• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

गांडूळ शेती समृद्धीची एक वाट

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 4, 2022
in तांत्रिक
0
गांडूळ शेती समृद्धीची एक वाट
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

गांडूळ खत आणि त्याची जमिनीमधील उपस्थितीची उपयुक्तता ही निर्विवादपणे सर्वसामान्य गोष्ट आहे. गांडूळ खत तयार करण्यासाठी फार कमी खर्च येतो. शिवाय त्यापासून मिळणारे खताचे मूल्य अमूल्य असते.

अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीवर 8 जानेवारीला कार्यशाळा.. आता त्रिस्तरीय मत्स्य पालनातून मिळवा तिप्पट उत्पन्न..

गांडूळ जीवनक्रम : गांडूळाच्या जीवनामध्ये अंडी, बाल्यावस्था आणि पूर्णावस्था अशा तीन अवस्था असतात. या सर्व अवस्थांसाठी ओलसर जमीन आवश्यक असते. गांडूळांचा जीवनक्रम प्रामुख्याने त्याच्या जातीवर अवलंबून असतो. पूर्ण वाढ झालेल्या गांडूळामध्ये स्त्री आणि पुरुष जनन असे दोन्हीही अवयव असतात. गांडूळ प्रत्येक सहा ते सात दिवसांनी अंडी टाकते. या अंड्यामध्ये दोन ते वीस गर्भ असतात. अंडी अवस्था हवामानाचे अनुकूलतेनुसार 7 ते 20 दिवसांची असते. गांडूळांची अपूर्ण अवस्था दोन ते तीन महिन्यांची असते. त्यानंतर तो जेव्हा पूर्णावस्थेत येतो तेव्हा तोंडाकडील 2 ते 3 सेंटीमीटर अंतरावरील अर्धा सेंटीमीटर आकाराचा भाग जाड होतो. हे वयात आलेल्या गांडूळाचे लक्षण होय. सर्वसाधारणपणे गांडूळाचे आयुष्य दोन तेे तीन वर्षाचे असते. इसिनीया फेटिडा या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडूळाची लांबी 12 ते 15 सेंटीमीटर असते. एका किलोमध्ये सर्वसाधारण पूर्ण वाढ झालेली एक हजार गांडूळे बसतात. अशी एक हजार गांडूळे घेऊन त्यांची अनुकूल वातावरणात वाढ केल्यास एका वर्षात त्यांची संख्या आठ लक्ष त्र्याऐशी हजार होते. पिले व प्रौढ गांडूळे एका किलोमध्ये साधारणतः दोन हजार बसतात. शंभर किलो प्रौढ गांडूळे महिन्याला एक टन गांडूळ खत तयार करतात.

शुद्ध घ्या.. शुद्ध खा.. तेही माफक दरात.. अ‍ॅग्रोवर्ल्ड मार्फत जळगाव शहरात 8 जानेवारीला अस्सल व भेसळमुक्त प्रसिद्ध सांगलीची सेलम हळद पावडर उपलब्ध..

