• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

नायगारा फॉल्स : 10,000 वर्षांपूर्वी निसर्गाला पडलेले अद्भुत स्वप्न अन् त्यासंदर्भातील रंजक प्रेमकथा, दंतकथा जाणून घ्या

नायगारा धबधबा म्हणजे निसर्गाला पडलेले अद्भुत स्वप्नच जणू

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 27, 2022
in वंडरवर्ल्ड
0
नायगारा फॉल्स

नायगारा फॉल्स

Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

वॉशिंग्टन : नायगारा फॉल्स … बस नाम काफी है, बाकी कुणाला काही सांगायची गरज नाही. आजच्या वंडरवर्ल्ड स्टोरीत आपण जाणून घेऊ हे निसर्गाला पडलेले अद्भुत स्वप्न अन् त्यासंदर्भातील रंजक प्रेमकथा, दंतकथा याविषयी…

विश्राम बेडेकर यांनी एक झाड आणि दोन पक्षी या आत्मचरित्र्याचा शेवट करताना नायगारा धबधबा भेटीचे वर्णन केले आहे. त्यात ते म्हणतात, “हा धबधबा पाहावयास गेलो असता प्रश्न पडला, की हे सुंदर पाणी खाली पडून आपला कपाळमोक्ष का करीत आहे? तर, हे पाणी खाली पडून नदीत जाणार, तेथून ते समुद्रात जाणार. मग उष्णतेमुळे पाण्याची वाफ होऊन ढग निर्माण होतील आणि पावसाद्वारे ते पाणी परत पृथ्वीवर पडेल आणि परत सुंदर दिसण्यासाठी आपले कपाळमोक्ष करेल. हे जलचक्र असेच चालू राहणार. खरोखरच मानवी जीवन या पाण्यासारखेच आहे. कितीही वेळा पराभव झाला तरी ते सुंदर दिसण्यासाठी परत प्रयत्न करत राहणार.”

नायगारा फॉल्स
नायगारा फॉल्स

जगातील सर्वाधिक उंचीचा धबधबा नायगारा फॉल्स

जगातील सर्वाधिक उंचीचा धबधबा अशी नायगारा फॉल्सची ओळख आहे. जगातील नैसर्गिक आश्‍चर्यांमध्ये हा धबधबा महत्त्वपूर्ण मानला जातो. नायगारासारखा अफाट धबधबा पाहयला मिळावा, ही प्रत्येकाची मनोमन इच्छा असते. अतीव सुंदरता आणि आणि वीजनिर्मिती या दोनही कारणांसाठी हा धबधबा सुप्रसिद्ध आहे; पण हा धबधबा पाहण्याकरिता वर्षभर जगभरातील पर्यटकांची गर्दी असते. साधारणतः आठ कोटी पर्यटक दरवर्षी या धबधब्याला भेट देतात. त्यामुळे तिकीट काढून दोन-तीन तास रांगेत उभे राहावेच लागले.

अमेरिका-कॅनडाला जोडणारा पूल

अमेरिकेतील न्यू जर्सी पासून साधारण 400 मैल अंतरावर बफेलो या गावाच्या जवळ असलेला नायगारा खरे म्हणजे नदी नाही. तो दोन मोठ्या सरोवरांना सांधणारा 30 मैल लांबीचा एक दुवा आहे. या 30 मैल लांबीच्या प्रवाहास मग कालांतराने नायगारा नदी म्हणूनच संबोधले जाऊ लागले. ही नदी पूर्वेस असणारे ‘ऑटेरिओ’ सरोवर आणि पश्‍चिमेस असणारे ‘ऐरी’ सरोवर यांना जोडते. एक सरोवर दुसऱ्‍या सरोवरापेक्षा 160 फुटांनी कमी उंचीवर असल्यामुळे ‘ऐरी’ सरोवराचे पाणी मोठ्या कठड्यावरून उड्या घेत कमी उंचीवर असलेल्या ‘ऑटेरिओ’ सरोवरास मिळते.

नायगारा फॉल्स
नायगारा फॉल्स रंगबिरंगी लाईटचे दृश्य

तीन धबधब्यांचा समूह

जगभराचे आकर्षण असलेला नायगारा हा तसा तीन धबधब्यांचा समूह आहे. एक ‘अमेरिकन फॉल’, एक ‘हॉर्स शू फॉल’, तर एक ‘ब्रायडल व्हेल फॉल’. अमेरिका व कॅनडा देशांच्या सीमेवर हा धबधबा असून तो दोन भागात विभागलेला आहेत. दोन धबधबे पूर्णतः अमेरिकेच्या हद्दीत आहेत. मुख्य धबधब्याचा बराचसा भाग कॅनडा देशाच्या हद्दीत असल्यामुळे त्याचे ‘कॅनेडियन फॉल’ असे नामकरण झालेले आहे. ‘अमेरिकन फॉल’च्या डाव्या बाजूने नायगारा नदीचे पाणी सुमारे एक हजार फूट लांबीच्या व 157 फूट उंचीच्या कड्यावरून कोसळत असते या महाकाय धबधब्याचे रूपच इतके विलक्षण आहे, की अनेक जण त्या दृश्‍याने वेडे होतात.

दहा हजार वर्षांपूर्वी भौगोलिक हालचालींतून निर्मिती

हिमयुगात साधारणत: दहा हजार वर्षांपूर्वी झालेल्या विविध भौगोलिक हालचालींत या परिसरातील प्रस्तर एकावर एक चढल्यानेहा हा मोठा पाण्याचा प्रवाह म्हणजेच नायगारा फॉल्स आणि अमेरिकेतील ग्रेट लेक्स तयार झाले. प्रत्येक मिनिटाला 40 लाख चौरस फूट पाणी जमिनीवर आदळणारा हा जगातील त्या अर्थाने सगळ्यात मोठा धबधबा आहे. गोट आयलंडने या धबधब्याचे अमेरिकन फॉल्स आणि हॉर्स शू फॉल्स असे दोन भाग झाले आहेत.

हॉर्स शू आणि अमेरिकन फॉल्स

हॉर्स शू फॉल्स हा धबधबा कॅनडाच्या सीमेला लागून आहे. तिथून पुढे अमेरिकन प्रदेश चालू होतो. त्या अमेरिकी हद्दीत दुसरा म्हणजे अमेरिकन फॉल्स हा अप्रतिम अप्रतिम सौंदर्याचा धबधबा आहे. हॉर्स शू फॉल्सची उंची 173 फूट असून तो 2,600 फूट लांब आहे. तर अमेरिकन फॉल्स 80 ते 100 फूट उंच आहे, तर त्याची लांबी सुमारे 1,060 फूट आहे. भोवतालच्या हिरव्यागर्द डोंगरातून पडणाऱ्‍या पांढऱ्‍या शुभ्र धारा पर्यटकांचे मन मोहून टाकतात. हा धबधबा तिथे येणाऱ्यांना वेगळीच ऊर्जा, उत्साह, जोम, आवेश आणि उत्स्फूर्तता देतो.

गर्जणार्‍या वाऱ्याच्या देवाची रंजक दंतकथा

प्राचीन काळी उत्तर अमेरिकेतील कॅनडाच्या प्रदेशात ऑन्गीएर्स नावाची एक जमात राहत होती. या जमातीत एक सुंदर तरुणी होती. त्या तरूणीच्या वडिलांनी तिच्या मनाविरुद्ध तिचा विवाह आपल्या जमातीच्या वयोवृद्ध राजाशी लावून देण्याचा निर्णय घेतला. तिला मात्र हा निर्णय मुळीच मान्य नव्हता. तिचे दुसर्‍याच एका तरुणावर मनापासून प्रेम होते. एका प्रचंड मोठ्या धबधब्याजवळ असलेल्या गुहेत हा तरुण राहत असे. या तरुणाला गर्जणार्‍या वार्‍याचा देव म्हणून ओळखले जात होते.

प्रियकराला शोधण्यासाठी नावेतून धबधब्यात

या तरुणीने आपल्या मनातील राजाविषयीचा तिटकारा व्यक्त करताच मोठा गहजब झाला. जमातीतल्या लोकांनी या तरुणीला वाळीत टाकण्याची शिक्षा फर्मावली. या तरुणीने आपल्या प्रियकराला शोधून काढण्याच्या निश्चय केला. एक लहानशी नाव घेऊन त्या नावेतून ती तरुणी धबधब्याच्या दिशेने निघाली. ती धबधब्याच्या टोकाला येताच तिच्या नावेसह खाली कोसळली. मात्र, तिच्या प्रियकराने धबधब्याच्या खाली असलेल्या तिला अलगद झेलले.

लीलावाला-हेनो यांची अजरामर प्रेमकहाणी

आज शेकडो वर्षांनंतरही त्या धबधब्याच्या परिसरात या तरुण-तरुणीची ही दंतकथा अजरामर आहे. धबधब्यामागच्या गुहेत आजही त्या तरुण-तरुणीचे वास्तव्य असल्याचे स्थानिक मानतात. त्या तरुणीचे नाव होते लीलावाला, तर तिच्या प्रियकराचे हेनो! लीलावाला आणि हेनो यांची प्रेमकहाणी आजही या धबधब्याच्या परिसरात दंतकथा बनून अजरामर आहे. तो जगप्रसिद्ध धबधबा म्हणजेच आजचा नायगारा!

लीलावाला नावाच्या तरुणीची दुसरी अख्यायिका

एकदा एका प्रमुखाची लीलावाला नावाची सुंदर मुलगी बोटीत बसून निघाली. त्या मुलीच्या शेवटच्या करुण कटाक्षाने बापाचे हृदय विरघळून गेले. बापाने लागलीच दुसऱ्‍या बोटीतून पोरीचा पाठलाग सुरू केला आणि शेवटी दोघेही कठड्यावरून खाली उतरून दिसेनासे झाले, अशी ही मनाला विषण्ण करणारी कथा आहे. अशा कितीतरी कथा या रंगेल व भीषण नायगाऱ्‍या भोवती केंद्रित झाल्या आहेत. आपल्याच धुंदीत रंगेलपणे कोणाची पर्वा न करता आपली वाटचाल करणारा हा रांगडा नायगारा आहे.

रेड इंडियन्सनी मानले दैवत

नायगाराला रेड इंडियन्सनी प्रत्यक्ष दैवतच मानले. या कृतीच्या बुडाशी कोणी भीषण दैवत असल्याची त्यांची एक समजूत होती. या धबधब्यात वास करणाऱ्‍या जलदेवतेला संतुष्ट करण्यासाठी वर्षातून एकदा गावातली एखादी सुंदर कुमारिका बळी देण्याची प्रथा होती. बळी जाणाऱ्‍या त्या कुमारिकेस फुलांनी श्रृंगार करून एका नावेतून पाण्याच्या प्रवाहात सोडून देण्यात येत असे.

नायगारा धबधबा खरी मजा रात्री, कॅनडाच्या बाजूने

नायगारा धबधबा पहायची खरी मजा आहे ती रात्री आणि तीही कॅनडाच्या बाजूने. रात्री ऑब्झरवेशन पॉइंटवर जाऊन हा रंगीत प्रकाशाचा शो पाहायला हवा. कॅनडाच्या बाजूने अमेरिकेच्या बाजूच्या हॉर्स शू फॉल्ससह दोन धबधब्यांमधून पडणाऱ्या पाण्यावर रंगबिरंगी लाईट सोडलेले असतात. इंद्रधनुष्याचे रंग धबधब्यातील पाण्यात उतरण्याचे हे मनोहारी दृश्‍य पहायची मजा औरच असते. अमेरिकेच्या बाजूने सोडलेले लाईट्स तुलनेने तेव्हढे छान दिसत नाहीत.

नायगारा फॉल्स
नायगारा फॉल्स रात्रीचे दृश्य

दर मिनिटाला बदलणारे पाण्याचे रंग

रात्रीच्या वेळी कोसळणाऱ्या धबधब्याच्या पाण्याचा आवाज आणि वेगवेगळ्या रंगात दिसणारे पाणी, हा डोळ्यांचे पारणे फेडणारा नजारा असतो. तेथून नजर हटत नाही. कितीही वेळ कुणी तिथे थांबले तरी तिथून निघावेसे वाटत नाही. दर मिनिटाला बदलणारे पाण्याचे रंग आणि वेगवेगळ्या रंगात न्हाऊन निघत असलेला नायगारा हे खरोखर जणू धरतीला पडलेले सुंदर स्वप्न भासते. अमेरिकेत येऊन नायगारा पाहू न शकणारे लोक तसे कमनशिबीच.

‘गोट आयलंड’ नावामागील बोकडकथा

नायगारा धबधब्याच्या समूह असलेल्या बेटाला ‘गोट आयलंड’ हे नाव पडले आहे. या नावामागील किस्सा फारच मजेदार आहे. पूर्वी या बेटावर म्हणे पुष्कळ बोकड असायचे. कडाक्याची थंडी 1779 साली पडल्यामुळे यातील अनेक बोकड मरून पडले. त्यातील एक दाढीवाला बोकड फक्त जिवंत राहिला. स्थानिक लोकांनी त्यानंतर या बेटाला ‘गोट आयलंड’ हे नाव दिले. तेव्हापासून तीच ओळख कायम झाली.

लिफ्टने 157 फूट खाली

नायगारा धबधब्याच्या पाणी पडणाऱ्या भागात प्रवेश करण्यासाठी लिफ्ट आहे. तिथपर्यंत जाण्या-येण्याकरिता दोन डब्याच्या ट्रॉली बसची सोय आहे. लिफ्टने जवळ जवळ 157 फूट खाली जावे लागते. तेथून खाली गेल्यावर पातळ रेनकोट व रबरी स्लीपर दिल्या जातात. अमेरिकेच्या बाजूचा नायगारा पाहण्यासाठी तयार केलेल्या लाकडी जिन्यावरून बरेच वर चढून जावे लागते आणि एका गुहेच्या वाटेने जावे लागते. आपल्या अंगावर पाण्याचे प्रचंड तुषार उडत असताना दिसणारे स्वर्गीय दृश्‍य विलोभनीय असते. तेथून सभोवतालचे दृश्‍यही पाहण्यासारखे आहे.

मेड ऑफ दि मिस्ट टूर

1848 साली सुरू झालेली ही बोट आजही आपल्याला ‘नायगाराची सफर घडवते. धबधब्याचे पाणी पडणाऱ्या खालच्या नदीपात्रातील पाण्यामध्ये सफर करण्यासाठी म्हणून वापरातील बोट म्हणजे ‘मेड ऑफ द मिस्ट टूर’ होय. ही बोट दोन्ही धबधब्याच्या अगदी जवळून फेरफटका मारून आणते. या दोन्ही धबधब्यांच्या फेसाळणाऱ्या प्रवाहाचे उडणारे पाणी अंगावर रोमांच निर्माण करते. हा अनुभव खूप रंजक आहे. मात्र, यासाठी अमेरिकी बाजूने नायगारावर जावे लागते. कॅनडाच्या बाजूने या रोमांचक अनुभवाची सोय नाही.

धबधब्यांच्या फेसाळणाऱ्या प्रवाहाचे तुषार

तिकीट काढायचे आणि निळ्या किंवा पिवळ्या रंगाचा रेनकोट अंगावर चढवायचा आणि ‘मेड ऑफ द मिस्ट टूर’च्या बोटीत डेकवर जाऊन उभे राहायचे. दोन्ही धबधब्यांच्या फेसाळणाऱ्या प्रवाहाचे उडणारे पाणी अंगावर घेत या बोटीतून फिरायचे. पाण्याचे तुषार इतके जोरात अंगावर येत असतात की आपण त्यात चिंब भिजूनच जातो. त्यामुळे धबधब्याच्या जवळून फोटो काढणे हे जरा अवघडच जाते. दोन्ही धबधब्यांच्या अगदी जवळून जाता येत असल्याने फार मजा येते.

वंडरवर्ल्ड : केव्ह ऑफ द विंड्स

केव्ह ऑफ द विंड्स येथूनही निळ्या किंवा पिवळ्या रंगाचा रेनकोट अंगावर चढवून नायगारा धबधबा अगदी जवळून न्याहाळता येतो. रात्री नायगारा ॲडव्हेंचर थिएटरमध्ये 45 फूट उंचीच्या स्क्रीनवर नायगारा फॉलवर आधारित 30 मिनिटांचा ‘लेजंड्स ऑफ ॲडव्हेंचर’ नावाचा शो असतो. त्यात नायगाराचा इतिहास व संबंधित रोमांचकारी घटना चित्रित करण्यात आलेल्या आहेत.

अमेरिका, कॅनडा दोन्ही बाजूंसाठी कॉमन व्हिसा बंद

1980 सालानंतर कॅनडा सरकारने नायगारा आणि पर्यटन यांच्यावर खूप विचार करून कॅनडाच्या बाजूला अनेक चांगली हॉटेल्स आणि पर्यटकांना आवडेल अशा अनेक गोष्टी केल्या. येथे दोन्ही देश जोडणारा एक मोठा पूल असून पूर्वी हा धबधबा अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही बाजूंनी एकाच व्हिसा वर पाहता यायचा. पण 7/11 नंतर सुरक्षेच्या कारणास्तव हे सर्व प्रकार बंद झाले आणि आता दोन्ही देशांचा व्हिसा असल्याशिवाय दोन्ही बाजूंनी हा पाहता येत नाही.

जमिनीची झीज टाळण्यासाठी अभिनव प्रयोग

या धबधब्यातून 187 मेगावॉट एवढी वीजनिर्मिती होते. या धबधब्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात झीज होते. ती टाळण्यासाठी 1968 मध्ये अमेरिकन फॉल्स काही काळासाठी पूर्ण बंद करण्यात आला होता. जास्तीचे पाणी तेव्हा हॉर्स शू फॉल्समधून सोडण्यात आले होते. जमिनीखालचे पाण्याचे प्रवाह काळजीपूर्वक बंद करून जमिनीची झीज होणार नाही, याची काळजी घेतली गेली. यासाठी एक छोटेसे तात्पुरते धरण अमेरिकन फॉल्सच्या अलीकडे बांधण्यात आले होते. त्याचे तेव्हाचे फोटो त्यांनी जतन करून ठेवले आहेत. सर्व डागडुजी करून झाल्यावर बॉम्बने हे धरण उडवून देण्यात आले आणि परत अमेरिकन फॉल्सचा जलप्रवाह सुरू झाला.

धबधब्यात उडी मारून जिवंत राहण्याचा पराक्रम

नायगारा संबंधातले रंजक किस्से आणि आख्यायिकाही खूप आहेत. या धबधब्यावरून कोणी दोरावर चालत गेले. अनेकांनी धबधब्यात उड्या घेऊनही जिवंत राहण्याचा पराक्रम केला आहे. कोणी आत्मार्पण केले. अनेक जणांनी या धबधब्यात उडी मारून खाली जिवंत राहण्याचा पराक्रम केला आहे. याची सुरुवात 1829 साली झाली. 1901 साली 63 वर्षीय एनी एड्सन या एका शाळेच्या शिक्षिकेने पहिल्यांदा ड्रममधून या धबधब्यात उडी मारायचा पराक्रम केला. तिला यात खूप त्रास झाला पण फारशी इजा झाली नाही. तिच्यानंतर एकूण 14 जणांनी असे उपद्व्याप केले.

श्री साई राम प्लास्टिक अँड इरिगेशन

हनीमून कॅपिटल ऑफ वर्ल्ड

कॅनडा सरकारने उत्सुक व हौशी लोकांना नायगारा फॉलच्या साक्षीने विवाह करता यावा यासाठी नायगारा फॉल स्टेट पार्कमध्ये सोयसुद्धा केलेली आहे. नायगाऱ्‍याला सुमारे आठ कोटी लोक दरवर्षी भेट देतात, तसेच वर्षानुवर्षे जगातील सर्व प्रांतांतील विवाहीत जोडपी हनीमूनसाठी नायगाऱ्‍याला येत असतात, म्हणून नायगारा फॉल्सला ‘हनीमून कॅपिटल ऑफ वर्ल्ड’ असेही संबोधतात.

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, जळगाव

तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
Shocking : आजही एक भारतातील रेल्वेमार्ग ब्रिटिशांच्या ताब्यात..! काय आहे हा मामला, ते जाणून घ्या…
जगातले एक शापित गाव, जिथे वयात येताना मुलींचा होतो मुलगा! वयाच्या 12 व्या वर्षानंतर मुलींमध्ये होऊ लागतात शारीरिक बदल!!

Share this:

  • Facebook
  • X
Tags: अमेरिकन फॉलकेव्ह ऑफ द विंड्सगोट आयलंडनायगारा धबधबानायगारा फॉल्सनिसर्गाला पडलेले अद्भुत स्वप्नब्रायडल व्हेल फॉलमेड ऑफ दि मिस्ट टूररंजक प्रेमकथारेड इंडियन्सनीवंडरवर्ल्डसौंदर्याचा धबधबाहॉर्स शू फॉल
Previous Post

शेणखताचे महत्त्व : सेंद्रिय कर्ब उत्पादकता वाढीत शेण खताचे फायदे.. निमित्त बैल पोळा..!

Next Post

ग्राहक व शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून शासनाने आणली ‘ही’ योजना ; जाणून घ्या… संपूर्ण माहिती

Next Post
ग्राहक व शेतकऱ्यांचे हित

ग्राहक व शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून शासनाने आणली 'ही' योजना ; जाणून घ्या... संपूर्ण माहिती

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

AI

AI, ड्रोनचा शेतीत वापर काळाची गरज – अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2025
0

मका एकरी 75 क्विंटल उत्पादन

खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अ‍ॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.