• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

दुग्धव्यवसायात गोठा व्यवस्थापनाचे खूप महत्व आहे.. कसे असावे आदर्श गोठा व्यवस्थापन जाणून घेऊ…

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 22, 2021
in हॅपनिंग
2
दुग्धव्यवसायात गोठा व्यवस्थापनाचे खूप महत्व आहे.. कसे असावे आदर्श गोठा व्यवस्थापन जाणून घेऊ…
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

गोठा चांगला असेल तर दुधाळ गायी व म्हशींचे स्वास्थ्य चांगले राहते. सुधारित पद्धतीमुळे गोठ्यातील कामे सहजपणे होतात, मनुष्यबळ कमी लागते, तसेच जनावरांचे दुग्ध उत्पादनही वाढते.

गोठा बांधताना शेतातील उंचावर असलेली कठीण व सपाट जागा निवडावी, जेणेकरून गोठ्यातील मल-मूत्र, सांडपाणी याची विल्हेवाट व्यवस्थित लावता येईल. चार्‍यासाठी योग्य प्रकारची गव्हाण आणि प्रत्येक जनावरास हालचालीसाठी पुरेशी जागा मिळेल याची काळजी घ्यावी. गोठ्याचे छत योग्य उंचीवर आणि न गळणारे असावे. गोठ्यात भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील अशी व्यवस्था असावी.

अ‍ॅग्रोवर्ल्ड व आत्मा (नाशिक) तर्फे 23 ऑक्टोबरला नाशिकमध्ये एकदिवसीय दुग्धव्यवसाय कार्यशाळा; प्रवेश मर्यादित..

 

 

गोठ्यातील गटार, गव्हाण, दिशा आणि सूर्यप्रकाश
गोठ्यातील गटार, गव्हाण व जनावरांना उभे राहण्याच्या जागेवर भरपूर सूर्यप्रकाश येण्यासाठी शक्यतो लांबीच्या बाजूने गोठा दक्षिण-उत्तर दिशेस असावा. गोठ्यातील जमिनीकरिता भाजलेल्या विटा किंवा दगडी फरशा असाव्यात (फारशी जास्त गुळगुळीत, घसरणारी नको). जमिनीस गव्हाणीकडून उतार दिलेला असावा. जनावरांना योग्य पद्धतीने चारा खाता येईल, या पद्धतीने गव्हाण बांधावी. गव्हाणीचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि काठ गोलाकार असावा. गोठा हवेशीर राहील या पद्धतीने भिंतीचे बांधकाम करावे. गोठ्यातील छत वजनाने हलके, कठीण व टिकाऊ असावे. जनावरांना ताजे व स्वच्छ पाणी सदैव उपलब्ध राहण्यासाठी टाकी काँक्रिटमध्ये बांधून घ्यावी. जनावरांचे शेण-मूत्र जमा करण्यासाठी गोठ्याच्या कडेने योग्य आकाराचे गटार करावे. गोठा बांधताना पशुतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

गोठयात जनावर बांधण्याच्या पद्धती
जनावरांना गोठ्यात बांधताना शेपटीपुढे शेपटी (टेल टू टेल) या पद्धतीने बांधता येतात. जनावरांना धुण्यासाठी व दूध काढण्यासाठी दोन्ही ओळींमधील जागा अधिक उपयोगी पडते. जनावराचे तोंड बाहेरच्या बाजूस असल्याने संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता कमी असते, तसेच बाहेरच्या बाजूने ताजी हवा मिळते. दूध काढणार्‍यांवर देखरेख करणे सोपे जाते. माजावरील जनावरे सहज ओळखता येतात. मजूर कमी लागतात.

तोंडाकडे तोंड (माऊथ टू माऊथ) पद्धत
तोंडाकडे तोंड करून बांधलेल्या जनावरांचे योग्य पद्धतीने निरीक्षण करता येते. गोठ्याच्या दोन्ही बाजूस मोकळी जागा असल्यामुळे सूर्यप्रकाश भरपूर मिळतो. जनावरांना चारा व पाणी टाकणे सोपे जाते. याशिवाय स्वच्छता राखली गेल्याने विविध रोगप्रसार कमी प्रमाणात होतो.
दुभत्या गाईंना आरोग्यदायक थंडी, ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करणारा गोठा हवा असतो. दुभत्या संकरीत जनावरांना अधिक आजारांची उत्पत्ती ही अस्वच्छ गोठयामुळे होत असते हे लक्षात घ्यावे. साधारणत: पाच गाईंसाठी 20 फूट लांब व 8 फूट रुंद अशी 160 चौ. फूट जागा लागते.

 

गोठा बांधताना...
गोठा बांधताना तो पूर्व – पश्चिम दिशेस लांब असा बांधावा. ऊन, वारा, पावसापासून संरक्षण होण्यासाठी समोरच्या बाजूच्या भिंतीची उंची 6 फूट तर पाठीमागील बाजूच्या भिंतीची उंची 6 ते 7 फूट ठेवावी. पैशांच्या उपलब्धतेप्रमाणे दगड किंवा विटाची भिंत बांधून घ्यावी. त्यावर सिमेंटचे अथवा चुन्याचे प्लॅस्टर करावे. त्यामुळे गोचिडांना राहण्यासाठी अथवा अंडी घालण्यासाठी जागा मिळत नाही. समोरील भिंतीलगत 2 फूट रुंद, 2 फूट उंच आणि आतून दीड फूट खोल गव्हाण बांधून घ्यावी. दर चार फुटावर लोखंडी अँगल्समध्ये एक कडी गाय बांधण्यासाठी बसवून घ्यावी.

गोठ्याची उंची सर्वसाधारणपणे 10 ते 12 फूट ठेवावी. गोठ्याच्या समोरील व पाठीमागील भिंतीच्या वरील मोकळ्या भागाला चेनलिंक जाळी बसवून घ्यावी. जमिनी मुरूमरहीत किंवा शक्य असल्यास कोबा, फरशी, घडवलेल्या दगडाची करता येते. गव्हाणीपासून जमिनीला साधारण 1 फुटास 1/2 इंचाचा उतार द्यावा. शेवटी गटार असावी. गोठ्यातील जनावरांना ताज्या व स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी. शेणखताचे खड्डे किंवा उकिरडा गोठ्यापासून दूर अंतरावर असावा.

1) गोठ्याची स्वच्छता- गोठा स्वच्छ असला पाहिजे. खेळती हवा व भरपूर सूर्यप्रकाश येईल अशी गोठ्याची रचना असावी. दूध काढण्याची जागा स्वच्छ असावी. दूध काढताना जमिनीवर कुठलाही कचरा अगर शेण असू नये. गोठा निर्जंतुक पाण्याने स्वच्छ धुवावा, त्यामुळे धूळ उडणार नाही. जमिनीपासून चार-पाच फुटांपर्यंत चुना लावावा, त्यामुळे गोठा जंतूविरहित राहतो; तसेच गोमूत्र व पाणी निचरा होईल अशी गोठ्याची रचना असावी. गोठ्याबरोबर शोषखड्डा करून त्यात मलमूत्र साठवावे, त्यामुळे डास होणार नाहीत.

2) जनावरांची स्वच्छता- दुधाची धार काढण्यापूर्वी जनावरांस पाण्याने स्वच्छ धुवावे. त्यानंतर शिफारशीत जंतुनाशकाच्या द्रावणाने कास व कासेजवळील भाग, सड स्वच्छ धुवावेत. कोरड्या फडक्याने कास पुसून घ्यावी. जेणेकरून कास व कासेच्या भागातील बारीक केस, धूळ दुधात पडणार नाही.

3) दोहन करणार्‍या व्यक्तीची स्वच्छता- दूध काढणारी व्यक्ती स्वच्छ व निरोगी असणे आवश्यक आहे. त्याची नखे वाढलेली नसावीत, त्याचे कपडे स्वच्छ असावेत. दूध काढण्यापूर्वी त्या व्यक्तीने साबण किंवा सोड्याने हात स्वच्छ धुवावेत. धार काढताना शिंकणे, थुंकणे, खोकणे, तंबाखू खाणे इत्यादी गोष्टी वर्ज्य कराव्यात. आजारी किंवा जखमा असलेल्या जनावरांचे दूध वेगळ्या भांड्यात अगर शेवटी काढावे.

4) दुधाच्या भांड्याची स्वच्छता- दूध खराब होण्याचे किंवा प्रत खालावण्याचे प्रमुख कारण म्हणजे भांड्यांमुळे रोगजंतूंची मोठ्या प्रमाणावर वाढ होते. हे टाळण्यासाठी भांडी प्रथम थंड पाण्याने धुऊन घ्यावी. नंतर गरम पाण्यात सोडा टाकून धुवावीत. धार काढण्याच्या बादल्या, किटल्या, चरव्या, कॅन यांना कमीत कमी कोपरे असावेत.

5) दूध काढण्याची पद्धती- सर्वसाधारणपणे सडाच्या भोवती चार बोटे लावून अंगठा दुमडून दूध काढतात, त्यामुळे सडांना इजा होण्याची, कासदाह होण्याची शक्यता अधिक असते. याउलट पूर्ण हाताचा वापर ही सर्वांत योग्य व चांगली पद्धत आहे. यामध्ये अंगठा न दुमडता पाचही बोटांत (मुठीत) सड पकडून धारा काढल्या जातात.

6) दूध काढल्यानंतर घ्यावयाची काळजी- दूध काढल्यानंतर स्वच्छ गाळणीने गाळून घ्यावे, यामुळे दुधातील घाण, कचरा वेगळा होतो व प्रत राखण्यास मदत होते. दूध उन्हाळ्यात बर्फात व हिवाळ्यात थंड पाण्यात साठवून लवकरात लवकर संकलन व शीतकेंद्रात पाठवावे, तसेच दुधाची वाहतूक करणारे टँकर निर्जंतुकीकरण मिश्रणाने स्वच्छ करावेत व ते वातानुकूलित असावेत.

(स्रोत :- अ‍ॅग्रोवर्ल्ड प्रकाशन)

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: आदर्श गोठा व्यवस्थापनगव्हाणगोठ्याची स्वच्छताजनावरांची स्वच्छतादुग्धव्यवसायदुधाळ गायीदूध काढण्याची पद्धतीमाजावरील जनावरेसंसर्गजन्य रोग
Previous Post

 दुग्धव्यवसाय एकदिवसीय कार्यशाळा कार्यक्रमपत्रिका – अ‍ॅग्रोवर्ल्ड व आत्मातर्फे 23 ऑक्टोबरला नाशिकमध्ये एकदिवसीय सशुल्क दुग्धव्यवसाय कार्यशाळा; प्रवेश मर्यादित.. 🐮

Next Post

टोमॅटो उत्पादकांसाठी आनंदवार्ता.. तेजी टिकून राहणार.. जाणून घ्या कारणे… तसेच टोमॅटोचा दर्जा व उत्पादकता वाढीसाठी घ्यावयाची काळजी..

Next Post
टोमॅटो उत्पादकांसाठी आनंदवार्ता.. तेजी टिकून राहणार.. जाणून घ्या कारणे… तसेच टोमॅटोचा दर्जा व उत्पादकता वाढीसाठी घ्यावयाची काळजी..

टोमॅटो उत्पादकांसाठी आनंदवार्ता.. तेजी टिकून राहणार.. जाणून घ्या कारणे... तसेच टोमॅटोचा दर्जा व उत्पादकता वाढीसाठी घ्यावयाची काळजी..

Comments 2

  1. Dr Vasnt Bhoi says:
    4 years ago

    Very nice information about clean milk production.

  2. Deepak Gangurde says:
    4 years ago

    Ok

ताज्या बातम्या

e-NAM योजना

e-NAM योजना ; शेतकऱ्यांच्या उत्पादन विक्रीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2025
0

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 31, 2025
0

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2025
0

या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा

या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 28, 2025
0

मान्सून मुंबईत दाखल ! पुढील तीन दिवसात हवामान कसे असेल..??

मान्सून मुंबईत दाखल ! पुढील तीन दिवसात हवामान कसे असेल..??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 26, 2025
0

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

फळ, भाजीपाल्यातून 10 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 23, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

e-NAM योजना

e-NAM योजना ; शेतकऱ्यांच्या उत्पादन विक्रीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2025
0

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 31, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.