मुंबई – कमी दाब प्रणाली गुजरातकडे सरकल्याने आता राज्यात पावसाचा ओसरणार आहे. आज, 30 सप्टेंबर रोजी, सकाळच्या उपग्रह निरीक्षणानुसार महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यांमध्ये ढगाळ आकाशासह हवामान जवळजवळ स्वच्छ आहे. त्यामुळे राज्यात कोकण किनारपट्टी, पुणे-कोल्हापूरचा तुरळक अपवाद वगळता आज फारशा पावसाची शक्यता नाही. देशभरात गुजरातमध्येच पावसाचे धुमशान आज राहू शकते, विशेषत: सौराष्ट्र आणि कच्छ भागात, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने IMD व्यक्त केला आहे.

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी), पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याचे संकेत दिले आहेत. 1 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबरलाही कोकणातील काही पट्टा सोडता इतर भागात पावसाचा जोर ओसरणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या दोन्ही दिवसात मुंबई, ठाणे आणि उपनगरात आकाश निरभ्र राहील, असा अंदाज आहे. दसऱ्याच्या दिवशी नागपूरसह विदर्भातील काही भागात मात्र यलो अलर्टसह पावसाचा अंदाज “आयएमडी”ने जाहीर केला आहे.
राज्यातील पुढील दोन दिवसात पाऊस परतीच्या मार्गावर असल्याची शक्यता हवामान तज्ञ व्यक्त करत असले तरी आयएमडीने तसे अजून सूचित केलेले नाही. दरम्यान, हवामान विभागाकडून पूर्वानुमानित अलर्ट असले तरी अपडेट्सनुसार आज, 30 सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे आणि मुंबई उपनगराला कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

अलर्ट आजचे
“आयएमडी”ने आज सकाळी 11 वाजता जारी केलेल्या अपडेट्सनुसार महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे.
ऑरेंज अलर्ट
गुजरात: सौराष्ट्र-कच्छ- द्वारका, ओखा.
राजस्थान: नागौर, सिकर, चुरू
उत्तर प्रदेश: श्रावस्ती, बहारीच, बलरामपूर कर्नलगंज मिल्कीपूर, माणकपूर, तरबगंज, गोंडा.
पूर्वानिमानित यलो अलर्ट: कोकण किनारपट्टीसह कोल्हापूर-पुणे, पालघर, ठाणे, मुंबई शहर व उपनगर.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇
- आजपासून तीन दिवस पुन्हा मुसळधार; राज्यात 5 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा मुक्काम! “या” जिल्ह्यांना यलो व ऑरेंज अलर्टही.. जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची स्थिती
- मान्सून जायचे नाव घेईना, राजस्थानात परतीनंतरही दणका; महाराष्ट्रालाही आज तडाखा, जाणून घ्या जिल्हानिहाय यलो,ऑरेंज व रेड अलर्ट…