फळांना नैसर्गिक वैद्य म्हणून ओळखले जाते. कारण फळे ही आरोग्यासाठी उपयोगी असतात. अनेक गावांची ओळख ही फळांवरून ठरते. जसे की जळगावची केळी, नागपूरची संत्री आणि नाशिकची द्राक्षे. फळांची किंमत ही त्यांच्या गुणधर्मांवरून आणि मागणीवरून ठरत असते. जगात अशीही काही फळे आहेत ज्यांची किंमत ही लाखो रुपये इतकी आहे. तर अशीच पाच सर्वात महाग फळे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
गार्डन अननस
नवाप्रमाणे ही अननसाची एक प्रजाती आहे. लंडन मधील हेलिगन लास्ट गार्डन मध्ये याची लागवड केली जाते. ग्रीनहाऊस मध्ये पिकवल्या जाणाऱ्या या अननसाची किंमत सुमारे 1.14 लाख रुपये इतकी आहे.
तमागो आंबे
ही आंब्याची प्रजाती असून याचे पीक जपान मध्ये घेतले जाते. हे फळ खूप महाग असल्या कारणाने या आंब्याची लागवड ऑर्डर प्रमाणे केली जाते. काही अहवालानुसार हा आंबा सुमारे 2.14 लाख रुपयांना विकला जातो.
डेन्सुक टरबूज
ही टरबुजाची प्रजाती अतिशय खास प्रकारची आहे. काळ्या रंगाचे हे टरबूज सुमारे 11 किलोचे असते. जपानच्या ईशान्य आइसलँड मध्ये या टरबुजाची लागवड केली जाते. सन 2008 मध्ये झालेल्या लिलावात 6100 डॉलर मध्ये हा टरबूज विकला गेला. भारतीय चलनात याची किंमत 5 लाख 9 हजार रुपये इतकी आहे.
ही आहेत जगातील सर्वात महाग फळे
रुबी रोमन द्राक्ष
सर्वसाधारण द्राक्षांच्या तुलनेत या द्राक्षांचा आकार हा खूप मोठा असतो. या द्राक्षांची लागवड जपानच्या इशिकावा प्रांतामध्ये सुरू केली गेली. 2008 मध्ये प्रथमच ही द्राक्ष पिकवण्यात आली. एका अहवालानुसार एक घड द्राक्षांची किंमत सुमारे 65 हजार रुपये इतकी आहे. 2016 मध्ये झालेल्या लिलावात ही द्राक्षे 8.144 लाख रुपयांना विकली गेली.
युबरी खरबूज
खरबुजाची ही विशिष्ट प्रजाती जगातील कोणत्याही फळांच्या तुलनेत सर्वात महाग आहे. जपानमध्ये जेव्हा एखाद्याला खूप महागडे गिफ्ट द्यायचे असते तेव्हा हे खरबूज एकमेकांना दिले जाते. 2014 मध्ये झालेल्या लिलावात युबारी मेलन या जोडप्याने सुमारे 16.64 लाख रुपयांना हे खरबूज विकत घेतले.