Home बाजार भाव 20 हजार टन कांदा निर्यातीस परवानगी दिल्यानंतर कांद्याला काय भाव मिळाला ?

20 हजार टन कांदा निर्यातीस परवानगी दिल्यानंतर कांद्याला काय भाव मिळाला ?

पुणे : केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यात कांदा निर्यात बंदी केली होती. यामुळे कांदा बाजार भावात घसरण झाली आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कांद्यावरील निर्यात बंदी उठेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, 31 मार्च नंतर देखील कांदा निर्यात बंदी जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत कायम राहणार असा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी युएई आणि बांगलादेशला 20 हजार टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला. कांदा निर्यातीला परवानगी दिल्यानंतर बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय भाव मिळत आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

 

महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समिती त कांद्याला जास्तीत जास्त दर हा 1500 रुपये प्रतिक्विंटल मिळाला असून 26 क्विंटल कांद्याची आवक झाली. तसेच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याला जास्तीत जास्त दर हा 1550 रुपये प्रतिक्विंटल मिळाला तर सर्वसाधारण दर हा 1300 रुपये प्रतिक्विंटल मिळाला.

दरम्यान दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिंडोरी व वनी येथील कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू झाले असून येथे कांद्याला 1300 ते 1700 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कांदा (19/04/2024)

पुणे -पिंपरी क्विंटल 26 1100
कांदा (18/04/2024)
कोल्हापूर क्विंटल 3450 1200
जालना क्विंटल 615 1000
अकोला क्विंटल 1145 1300
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 2737 850
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 6382 1250
खेड-चाकण क्विंटल 125 1300
सातारा क्विंटल 445 1250
जुन्नर – नारायणगाव क्विंटल 15 1000
कराड क्विंटल 150 1200
सोलापूर क्विंटल 19767 1100
धुळे क्विंटल 865 1200
जळगाव क्विंटल 1528 977
नागपूर क्विंटल 2860 1450
साक्री क्विंटल 6000 1200
भुसावळ क्विंटल 40 1300
हिंगणा क्विंटल 4 2000
सांगली -फळे भाजीपाला क्विंटल 3102 1025
पुणे क्विंटल 12316 1000
पुणे -पिंपरी क्विंटल 31 1250
पुणे-मोशी क्विंटल 685 800
चाळीसगाव-नागदरोड क्विंटल 3200 1200
मलकापूर क्विंटल 635 1105
जामखेड क्विंटल 785 850
इस्लामपूर क्विंटल 50 1350
मंगळवेढा क्विंटल 19 1120
कल्याण क्विंटल 3 1400
नागपूर क्विंटल 2000 1500
अहमदनगर क्विंटल 34979 1100
नाशिक क्विंटल 2147 1300
लासलगाव क्विंटल 4276 1300
लासलगाव – निफाड क्विंटल 1350 1340
लासलगाव – विंचूर क्विंटल 17300 1400
राहूरी -वांबोरी क्विंटल 1533 1000
संगमनेर क्विंटल 11082 850
मंचर क्विंटल 8472 1425
कोपरगाव क्विंटल 10160 1275
कोपरगाव क्विंटल 6180 1340
पिंपळगाव(ब) – सायखेडा क्विंटल 1169 1300
गंगापूर क्विंटल 248 830
रामटेक क्विंटल 24 1500
नामपूर क्विंटल 15246 1300
नामपूर- करंजाड क्विंटल 13248 1300

 

Panchaganga Seeds

 

 

पीएम किसानचा 17 वा हप्ता कधी येणार ? या व्हिडिओमध्ये पहा संपूर्ण माहिती

 

Ajeet Seeds

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