अमेरिकेने भारतावर लादलेल्या 50% टेरिफमुळे भारतीय कृषी, प्रक्रिया, आणि पूरक उद्योगांमध्ये निर्यात कमी होण्याचा धोका आहे. त्यामुळे या क्षेत्रांत भारताचा बाजार हिस्सा कमी होईल. मात्र, काही देश त्यामुळे फायदा घेऊ शकतात.
टेरिफमुळे फायदा होणारे मुख्य स्पर्धक देश:
1. पाकिस्तान – विशेषतः बासमती तांदळ निर्यातीत. अमेरिकेत टेरिफ कमी असल्याने भारताच्या जागी बासमती बाजारपेठ पटकन व्यापतील.
2. थायलंड आणि व्हिएतनाम – नॉन-बासमती तांदूळ आणि मसाले मध्ये.
3. कॅनडा – उडीद/तूर (पल्सेस) च्या जागी संधी.
4. केनिया आणि श्रीलंका – चहा निर्यातीत.
5. ग्वाटेमाला, मेक्सिको, नायजेरिया – तीळ (सिसेम) उद्योगात.
कमोडिटीनिहाय परिणाम एका दृष्टिक्षेपात:
– बासमती तांदूळ: अमेरिकन बाजारात भारतीयस्पर्धात्मकता कमी होऊन पाकिस्तानला फायदा मिळेल.
– मसाले: व्हिएतनामसारख्या देशांना अमेरिका मार्केटमध्ये वाढीचा लाभ मिळेल.
– सागरी उत्पादने (Shrimp इ.): अमेरिकेत महागड्या टेरिफमुळे भारताचा व्यापार कमी होईल; जपान, युरोप, मध्यपूर्व देशांमध्ये भारतीय निर्यात वाढू शकेल.
– डेअरी उत्पादने: अमेरिकेत वाढीव टेरिफमुळे भारतीय निर्यात कमी, कॅनडाला त्याचा मोठा फायदा होईल.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

















