हातेडच्या तरुण शेतकऱ्यांनी गाठला नवा उच्चांक
गव्हाचे एकरी १५ ते १७ क्विंटल उत्पादन खानदेशात चमत्कार मानला जातो. चोपडा तालुक्यातील हातेड परिसरातील काही तरुण शेतकरी त्याला अपवाद ठरले आहेत. याशेतकऱ्यांनीएकरी २१ ते २५ क्विंटल उत्पादन काढून गहू उत्पादनात नवा उच्चांक गाठलाआहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला चोपडा तालुक्यातील हातेड-गलवाडे शिवारातील जमीन सुपीक व जलसाठ्याने समृद्ध आहे. हतनूर व अनेर कालव्यामुळे किमान आठमाही बागायतीचीशाश्वती येथील शेतकऱ्याला आहे.त्यामुळे उस, कापूस,मक्यासोबत गहू हे याभागातील हमीचे पिक. तीन-साडेतीन महिन्यात तयार होणारे व ४ ते ५ पाण्याच्या पाळ्यात येणारे पिक घेण्याकडे या शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
गव्हाचे उच्चांकी उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्यात गलवाडे येथील सचिन ज्ञानेश्वर बोरसे हे एक. आपल्या १३ एकर शेतीत ते कापूस, मका,कांदा अशी पिके घेतात.जमीन काळी कसदार असून बोअरवेलला भरपूर पाणी आहे.सिंचनाची खात्रीची सोय असल्याने दरवर्षी खरीप हंगाम घेतल्यावर ते त्याच शेतात गव्हाची पेरणी करतात. यंदाखरीपातील मक्यावर त्यांनी गहू पेरला. त्यासाठी ट्रेक्टरने पेरणीपूर्व मशागत करण्यात आली.
कमी खर्चात, कमी कालावधीत आले उत्पादन:
थंडी पडू लागल्यानंतर २० नोव्हेंबर रोजी ट्रेक्टरच्या सहायानेच पेरणी करण्यात आली. यावर्षी साडे तीनएकर क्षेत्रात गव्हाची पेरणी केली त्यासाठी “अजित१०८” हेवाण निवडण्यात आले. पेरणीसाठीसुमारे १ क्विंटल २० किलो बियाणे लागले. पेरणी करतांनाच सोबत १०-२६-२६ खताच्या ५० किलोच्या ३ बैगा देण्यात आल्या. पेरणी ओलवणी न करताच केली असल्याने लगेच पाणी देण्यात आले. त्यानंतरदुसऱ्या पाण्याची पाळी देण्यापूर्वी एकरी ४० किलो या प्रमाणे ५० किलोच्या ३ बैगा युरिया साडे तीन एकराला देण्यात आल्या. पाण्याच्या पाळ्या देण्यात बोरसे यांनी नियमितता ठेवली. दर १३-१४ दिवसातून पाण्याची पाळी देण्यात आली. यावर्षी थंडीचे प्रमाण चांगले होते व थंडीचा कालावधी देखील अधिक काळ टिकल्यानेगव्हासाठी पोषक हवामान राहिले.फक्त ९७ दिवसात पिक काढणीस तयार झाले.गुणवत्तापूर्ण वाण, वेळेवर पाण्याच्या पाळ्या व योग्य व्यवस्थापनामुळे बोरसे यांना एकरी २१ क्विंटल उत्पादन आले.
अजित सीड्सचे मार्गदर्शन: दरवर्षी लोकवन हेच वाण पेरणाऱ्या बोरसे यांनी यावर्षी अजित सीड्सचे अजित १०८ हे वाण पेरले. कंपनीचे विक्रांत पाटील यांनी त्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले. या वाणाच्या एका दाण्यापासून सरासरी२० ते २५ फुटवे येतात. गव्हाच्या काडीची उंची तीन ते साडेतीन फूट तर ओम्बी १६ ते १७ सेमी लांब असते. एका ओम्बीत सरासरी ७५ ते ८५ दाणे भरतात.पिक सुकल्यानंतर दाण्यांची गळ होत नाही. हा गहू पोळ्यांसाठी पसंद केला जातो.चंदोसी किंवा १४७ या जातीचे गुणधर्म असल्याने घरगुती वापरासाठी या गव्हाला भरपूर मागणी आहे.
विविध रोग प्रतिकारक्षम वाण:
यावर्षी एकट्या चोपड्या तालुक्यात सुमारे २०० एकरावर अजित १०८ या वाणाची पेरणी झाली आहे.हे वाण भरपूर उत्पादन देणारे तर आहेच शिवाय तांबेरा व खोडकीडीस प्रतिकारक आहे. त्यामुळेच गलवाडेचे सचिन बोरसे यांना कोणत्याही प्रकारची कीटकनाशकाची फवारणी करावी लागली नाही. खताच्या मात्रे व्यतिरिक्त एकदा त्यांनी झिन्कची फवारणी केली. एकरीउत्पादनात दीडपट वाढ झाल्याने हातेड परिसरातील गहू उत्पादक खुश आहेत.
प्रतिक्रिया १:
नेहमीच्या लोकवन या व्हरायटीपेक्षा अजित १०८ बियाण्यामुळे उत्पादन वाढून आलय. कमी कालावधीत (९५ते९७ दिवस) उत्पादन आले आहे. गव्हाचा रंग चमकदार असून खाण्यासाठी स्वादिष्ट असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. आपल्याकडील वातावरणास पोषक हे वाण असल्याने उत्पादन भरघोस आले.
- सचिन ज्ञानेश्वर बोरसे, गलवाडे, ता. चोपडा.
- मो.९५०३८२३०३७
प्रतिक्रिया २:
हे वाण १००% दर्जेदार असून मला अडीच एकरात ४५ क्विंटल उत्पादन आले आहे. मी ग्रेडिंग करून२१०० रुपये क्विंटल या दराने स्वत:च गव्हाची विक्री केली. कामे उत्पादन देणाऱ्या पारंपारिक वाणाला चिटकून न बसता शेतकऱ्यांनी अशाप्रकारच्या सुधारीत बियाण्याकडे वळून अधिकाधिक उत्पादन घ्यावे.
-योगेश शालीग्राम सोनवणे, हातेडता.चोपडा
मो. ८३२९४४५९०७
प्रतिक्रिया ३:
गव्हाचे सरासरी उत्पादन वाढविण्यासाठी हे वाण योग्य आहे. हलक्या व भारी अशा दोन्ही जमिनीत हे वाण चांगले येते हा माझा अनुभव आहे. इतर वाणांपेक्षा लांबलचक ओंब अधिक उत्पादनाची निदर्शक आहे. पाण्याचे योग्य नियोजन केल्यास एकरी उत्पादनात वाढ होते.
-किशोर वसंत बोरसे, गलवाडे ता.चोपडा.
-मो. ९८४९३४२७११
- स्टोरी औटलूक:
- रब्बीत इतर पिकांपेक्षा गव्हाला अधिक पसंती.
- नव्या वाणाच्या वापरातून काढले पारंपारिक वाणापेक्षा अधिक उत्पादन.
- अजित १०८ रोग प्रतिकारक्षम व लांब ओम्बीचे वाण.