यंदाच्या ‘अॅग्रोवर्ल्ड फार्म’च्या दिवाळी अंकात शेतीतील प्राचीन ते अर्वाचीन बदलांचा (स्थित्यंतर) वेध कव्हर स्टोरीतून घेतला आहे. कृषी पराशर ते प्रिसिजन फार्मर या कृषी क्षेत्रातील बदलांचा आढावा यातून मांडला आहे.
राज्यात पावसामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले. ओला किंवा कोरडा दुष्काळ शेतकर्यांसाठी नवीन नाही. तो अशा संकटातून पुन्हा उभा राहतो आणि शेती कसतो. यंदाही शेतकरी खरिपाची कसर भरून काढण्यासाठी कंबर कसून रब्बीच्या तयारीला लागले आहेत. संंकटे येऊनही काही शेतकर्यांनी शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन संकटावर मात केली आहे. अशा काही शेतकर्यांच्या यशोगाथा यंदाच्या दिवाळी अंकात वाचल्यानंतर त्यापासून निश्चितच प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. शेतीत वापरले जाणारे ऑटोमेशन तंत्रज्ञान, स्व. भाऊसाहेब थोरातांच्या दूरदृष्टीकोनामुळे दंडकारण्य चळवळीच्या माध्यमातून संगमनेरची महाराष्ट्रातील अॅमेझॉन म्हणून होऊ लागलेली ओळख तसेच जरबेरा फुले, जिरेनियमची शेती तसेच गीर गायींच्या तुपापासून लाखोंचे उत्पन्न घेणार्या शेतकर्यांची माहितीही या अंकातून मिळेल. यासोबतच आशिया खंडातील सर्वांत स्वच्छ व सुंदर गाव असलेल्या मावलिंनोंग या गावाविषयीची रंजक माहिती या अंकात आहे. तब्बल 112 पानांचा हा अंक वाचून आपल्याला नक्कीच आनंद वाटेल, अशी आशा आहे…
अॅग्रोवर्ल्डच्या दिवाळी अंकाप्रमाणेच शासकीय योजना, नवीन जी. आर., यशोगाथा, तांत्रिक माहिती, जगभरातील कृषी विषयक घडामोडी नियमितपणे आपल्या whats app वर निःशुल्क उपलब्ध होण्यासाठी…..
अधिक माहिती / अंकासाठी संपर्क :- 9130091621 / 22 / 23 / 24 / 25