पुणे : शासनाने शेतकऱ्यांसाठी कुक्कुट पालन योजना सुरु केली आहे. ज्यांना कुक्कुट पालन करण्याची इच्छा आहे त्यांनी लगेच यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत कारण अर्ज करण्याची प्रोसेस सुरु झालेली आहे.
ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची क्षमता कुक्कुटपालन व्यवसायामध्ये आहे. त्यामुळे तुमचा व्यवसाय सुरु होईलच, परंतु इतर बेरोजगार तरुणांच्या हाताला पण काम मिळेल.
ग्रामीण भागातील बेरोजगारांसाठी कुक्कुट पालन योजना फायद्याची ठरणारी आहे.
कोंबडीची अंडी व मांसाला ग्रामीण भागामध्ये खूप मोठी मागणी असते. कोरोना काळात अंडी आणि कोंबडीच्या मासास प्रचंड मागणी होती. यामुळे कोंबड्याच्या विक्रीत खूप मोठी वाढ झाली.
कुक्कुटपालन व्यावसायिक या व्यवसायामुळे नफ्यामध्ये आहे. कुक्कुट पालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी त्या व्यवसायाची संपूर्ण माहिती घेणे गरजेचे असते.
प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षित व्हा
मित्रांनो कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी त्या व्यवसायातील बारकावे माहित असणे खूपच गरजेचे असते. कोंबड्याचे आजार, त्यांचे खाद्य, मार्केट इत्यादी बाबींचा अगोदर अभ्यास करणे गरजेचे आहे. कुक्कुटपालन संबधित प्रशिक्षण घेतले तर अधिक चांगल्या प्रकारे हा व्यवसाय करता येवू शकतो. कुक्कुट पालन व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर बँका सुद्धा व्यवसाय करण्यासाठी कर्ज देऊ शकतात तसेच शासनाच्या कुक्कुट पालन योजनामध्ये देखील याचा लाभ होऊ शकतो.
असा करा ऑनलाईन अर्ज
कुक्कुट पालन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. हा अर्ज करण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा. कॉम्प्युटरच्या ब्राउजरमध्ये https://ah.mahabms.com/webui/registration असा वेब ॲड्रेस टाईप करा.
जसेही तुम्ही वरील वेब ॲड्रेस तुमच्या कॉम्प्युटरमधील ब्राउजरमध्ये टाईप कराल, त्यावेळी स्क्रीनवर पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. वेबसाईटच्या नेव्हिगेशन बारवर अनेक पर्याय तुम्हाला दिसतील. त्यापैकी अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
नोंदणीचा अर्ज तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर ओपन होईल. त्या ठिकाणी जी माहिती विचारली जाईल, त्याप्रमाणे संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा.
इतर संपूर्ण माहिती भरल्यानंतर अर्जदाराने स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी दिलेल्या फॉरमॅटमध्ये आणि योग्य साईजमध्ये अपलोड करायची आहे. फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर रेशन कार्डवर जेवढे सदस्य असतील त्या सर्व सदस्यांचे आधार कार्ड नंबर आणि इतर माहिती दिलेल्या चौकटीमध्ये टाकायची आहे. जो अर्जदार आहे त्याने त्याचे स्वतःचे नाव वगळून इतर सदस्याची माहिती टाकावी अशी सूचना ah.mahabms.com या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. ही सर्व माहिती टाकल्यानंतर जसे ही तुम्ही सेव्ह करा या पर्यायावर क्लिक कराल त्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर पाठविला जाईल. तो युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा. लॉगीन केल्यानंतर काही माहिती या ठिकाणी तुम्हा प्रश्नांच्या स्वरुपात विचारली जाईल त्यांचे व्यवस्थित उत्तरे द्या आणि अर्ज सेव्ह करा. अर्ज सेव्ह झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या. त्यानंतर संबंधित विभागाकडून पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल.
कुकुट पालन करायची आहे मला
Kukutpan
Very good
Kavita rajput
खुप छान योजना आहे.
Kuku palan ichuk sir jii🙏
Aggry
Mala karaycha ahe vavsay