गांडूळ संवर्धन आणि खत निर्मिती :
1) जागेची निवड आणि बांधणी : गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमिन पाण्याचा निचरा होणारी असावी. तसेच खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत, कारण या झाडाची मुळे गांडूळ खतातील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळखत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्याने त्यासाठी छप्परचे छत तयार करून घ्यावे. ते तयार करताना रुंदी साडेपाच मीटर व उंची 3 मीटर आणि लांबी गरजेनुसार असावी. छप्परामध्ये 1 मीटररुंद व 20 सेंटीमीटर खोलीचे दोन समांतर चर खोदावेत.
2) गांडूळ खाद्य : चराच्या तळाशी साधारणतः 8 ते 9 सेंटीमीटर उंचीचा किंवा जाडीचा थर काडीकचरा, पालापाचोळा, वाळलेले गवत, उसाचे पाचट यांनी भरावा. त्यावर पाणी मारावे. या थरावर 8 ते 9 सेंटीमीटर जाडीचा दुसरा थर कुजलेले शेणखत, लेंडीखत, सेंद्रीयखत यांचा द्यावा. त्यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे. त्यानंतर या थरावर गांडूळे सोडावीत. यावर पुन्हा 5 ते 6 सेंटीमीटर जाडीचा थर कुजलेले सेंद्रिय खत, शेणखत यांचा थर द्यावा. या थरावर 20 ते 30 सेंटीमीटर उंचीपर्यंत शेणखत, लेंडीखत, सेंद्रीयखत टाकावे. यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे. हा गादीवाफा बारदानने (गोणपाट) झाकावा. दररोज या गादी वाफ्यावर पाणी शिंपडावे म्हणजे गादीवाफ्यात ओलसरपणा टिकून राहील आणि गांडूळाची चांगली वाढ होऊन गांडूळ खत तयार होईल.
या पद्धतीने 15 ते 20 दिवसात गांडूळखत तयार होते. शेणखतामध्ये गांडूळांची वाढ उत्तम होते. त्यांची संख्या जोमाने वाढून गांडूळखत देखील उत्तम प्रतीचे तयार होते. त्याचप्रमाणे लेंडीखत घोड्याची लिद यापासून सुद्धा गांडूळखत तयार होते. गांडुळासाठी लागणारे खाद्य कमीत कमी अर्धवट कुजलेले असावे. शेणखत आणि सेंद्रीयखत यांचे मिश्रण अर्धे अर्धे वापरून गांडूळखत करता येते. गांडूळामध्ये शेतातील ओला पालापाचोळा, भाजीपाल्याचे अवशेष, अर्धवट कुजलेल्या पिकांचे अवशेष, साखर कारखान्यातील प्रेसमड आदींचा वापर होऊ शकतो. मात्र, हे खाद्य गांडुळासाठी वापरताना त्यात काही प्रमाणात म्हणजे साधारणतः एक तृतीयांश इतके शेणखत मिसळणे आवश्यक आहे. गांडूळखत नेहमी बारीक करून टाकावे. बायोगॅस प्लॅन्टमधून निघालेली स्लरी देखील गांडूळखत म्हणून उपयोगात आणता येते. खड्ड्यामध्ये गांडूळे टाकण्याअगोदर गांडूळ खांद्यावर चार ते पाच दिवस पाणी मारावे म्हणजे त्यातील गरमपणा नष्ट होण्यास मदत होते. सूक्ष्म जिवाणूसंवर्धक (बॅक्टरीअल कल्चर) वापरून खत कुजविण्याचा प्रक्रियेस वापरावे. या प्रक्रियेसंदर्भातील आणखीन सविस्तर माहिती, संवर्धक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे-5 यांच्याकडे उपलब्ध होऊ शकेल. या व्यतिरिक्त गांडूळ खाद्यात एक किलो युरिया व एक किलो सुपर फॉस्फेट प्रती टन या प्रमाणात मिसळले असता कुजण्याची क्रिया लवकर होऊन गांडूळखत लवकर तयार होईल.
3) गांडूळखत वेगळे करणे : गांडूळखत आणि गांडूळे वेगळे करताना उन्हामध्ये ताडपत्री अथवा गोणपाट अंथरून त्यावर गांडूळखताचे ढिग करावेत. म्हणजे उन्हामुळे गांडूळे ढिगाच्या तळाशी जातील व गांडूळे आणि गांडूळखत वेगवेगळे करता येईल. शक्यतो खत वेगळे करताना टिकाव किंवा खुरपे यांचा वापर करू नये. या साहित्यांच्या वापरामुळे गांडूळांना इजा पोहचण्याची शक्यता असते. या व्यतिरिक्त दुसर्‍या पद्धतीप्रमाणे गादीवाफ्यावर तयार झालेला गांडूळ खताचा थर हलक्या हाताने वेगळा करून घ्यावा व वाफ्यावर पुन्हा नवीन खाद्य टाकावे. या गांडूळ खतामध्ये गांडुळांची अंडी, त्यांची विष्ठा आणि कुजलेले खत यांचे मिश्रण असते. हे गांडुळांचे खत शेतामध्ये वापरता येते. निरनिराळ्या पिकांसाठी हे खत हेक्टरी पाच टन प्रती वर्ष या प्रमाणात टाकावे.

 

गांडूळ खत वापरण्याची पद्धत व एकरी मात्रा :
1. जमिनीतील सेंद्रिय पदार्थाच्या प्रमाणावर गांडूळ खताची मात्रा अवलंबून असते.
2. जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 0.5 टक्केच्यावर असेल तर 2 टन गांडूळखत प्रती एकर प्रती वर्षी ही मात्रा योग्य आहे. मात्र, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण खूप कमी असेल तर इतर कंपोस्ट शेणखत किंवा हिरवळीचे खत व पेंडी यांची जोड देऊन गांडूळखत वापरावे.

– प्रा. मोनिका सुरेंद्र भावसार व प्रा. मयुरी अनुप देशमुख
मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव.

गांडूळ खताचे फायदे :
1. जमिनीचा पोत सुधारतो. 2. मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो. 3. गांडूळाच्या बिळांमुळे झाडांच्या मुळांना इजा न होता, त्यांची उत्तम मशागत केली जाते. 4. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. 5. जमिनीची धूप कमी होते. 6. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
7. जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो.
8. गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात. 9. गांडूळ खतामध्ये ह्यूमसचे प्रमाण भरपूर असल्यामुळे नत्र, स्फुरद,पालाश व इतर सूक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात. 10. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत भरमसाठ वाढ होते.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: Bacterial CultureBiogas PlantIsinia FoetidaWorm Farmingइसिनीया फेटिडाखतगांडूळ शेतीजमीनजिवाणूसंवर्धकबायोगॅस प्लॅन्ट
Previous Post

असे करा केळी बागेचे व्यवस्थापन.. विशेषतः थंडीत काय काळजी घ्याल..

Next Post

जमिनीच्या खरेदीसाठी १०० टक्के अनुदान… अर्ज मागवणे सुरु… योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

Next Post
जमिनीच्या खरेदीसाठी १०० टक्के अनुदान… अर्ज मागवणे सुरु… योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

जमिनीच्या खरेदीसाठी १०० टक्के अनुदान… अर्ज मागवणे सुरु… योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

AI

AI, ड्रोनचा शेतीत वापर काळाची गरज – अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2025
0

मका एकरी 75 क्विंटल उत्पादन

खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अ‍ॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.