हैदराबाद : जगातील पहिल्या पूर्णतः स्वयंचलित स्मार्ट इलेक्ट्रिक ट्रॅक्टर कंपनी, “मोनार्क ट्रॅक्टर”ने आता भारतातही व्यावसायिक पदार्पण केले आहे. हैदराबादमध्ये कंपनीने कार्यालय सुरू केले असून लवकरच देशभर वितरकांचे जाळे उभारून चालकरहित ऑटोमॅटिक आणि चालकसहित रेग्युलर स्मार्ट इलेक्ट्रिक ट्रॅक्टर विक्रीला सुरुवात केली जाणार आहे. अमेरिकेतील “मोनार्क ट्रॅक्टर”ने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन व्हिजन ॲनालिटिक्स, स्वायत्तता (ऑटोनॉमी) मॉडेल क्षेत्रातील भारतीय स्टार्टअप “इनसाइट”सोबत अल्गोरिदम विकास तंत्रज्ञान करार केला आहे. याशिवाय, मोनार्क ट्रॅक्टर कंपनी भारतातील व्हीएसटी टिलर्स-ट्रॅक्टर्ससोबत आधीच तांत्रिक भागीदारीत आहे.
भारतात, प्रवासी इलेक्ट्रिक वाहने म्हणजेच ईव्ही कार व वाहनांचा बाजार अजून प्राथमिक अवस्थेतच आहे. शेती क्षेत्रात तर अजून सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर आणि पुण्यातील स्टार्ट-अपचा इलेक्ट्रिक बुल वगळता फारसे काही झालेले नाहीत. अशात अमेरिका, युरोपमध्ये अल्पावधीत लोकप्रिय ठरलेला मोनार्क ट्रॅक्टरचा पहिला पूर्णपणे इलेक्ट्रिक, आणि ड्रायव्हर ऑटोमॅटिक किंवा ऑप्शनल असलेला स्मार्ट ट्रॅक्टर भारतीय बाजारपेठेत उतरला आहे. कंपनीने डिसेंबर 2020 मध्ये तो अमेरिकेत लाँच केला होता.
गोगलगायचा बंदोबस्त करण्याचे उपाय
“मोनार्क ट्रॅक्टर”चे सहसंस्थापक-सीईओ भारतीय
भारताचे कृषी क्षेत्र खूप मोठे आहे. मात्र, ते मजूरप्रधान असूनही मोनार्कला या बाजारपेठेत स्वतःचा ठसा उमटवायचा आहे. “मोनार्क ट्रॅक्टर”चे सहसंस्थापक प्रवीण पेनमेत्सा हे भारतीय आहेत. त्यांना इथल्या शेती, मानसिकता आणि बाजारपेठेचा अभ्यास असल्याने कंपनीला त्याचा फायदा होईल. पेनमेत्सा म्हणाले, “आम्हाला आमचे ध्येय आणि कार्यक्षेत्र या दोन्हीमध्ये इनसाइट या भारतीय कंपनीशी भागीदारी, समन्वयाचा नक्कीच फायदा होणार आहे. मोनार्क ट्रॅक्टर्स नव्या युगातील शेतकर्यांना आधुनिक शेती मॉडेल्ससाठी अत्याधुनिक उपाय प्रदान करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. आम्ही आता आशियाई, भारतीय शेतीची गरज आणि भौगोलिक वातावरणाला पूरक अशा पद्धतीने ट्रॅक्टर व इतर उपकरणात बदल करू तसेच काही नव्याने विकसित करू. पर्यावरणपूरक, प्रदूषणरहित इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, ऑटोमेशन आणि डेटा विश्लेषण हे शाश्वत शेतीसाठी मदत करू शकतात. त्यामुळे मशागत व एकूणच शेतीचा खर्च कमी तर होईलच शिवाय कामे वेगाने व अचूक होऊ शकतील. मजुरांच्या टंचाईच्या समस्येवरही त्यामुळे मात करता येऊ शकेल.”
AGROWORLD’s Upcoming Exhibitions @ JALGAON, @ NASHIK, @ SHAHADA….
ड्रायव्हरविना चालणारी वाहने शेतांतील नियंत्रित वातावरणात उपयुक्त
भारतातील स्वैर, अनिर्बंध आणि नियम न जुमानणाऱ्या रस्ता वाहतुकीत किंवा रहदारीत स्वयंचलित वाहने चाचणीत अपयशी ठरताना दिसतात. मात्र, मर्यादित आणि नियंत्रित शेतजमिनीत ही स्वायत्त वाहने यशस्वी व उपयुक्त ठरू शकतात. त्यादृष्टीने “मोनार्क”ला त्यांचे ट्रॅक्टर व इतर उपकरणे अधिक सक्षमदृष्ट्या विकसित करण्यास बेंगळुरूस्थित आयटी स्टार्ट-अप कंपनी “इनसाइट”च्या तंत्रज्ञानाचे सहकार्य लाभत आहे. “इनसाइट”चे संस्थापक अनिरुद्ध रेड्डी यांनाही “मोनार्क”सोबत भागीदारी केल्याचा अभिमान वाटतोय. आमच्या संयुक्त कौशल्यातून भारतीय कृषी क्षेत्रात ऑटोमॅटिक सोल्यूशन आधारित पर्याय उपलब्ध करून देण्यात आम्ही यशस्वी ठरू व त्यातून शेतकऱ्यांना उत्पादकता वाढीस मदत होईल, असा विश्वास रेड्डी यांनी व्यक्त केला. कंपनी शेतातील कार्य निगराणीसाठी (साइट अॅक्टिव्हिटी) मशीन-माउंट केलेले कॅमेरे आणि सेन्सर वापरते. अनेक बांधकाम आणि खाण प्रकल्पांवर “इनसाइट”ने हे इन-कॅब एज कॉम्प्युटर कॅप्चर तंत्रज्ञान यशस्वीरित्या वापरले आहे.
First fully electric tractor company comes to India – Driver-less vehicles for farming. Monarch Partners with Einsite, an India-based AI Startup, to Accelerate Farm Autonomy.
Comments 4