पुणे : कांद्याला सर्वाधिक दर हा कोणत्या बाजार समितीत मिळाला ? कांद्याची सर्वाधिक आवक कुठे झाली ? हे आज आपण जाणून घेणार आहोत. केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लागू केला. याचा शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. निर्यातशुल्क मागे घ्यावे यासाठी नाशिक जिल्हयातील कांदा व्यापाऱ्यांनी १३ दिवस बाजार समित्यांमधील लिलाव बंद ठेवले होते. यामुळे कांदा लिलावासाठी नेता आला नाही. आणि कांदा खराब झाला. मात्र, आता कांद्याला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांना आहे.
कांद्याला आज पुणे- पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समितीत जास्तीत जास्त दर हा ३ हजार २०० रुपये मिळाला तर सर्वसाधारण दर हा २ हजार ६०० रुपये मिळाला असून कांद्याची ११ क्विंटल इतकी आवक झाली. तसेच सोलापूर बाजार समितीत गेल्या दोन दिवसांपासून कांदा आवकेत वाढ झाली आहे. त्यामुळे येथील कांदा दर १०० रुपयांनी कमी झाले आहेत. दरम्यान, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढताना दिसून येत आहे.
चार शेतमजुरांचे काम आता एकचजण करणार… इलेक्ट्रिक बुल। Electric bull।
सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)
शेतमाल |
परिणाम |
आवक |
सर्वसाधारण दर |
कांदा (21 /10/2023) |
|||
पुणे -पिंपरी | क्विंटल | 11 | 2600 |
कांदा (20/10/2023) | |||
सोलापूर | क्विंटल | 17014 | 1900 |
धुळे | क्विंटल | 237 | 2600 |
जळगाव | क्विंटल | 459 | 1975 |
साक्री | क्विंटल | 680 | 2800 |
येवला | क्विंटल | 5000 | 3000 |
येवला -आंदरसूल | क्विंटल | 2500 | 3000 |
लासलगाव | क्विंटल | 8106 | 3100 |
लासलगाव – निफाड | क्विंटल | 1750 | 3200 |
लासलगाव – विंचूर | क्विंटल | 8196 | 3100 |
मालेगाव-मुंगसे | क्विंटल | 11000 | 3150 |
सिन्नर | क्विंटल | 1140 | 3200 |
सिन्नर – नायगाव | क्विंटल | 168 | 3250 |
सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- फळांची मागणी वाढल्याने दरात वाढ
- राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता