मुंबई – अंदमान निकोबार बेटांवर वेळेआधीच मान्सून दाखल झाल्याने तसेच यंदा सर्वत्र सरासरी इतका पाऊस होणार असल्याच्या भारतीय हवामान विभागाच्या (IMD) दीर्घकालीन अंदाजामुळे शेतकरीवर्गासह सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
आतापर्यंत मान्सूनची अपेक्षेप्रमाणे समाधानकारक वाटचाल सुरु होती. मात्र, आज (23 मे) अचानक वातावरणातील बदलामुळे मान्सूनने जणू अरबी समुद्रातच विश्रांती घेतली.
जळगाव, भुसावळ, औरंगाबादमध्ये अॅग्रोवर्ल्ड अस्सल देवगड हापूसची गुरुवारी 26 मे रोजी हंगामातील शेवटची गाडी… 🥭
मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण झाल्यामुळे आता त्याचे आगमन दोन दिवसांनी लांबणीवर पडणार असल्याचा अंदाज IMD च्या सूत्रांनी वर्तविला आहे. परिणामी, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून केरळात दाखल होईल. त्यानंतर 5 जूनला कोकणात तर 7 जूनला मान्सून मुंबईत दाखल होण्याचा अंदाज आहे.
पूर्वीचा अंदाज..
मान्सून मुंबईत 5 जूनला दाखल होणार असल्याचा अंदाज यापूर्वी वर्तविण्यात आला होता. पण, सध्या मात्र त्यासाठी परिस्थिती पूरक नसल्याने तो दोन दिवस उशिराने येत आहे. कोकण, मुंबई व परिसरात 10 ते 16 जूनदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.