरण झाली आहे.

राज्यातील नगर जिल्ह्याप्रमाणेच कर्नाटकातील बंगळुरु भागातील टोमॅटो हंगाम जोरात सुरु आहे. येथील चिंतामणी मार्केटमध्ये टोमॅटोची आवक वाढती आहे. हा सर्व माल कर्नाटकासह दिल्ली, उत्तर भारत व जम्मू काश्‍मीर या भागात पाठवला जातो
हिमाचल प्रदेशातील सोलन मंडी भागातील टोमॅटोची आवक नुकतीच सुरु झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर देशातील महत्वाच्या बाजारपेठेत आवक वाढली आहे. बाजारात टोमॅटोला क्रेटला 100 ते 200 रुपयांपर्यंतचे दर मिळत आहेत.
राज्यातील नगर भागातील हंगाम ऑगस्ट पर्यंत चालेल. त्यानंतर नाशिकच्या पूर्व भागातील हंगामातील सप्टेंबर पासून सुरु होईल. दरम्यान ऑक्टोबर पासून पश्‍चिम भागातील हंगाम सुरु होईल. हा हंगाम साधारणपणे मार्च 2022 पर्यंत चालतो.

फ्रेश, निर्यात तसेच प्रक्रियेला मागणी

भारताच्या विविध भागात टोमॅटो हे पिक तसे वर्षभर होत असते. त्यात महाराष्ट्र , कर्नाटक, मध्यप्रदेश, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश ही आघाडीची राज्ये आहेत. भारतीय ग्राहकांकडून फ्रेश टोमॅटोला सातत्याने मागणी होते. त्या शिवाय भारता लगतच्या देशांमधून टोमॅटोला मागणी होते. त्यातील बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ हे महत्वाचे आयातदार देश आहेत. या शिवाय प्रक्रिया उद्योगांकडूनही टोमॅटोला मोठी मागणी होते. मागील काही वर्षांपासून देशभरात तसेच बाहेरील देशांतूनही प्रक्रियेसाठी टोमॅटोच्या मागणीत वाढ झाली आहे. महाराष्ट्रात ‘सह्याद्री फार्म्स, वरुण ॲग्रो, गोंग्लू अशा कंपन्या यात आघाडीवर आहे.
त्यामुळे बाजारात स्पर्धा होण्यास व टोमॅटोचे दर टिकून राहण्यास फायदा होतांना दिसत आहे.

कोरोना काळात उठाव वाढला

महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर मागील वर्षीच्या हंगामात टोमॅटोचे दर टिकून राहीले. अगदी कोरोनाच्या काळातही टोमॅटोचा उठाव कायम राहिला. याचा परिणाम यंदाच्या हंगामातील उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्याच चांगला पाऊस झाला. त्यामुळे टोमॅटो लागवडीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांचा हुरुप वाढला. परिणामी जून महिन्यात नाशिकच्या बहुतांश भागात टोमॅटो लागवडीस जोर आला आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने ओढ दिली. त्यानंतरच्या काळात लागवडीची गती मंदावल्याचे दिसते. जून मध्ये टोमॅटो लागवडीसाठी उत्पादकांनी जोरदार आघाडी घेतली. जी लागवड मागील वर्षीच्या या महिन्याच्या तुलनेत 15 ते 20 टक्क्यांनी जास्त झाल्याचे नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो रोपे पुरवणाऱ्या रोपवाटिकाधारकांचे म्हणणे आहे. मात्र जुलै मध्ये पुन्हा लागवड मंदावल्याचेही चित्र आहे. ऑगस्ट मध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड होण्याची शक्यता आहे.

पाऊस आणि बॉर्डर…

बांग्लादेशातून होणारी मागणी, पाकिस्तानची बॉर्डर खुली होणे तसेच पावसाची स्थिती या बाबींचा टोमॅटोच्या मार्केटवर दरवर्षी मोठा परिणाम होतो. येत्या काळात याबाबत अनुकूल स्थिती असेल टोमॅटोचे दर चांगले राहतील. अन्यथा बाजारभाव सध्याच्या प्रमाणात स्थिर राहतील असाच टोमॅटो व्यापाऱ्यांचा कयास आहे.

ज्ञानेश उगले, सह्याद्री फार्म्स
६ जुलै २०२१
मोहाडी, जि. नाशिक

Share this:

  • Facebook
  • X
Tags: कर्नाटकटोमॅटोतामिळनाडूनाशिकपाकिस्तानप्रक्रिया उद्योगमध्यप्रदेशमहाराष्ट्रसंगमनेर बाजार समितीसह्याद्री फार्म्सहिमाचल प्रदेश
Previous Post

मधमाशीपालनाने आणली आर्थिक मधुरता

Next Post

‘हवामान’चे हवाबाण

Next Post
‘हवामान’चे हवाबाण

'हवामान'चे हवाबाण

ताज्या बातम्या

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 31, 2025
0

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2025
0

या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा

या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 28, 2025
0

मान्सून मुंबईत दाखल ! पुढील तीन दिवसात हवामान कसे असेल..??

मान्सून मुंबईत दाखल ! पुढील तीन दिवसात हवामान कसे असेल..??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 26, 2025
0

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 23, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 31, 2025
0

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2025
0

या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा

या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 28, 2025
0

मान्सून मुंबईत दाखल ! पुढील तीन दिवसात हवामान कसे असेल..??

मान्सून मुंबईत दाखल ! पुढील तीन दिवसात हवामान कसे असेल..??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 26, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.