पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 11वा हप्ता नुकताच जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या हप्त्याची शेतकरी अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. देशातील 10 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांसाठी 21 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत 31 मे 2022 रोजीच प्रत्येकी 2,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. पण जर तुमच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे पैसे जमा झालेले नसतील, तर याबाबत तुम्हाला केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे तक्रार करता येईल. कशी करावी तक्रार, नेमकी कशी असते ही संपूर्ण प्रक्रिया ते पाहूयात.
मेसेज आला; पण पैसे खात्यात आलेच नाहीत!
गेल्या काही दिवसांत अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या बॅंक खात्यात 2,000 रुपये जमा झाल्याचे मेसेज आले आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांना अजूनही हे पैसे मिळालेले नाहीत. हे शेतकरी संभ्रमात आहेत. तुमच्याही खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाले नसतील, तर याबाबत तक्रार केल्यावर तातडीने त्याचे निराकरण केले जाते. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आले नसतील किंवा त्यात काही तांत्रिक अडचण असेल, तर ती दुरुस्त केली जाते. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला योजनेचा लाभ देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
अशी करा रक्कम न मिळाल्याची तक्रार
मेसेज येऊनही तुमच्या खात्यात 2,000 रुपये आले नसल्यास, तुमच्या भागातील कृषी अधिकाऱ्यांना किंवा ट्रेझरीत तसे कळवा. त्यांनी जर तुमचे म्हणणे ऐकून घेतले नाही किंवा तुमची समस्या जाणून घेऊनही कार्यवाही केली नाही, तुमच्या खात्यात पैसे आले नाही, तर तुम्ही केंद्र सरकारच्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करू शकता.
नोंदणीकृत शेतकरी हेल्पलाईन
तुमचे नाव यादीत आहे, परंतु तुमच्या बँक खात्यात पैसे आलेले नाहीत, असे असल्यास तुम्ही हेल्पलाइन डेस्कची मदत घेऊ शकता. टोल फ्री क्रमांक 011-24300606 आणि हेल्पलाइन क्रमांक 155261 वर कॉल करण्याव्यतिरिक्त, तुम्ही [email protected] या ई-मेल आयडीवर ईमेल लिहूनही मदत मिळवू शकता.
आधार क्रमांक दुरुस्त करा
तुमचा आधार क्रमांक किंवा नाव चुकीचे असल्यास ते दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल. येथे जा आणि वरच्या कोपऱ्यावर क्लिक करा. त्यानंतर Aadhar Edit वर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा भरून तुम्ही तुमची संबंधित माहिती तपासू शकता. जर काही माहिती चुकीची असेल तर तुम्ही ती दुरुस्त देखील करू शकता.
बँक खात्याचे तपशील बरोबर नसतील तर…
तुम्ही ऑनलाइन बँक तपशील दुरुस्त करू शकत नाही. तुमच्या बँकेच्या तपशिलांमध्ये काही चूक असल्यास, तुम्हाला ती दुरुस्त करण्यासाठी कृषी विभाग किंवा लेखपालच्या कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. प्रत्यक्ष तिथे जाऊन तुम्ही ते दुरुस्त करू शकता.
कृषी मंत्रालय हेल्पलाइन क्रमांक
पीएम किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266
पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक : 155261
पीएम किसान लँडलाइन नंबर : 011 – 23381092, 23382401
पीएम किसानची नवीन हेल्पलाइन : 011-24300606
पीएम किसानची दुसरी हेल्पलाइन : 0120-6025109
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पीएम-किसान हेल्पडेस्क सोमवार ते शुक्रवार सुरू असते. शिवाय तुम्ही [email protected] या ई-मेलवरही तक्रार करु शकता.. त्यानंतरही काम न झाल्यास, 011-23381092 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करू शकता.
तुम्ही स्वतः या योजनेची स्थिती तपासून अर्ज करू शकता. या योजनेच्या शेतकरी कल्याण विभागात संपर्क साधून तक्रार करता येते.. त्याचा दिल्लीतील फोन नंबर 011-23382401 आहे, तर त्याचा ई-मेल आयडी [email protected] आहे