• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कलिंगड लागवडीतून घ्या भरघोस उत्पादन… जाणून घ्या लागवडीसह व काढणी व्यवस्थापन

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 24, 2022
in इतर
0
कलिंगड लागवडीतून घ्या भरघोस उत्पादन… जाणून घ्या लागवडीसह व काढणी व्यवस्थापन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे : महाराष्ट्रामध्ये कलिंगडाची लागवड अलीकडे बर्‍यापैकी वाढताना दिसत आहे. या फळामध्ये चुना, फॉस्फरस ही खनिजे तसेच अ, ब आणि क ही जीवनसत्वे काही प्रमाणात असतात. कमी कालावधी आणि उत्पादन खर्च कमी लागत असल्याने कलिंगडची लागवड करण्याकडे बहुतांश शेतकर्‍यांचा कल असतो.
कलिंगड पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येते. चुनखडीयुक्त खारवट, चोपण जमीन लागवडीस अयोग्य आहे. कारण अशा जमिनीत अतिप्रमाणात असणार्‍या सोडियम, कॅल्शियम, मॅग्रशियम सल्फेट, क्लोराईड, कार्बोनेट व बायकार्बोनेटसारख्या विद्राव्य क्षारांमुळे कलिंगडाच्या फळावर डाग पडण्याची शक्यता असते. लागवडीसाठी हलकी, पोयट्याची, मध्यम-काळ्या ते करड्या मरंगाची पाण्याचा निचरा असणारी जमीन लागवडीस योग्य आहे.

लागणारे हवामान
कलिंगडाला उष्ण, भरपूर सूर्यप्रकाश व कोरडे हवामान चांगले मानवते. कलिंगडाच्या उत्तम वाढीसाठी 22 ते 25 सेल्सिअस तापमान उपयुक्त असते. तसेच फळ धारणेसाठी आणि चांगल्या प्रतीच्या फळांसाठी 35 ते 40 सेल्सिअस तापमान उपयुक्त ठरते. वाढीच्या कालावधीत हवेमध्ये दमटपणा व धुके असल्यास वेलींची वाढ व्यवस्थित होत नाही. परिणामी, पीक रोगास बळी पडण्याची शक्यता असते. अलीकडे कडक उन्हाळ्याचा आणि भर पावसाळ्याचा काळ सोडला तर वर्षभर कलिंगडाची लागवड केली जाते.

 

25 फेब्रुवारीपर्यंत लागवड कालावधी
कलिंगडाची लागवड सर्वसाधारणपणे याच दिवसात करता येईल. 25 फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी लागवडीसाठी पोषक आहे. फळे ऐन उन्हाळ्यात एप्रिल-मे मध्ये बाजारात विक्रीसाठी तयार होतात. तसेच या फळांना चांगली मागणी असते. काही शेतकरी लागवड ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात करतात. ही फळे नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये तयार होतात. या फळांची गुणवत्ता चांगली नसली तरी या फळांना मात्र चांगला भाव मिळतो.

अशी करावी पूर्वमशागत
जमिनीची खोल नांगरणी करून प्रती एकरी चांगले कुजलेले 15 ते 20 टन शेणखत, कोंबडी खत किंवा लेंडी खत जमिनीत मिसळून द्यावे. त्यानंतर ट्रॅक्टर किंवा बैलांच्या साह्याने वखराच्या दोन पाळ्या घालाव्यात. रोटावेटरचा उपयोग केला तर खत जमिनीत चांगले मिसळते व जमीन सपाट होते. यानंतर गादीवाफे तयार करून घ्यावेत. गादीवाफ्याचा आकार दोन फूट रुंद व एक फूट ठेवावा. दोन गादीवाफे मध्ये सहा फूट अंतर ठेवावे. गादीवाफे तयार करत असताना शिफारशीनुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी.

लागवड आणि बियाण्यांचे प्रमाण
कलिंगड लागवडीसाठी एकरी 1 ते 1.5 किलो बियाणे पुरेसे असते. पण संकरित जातीचे हेक्टरी 300 ते 400 बी पुरेसे होते. कलिंगड पिकाची लागवडी ही बिया टोकून करतात. पेरणी पूर्वी प्रती किलो बियाण्यास तीन ग्रॅम या प्रमाणात थायरम या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. प्रत्येक खड्ड्यात 3 ते 4 बिया एकमेकापासून 4 ते 5 सेंटीमीटर अंतरावर व दोन ते दोन से.मी. खोलीवर टाकाव्यात. साधारणत: 5 ते 5 दिवसांनी बिया रुजतात. रुजवा झाल्यानंतर 15 दिवसांनी रोपांची विरळणी करून प्रत्येक ठिकाणी दोन चांगली जोमदार रोपे ठेवावीत. या पिकाची लागवड विविध पद्धतीने केली जाते. आळे पद्धतीने लागवड केल्यास, ठराविक अंतरावर आळे करून त्यात शेणखत मिसळून मध्यभागी चार ते पाच बिया टाकाव्यात. सरी-वरंबा पद्धतीत 2 मीटर अंतरावर सर्‍या पाडून व 0.5 मीटर अंतरावर अंतर वाफ्यावर बिया लावतात.
रुंद गादी वाफ्यावर लागवड करायची झाल्यास ती दोन्ही बाजूंना करतात. त्यामुळे वेल गादीवाफ्यावर पसरतो व फळे पाण्याच्या संपर्कात येऊन खराब होत नाहीत. यासाठी 3 ते 4 मीटर अंतरावर सरी पाडून सरीच्या दोन्ही बाजूंना 1 ते 1.5 मीटर अंतरावर तीन ते चार बिया लावाव्यात.

 

मल्चिंग पेपरचा वापर
सध्या शेतकरी लागवडीसाठी मल्चिंग पेपरचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. गादीवाफ्यावर मल्चिंग पेपर टाकण्याअगोदर गादीवाफा एकसमान करून मधोमध ठिबकची लॅटरल टाकून ठिबक सिंचन सुरू करून लॅटरल तपासून घ्याव्यात. गादीवाफ्यावर चार फूट रुंदीचा 50 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या मल्चिंग पेपर अंथरावा पेपर लावताना तो गादीवाफ्यावर समांतर राहील, ढिला पडणार नाही याची काळजी घ्यावी. एक एकरमध्ये साधारण पाच ते सहा किलो पेपर लागू शकतो. लागवडीच्या आदल्यादिवशी लॅटरलच्या दोन्ही बाजूस 15 सेंटीमीटर अंतरावर रोपे लावता येतील अशा अंतरावर छिद्रे पाडून घ्यावी. दोन रोपांमधील अंतर हे दोन फूट ठेवावे. त्यानंतर गादीवाफा ठिबक सिंचनाच्या साहाय्याने ओला करून घ्यावा. यानंतर छिद्रे पाडलेल्या ठिकाणी साधारणतः 12 दिवस वयाच्या रोपांची लागवड करून घ्यावी.

अन्नद्रव्य व खत व्यवस्थापन
माती परीक्षण अहवालानुसार खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा द्यावी. या पिकास हेक्टरी 150 किलो नत्र 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश तसेच 25 ते 30 टन शेणखत लागते. स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा नत्राची 1/3 मात्रा पेरणीच्या वेळेस द्यावी. उरलेली नत्राची मात्रा समप्रमाणात विभागून लागवडीनंतर एक महिन्याच्या अंतराने दोन वेळा द्यावी. फवारणीच्या खतांमध्ये लागवडीनंतर 10 ते 15 दिवसांनी 19:19:19, बोरॉन, 00:52:34, 13:00:45, कॅल्शियम नायट्रेट यासारखी खते तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या सल्ल्याने देता येतील.

पाणी व्यवस्थापन
कलिंगडास नियमित व भरपूर पाण्याचा पुरवठा करणे अत्यंत आवश्यक असते. सुरवातीच्या काळात पाण्याची गरज कमी असते. त्यामुळे पाच ते सहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पुढे पीक जसे वाढत जाते, तसतशी पिकाची पाण्याची गरजही वाढत जाते. म्हणून फळे लागण्याच्या कालावधीनंतर पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. जर या पिकाला अनियमित पाणी दिले तर फळे तडकण्याचा व त्याचा आकार बदलण्याचा संभव असतो. वेली वाफ्यावर फळे लागल्यानंतर फळांचा पाण्याशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. फळांचे सूर्यप्रकाशाच्या प्रखर किरणांपासून संरक्षण करण्यासाठी फळे गवताने किंवा भाताच्या पेंढयानी झाकून घ्यावीत.

फळांची काढणी आणि उत्पन्न
कलिंगडाच्या फळांची काढणी योग्य वेळी करणे आवश्यक असते. अपरिपक्व किंवा अतीपक्व फळे काढल्यास प्रतीवर व परिणामी बाजारभावावर परिणाम होतो. फळे सर्वसाधारणपणे जातीपरत्वे 90 ते 110 दिवसांनी काढण्यास तयार होतात. फळांची काढणी सकाळी करावी. त्यामुळे ताजेपणा व आकर्षकता टिकून राहतो. फळ काढणीला तयार झाले किंवा नाही हे ओळखण्यासाठी पुढील काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. जसे की फळांवर टिचकी मारल्यास तयार झालेल्या फळांचा बदबद आवाज येतो तर अपरिपक्व फळांचा ठणठण आवाज येतो. तयार फळांचा जमिनीलगतचा रंग किंचित पिवळसर होतो. तयार फळांचे देठाजवळील लतातंतू सुकलेले असतात. जातीपरत्वे कलिंगडाचे उत्पन्न 200 ते 400 क्विंटल प्रती हेक्टर येते.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: ManagementPre-CultivationWatermelonWeatherअन्नद्रव्यकाढणीखत व्यवस्थापनगादीवाफागुणवत्तापाणी व्यवस्थापनमल्चिंग पेपर
Previous Post

बांबूची जिल्ह्यात दहा हजार एकरावर लागवड झाल्यानंतर पहिली बांबू रिफायनरी जळगावात सुरु करणार.. कार्बन क्रेडिट म्हणूनही मिळणार हेक्टरी 5 हजार रुपये – खासदार उन्मेष पाटील… ॲग्रोवर्ल्डतर्फे जळगावला 23 जानेवारी (रविवारी) बांबू शेती कार्यशाळेचे आयोजन 🎋

Next Post

गहू पिकातील अन्नद्रव्याची कमतरता अशी भरुन काढा… जाणून घ्या लक्षणे व उपाययोजना

Next Post
गहू पिकातील अन्नद्रव्याची कमतरता अशी भरुन काढा… जाणून घ्या लक्षणे व उपाययोजना

गहू पिकातील अन्नद्रव्याची कमतरता अशी भरुन काढा... जाणून घ्या लक्षणे व उपाययोजना

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्हा कृषी

नंदुरबार जिल्हा कृषी क्षेत्रात देशपातळीवर अग्रगण्य ठरू शकतो – सीईओ नमन गोयल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 5, 2026
0

शहाद्यात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आज उदघाटन

शहाद्यात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आज उदघाटन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 2, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन, शहादा

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन, शहादा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 31, 2025
0

5000 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म

शून्यातून उभारला व्यवसाय; आज 5000 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 26, 2025
0

टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

अनुष्काचा टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 25, 2025
0

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 24, 2025
0

अव्होकॅडोची शेती

‘कोरडवाहू भागात अव्होकॅडोची शेती करून 10 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 23, 2025
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 20, 2025
0

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 19, 2025
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

नंदुरबार जिल्हा कृषी

नंदुरबार जिल्हा कृषी क्षेत्रात देशपातळीवर अग्रगण्य ठरू शकतो – सीईओ नमन गोयल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 5, 2026
0

शहाद्यात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आज उदघाटन

शहाद्यात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आज उदघाटन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 2, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन, शहादा

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन, शहादा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 31, 2025
0

5000 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म

शून्यातून उभारला व्यवसाय; आज 5000 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 26, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish