• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

जगातील पहिल्या ड्रायव्हरविना चालणाऱ्या, फुल्ली स्मार्ट इलेक्ट्रिक ट्रॅक्टर कंपनीचे आता भारतातही पदार्पण

कंपनीच्या ताफ्यात शेतीसाठी उपयुक्त अनेक छोटी -छोटी इलेक्ट्रिक वाहने

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 14, 2022
in तांत्रिक
4
जगातील पहिल्या ड्रायव्हरविना चालणाऱ्या, फुल्ली स्मार्ट इलेक्ट्रिक ट्रॅक्टर कंपनीचे आता भारतातही पदार्पण
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

हैदराबाद : जगातील पहिल्या पूर्णतः स्वयंचलित स्मार्ट इलेक्ट्रिक ट्रॅक्टर कंपनी, “मोनार्क ट्रॅक्टर”ने आता भारतातही व्यावसायिक पदार्पण केले आहे. हैदराबादमध्ये कंपनीने कार्यालय सुरू केले असून लवकरच देशभर वितरकांचे जाळे उभारून चालकरहित ऑटोमॅटिक आणि चालकसहित रेग्युलर स्मार्ट इलेक्ट्रिक ट्रॅक्टर विक्रीला सुरुवात केली जाणार आहे. अमेरिकेतील “मोनार्क ट्रॅक्टर”ने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन व्हिजन ॲनालिटिक्स, स्वायत्तता (ऑटोनॉमी) मॉडेल क्षेत्रातील भारतीय स्टार्टअप “इनसाइट”सोबत अल्गोरिदम विकास तंत्रज्ञान करार केला आहे. याशिवाय, मोनार्क ट्रॅक्टर कंपनी भारतातील व्हीएसटी टिलर्स-ट्रॅक्टर्ससोबत आधीच तांत्रिक भागीदारीत आहे.

भारतात, प्रवासी इलेक्ट्रिक वाहने म्हणजेच ईव्ही कार व वाहनांचा बाजार अजून प्राथमिक अवस्थेतच आहे. शेती क्षेत्रात तर अजून सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर आणि पुण्यातील स्टार्ट-अपचा इलेक्ट्रिक बुल वगळता फारसे काही झालेले नाहीत. अशात अमेरिका, युरोपमध्ये अल्पावधीत लोकप्रिय ठरलेला मोनार्क ट्रॅक्टरचा पहिला पूर्णपणे इलेक्ट्रिक, आणि ड्रायव्हर ऑटोमॅटिक किंवा ऑप्शनल असलेला स्मार्ट ट्रॅक्टर भारतीय बाजारपेठेत उतरला आहे. कंपनीने डिसेंबर 2020 मध्ये तो अमेरिकेत लाँच केला होता.

गोगलगायचा बंदोबस्त करण्याचे उपाय

https://youtu.be/Xyl3ssIpLRA

“मोनार्क ट्रॅक्टर”चे सहसंस्थापक-सीईओ भारतीय

भारताचे कृषी क्षेत्र खूप मोठे आहे. मात्र, ते मजूरप्रधान असूनही मोनार्कला या बाजारपेठेत स्वतःचा ठसा उमटवायचा आहे. “मोनार्क ट्रॅक्टर”चे सहसंस्थापक प्रवीण पेनमेत्सा हे भारतीय आहेत. त्यांना इथल्या शेती, मानसिकता आणि बाजारपेठेचा अभ्यास असल्याने कंपनीला त्याचा फायदा होईल. पेनमेत्सा म्हणाले, “आम्हाला आमचे ध्येय आणि कार्यक्षेत्र या दोन्हीमध्ये इनसाइट या भारतीय कंपनीशी भागीदारी, समन्वयाचा नक्कीच फायदा होणार आहे. मोनार्क ट्रॅक्टर्स नव्या युगातील शेतकर्‍यांना आधुनिक शेती मॉडेल्ससाठी अत्याधुनिक उपाय प्रदान करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. आम्ही आता आशियाई, भारतीय शेतीची गरज आणि भौगोलिक वातावरणाला पूरक अशा पद्धतीने ट्रॅक्टर व इतर उपकरणात बदल करू तसेच काही नव्याने विकसित करू. पर्यावरणपूरक, प्रदूषणरहित इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, ऑटोमेशन आणि डेटा विश्लेषण हे शाश्वत शेतीसाठी मदत करू शकतात. त्यामुळे मशागत व एकूणच शेतीचा खर्च कमी तर होईलच शिवाय कामे वेगाने व अचूक होऊ शकतील. मजुरांच्या टंचाईच्या समस्येवरही त्यामुळे मात करता येऊ शकेल.”

AGROWORLD’s Upcoming Exhibitions @ JALGAON, @ NASHIK, @ SHAHADA….

 

ड्रायव्हरविना चालणारी वाहने शेतांतील नियंत्रित वातावरणात उपयुक्त

भारतातील स्वैर, अनिर्बंध आणि नियम न जुमानणाऱ्या रस्ता वाहतुकीत किंवा रहदारीत स्वयंचलित वाहने चाचणीत अपयशी ठरताना दिसतात. मात्र, मर्यादित आणि नियंत्रित शेतजमिनीत ही स्वायत्त वाहने यशस्वी व उपयुक्त ठरू शकतात. त्यादृष्टीने “मोनार्क”ला त्यांचे ट्रॅक्टर व इतर उपकरणे अधिक सक्षमदृष्ट्या विकसित करण्यास बेंगळुरूस्थित आयटी स्टार्ट-अप कंपनी “इनसाइट”च्या तंत्रज्ञानाचे सहकार्य लाभत आहे. “इनसाइट”चे संस्थापक अनिरुद्ध रेड्डी यांनाही “मोनार्क”सोबत भागीदारी केल्याचा अभिमान वाटतोय. आमच्या संयुक्त कौशल्यातून भारतीय कृषी क्षेत्रात ऑटोमॅटिक सोल्यूशन आधारित पर्याय उपलब्ध करून देण्यात आम्ही यशस्वी ठरू व त्यातून शेतकऱ्यांना उत्पादकता वाढीस मदत होईल, असा विश्वास रेड्डी यांनी व्यक्त केला. कंपनी शेतातील कार्य निगराणीसाठी (साइट अ‍ॅक्टिव्हिटी) मशीन-माउंट केलेले कॅमेरे आणि सेन्सर वापरते. अनेक बांधकाम आणि खाण प्रकल्पांवर “इनसाइट”ने हे इन-कॅब एज कॉम्प्युटर कॅप्चर तंत्रज्ञान यशस्वीरित्या वापरले आहे.

 

 

First fully electric tractor company comes to India – Driver-less vehicles for farming. Monarch Partners with Einsite, an India-based AI Startup, to Accelerate Farm Autonomy.

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अनिरुद्ध रेड्डीइनसाइट स्टार्ट-अपई-ट्रॅक्टरड्रायव्हररहित तंत्रज्ञानप्रवीण पेनमेत्साफुल्ली ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमोनार्क ट्रॅक्टरविनाचालक वाहनस्वयंचलित शेती उपकरणे
Previous Post

राज्यभरातील धरणांमधील पाणीसाठ्यात गेल्या दोन आठवड्यात दहा टक्क्यांनी वाढ

Next Post

हर्बल फार्मिंग : कलियुगातील संजीवनी असलेल्या नोनी फळाच्या व्यावसायिक शेतीतून कमवा बंपर पैसे, प्रक्रियेतून मिळेल Best A1 नफा

Next Post
हर्बल फार्मिंग : कलियुगातील संजीवनी असलेल्या नोनी फळाच्या व्यावसायिक शेतीतून कमवा बंपर पैसे, प्रक्रियेतून मिळेल Best A1 नफा

हर्बल फार्मिंग : कलियुगातील संजीवनी असलेल्या नोनी फळाच्या व्यावसायिक शेतीतून कमवा बंपर पैसे, प्रक्रियेतून मिळेल Best A1 नफा

Comments 4

  1. Pingback: असे आहेत मंत्रिमंडळाचे कृषी व ग्रामविकासाशी निगडित महत्त्वाचे निर्णय.. - Agro World
  2. Pingback: 500 रुपये किलोने विकला जाणारा काळा तांदूळ शेतकऱ्यांना बनवेल करोडपती, जाणून घ्या त्याविषयी सारे का
  3. Pingback: भारतातील एक अनोखे गाव जिथे दुकाने आहेत, पण दुकानदार नाही; आजवर कधीही झालेली नाही चोरी-लबाडी! - Agro World
  4. Pingback: युक्रेन-रशिया युद्धामुळे जग अन्न संकटाच्या फेऱ्यात! - Agro World

ताज्या बातम्या

राज्यात थंडीची लाट

राज्यात थंडीची लाट कायम!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 2, 2025
0

एमएसएमई कर्ज योजना

शेती उद्योगासाठी एमएसएमई कर्ज योजना – अर्ज कसा करावा?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 1, 2025
0

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 18, 2025
0

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 16, 2025
0

पीक विमा

रब्बी पीक विमा: मुदत जवळ आली! शेतकऱ्यांनो, हे 5 मोठे बदललेले नियम तुम्हाला माहित आहेत का?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 15, 2025
0

शेती-माती ते वर्ल्ड कप

शेती-माती ते वर्ल्ड कप: रेणुका सिंग ठाकूरचा प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2025
0

गुजरातच्या विक्रमी केळी उत्पादकतेचे रहस्य

गुजरातच्या विक्रमी केळी उत्पादकतेचे रहस्य आणि भरघोस उत्पादनाासाठीच्या खास टिप्स!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2025
0

न्याय्य व्यापार करारा

ट्रम्प नरमले! भारतासोबत ‘न्याय्य व्यापार करारा’चे संकेत, आयात शुल्क कमी होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 12, 2025
0

थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 11, 2025
0

AI

शेतात AI कसे वापरावे? सोप्या ट्रिक, मोठे फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 10, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

राज्यात थंडीची लाट

राज्यात थंडीची लाट कायम!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 2, 2025
0

एमएसएमई कर्ज योजना

शेती उद्योगासाठी एमएसएमई कर्ज योजना – अर्ज कसा करावा?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 1, 2025
0

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 18, 2025
0

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 16, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish