• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशीचे फरदड घेणे टाळावे- कृषी आयुक्त डॉ.सुहास दिवसे

Team Agroworld by Team Agroworld
December 28, 2019
in तांत्रिक
0
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशीचे फरदड घेणे टाळावे- कृषी आयुक्त डॉ.सुहास दिवसे
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

    कपाशीच्या जागी रब्बीतील कमी कालावधीची पिके घेण्याचा सल्ला.

.
डॉ. सुहास दिवसे (कृषी आयुक्त, महाराष्ट्र शासन, पुणे)

पुणे (प्रतिनिधी) –  
राज्यात सुमारे ४४ लाख हेक्टरहून अधिक कापूस या प्रमुख पिकाची लागवड होते. जागतिक तापमानवाढीच्या परिणामामुळे कापसावरील किडीसुद्धा प्रबळ झाल्या आहेत. आपण त्यांचे वेगवेगळ्या प्रकारे नियंत्रण करीत आहोत.  त्यात सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे या किडींचे जीवनचक्र नष्ट करणे. त्यासाठी शेतकऱ्यांनी कपाशी पिकाचे फरदड (दुबार) घेणे टाळावे आणि त्याठिकाणी रब्बीतील कमी कालावधीची पिके घ्यावी. जेणेकरून पीक बदल झाल्याने पुढील हंगामात किडींचे संक्रमण थांबेल, असे आवाहनवजा सल्ला राज्याचे कृषी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी ॲग्रोवर्ल्डशी बोलतांना राज्यातील शेतकऱ्यांना दिला.      


     खरीप हंगामाच्या शेवटी झालेल्या पावसामुळे राज्यात यंदाचा खरीप हंगाम हा जोरदार असणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. या रब्बी हंगामात  रब्बीखालील सरासरी क्षेत्र ५६.९३ लाख हेक्टर असून १३ डिसेंबर २०१९ अखेर ३४.४९ लाख हेक्टरवर (६०.५९%) पेरणी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यात बऱ्यापैकी वाढ होतांना दिसत आहे. काही ठिकाणी अजून पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वात जास्त हरबरा व मका लागवड झालेली आहे. खरीप हंगामाच्या शेवटी झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी या पिकांसह इतरही पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी शेतकऱ्यांच्या तोंडातील घास निसर्गाने हिरावला होता. मात्र या अतिरिक्त पावसाचा फायदा हा रब्बी हंगामात होत आहे. हरभरा पेरणीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल आहे. तर त्याखालोखाल ज्वारी, गहू, करडई, मका आदी पिकांचा समावेश आहे. खरिपाची पेरणी उशिरा झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची खरिपातील तूर ही शेतात डोलत आहे. त्यामुळे तुरीकडूनही शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.

,

गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी:

.


     रब्बीत मुख्यत्वे करून घाटे अळी, गुलाबी बोंड घाटे अळी आणि लष्करी अळी यांचा प्रादुर्भाव असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी निरीक्षण करून या किडींचा बंदोबस्त करावा. यातील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव हा पुढील हंगामापर्यंत असतो. त्यामुळे कापूस पिकाचे फरदड घेणे कटाक्षाने टाळावे. शेतामध्ये शेळ्या-मेंढ्या तसेच इतर जनावरे चरण्यासाठी सोडावी. कपाशी पिकाचे राहिलेले अवशेष बांधावर जमा करून ठेऊ नये, जमिनीची खोल नांगरट करावी, पीक काढणीनंतर व्यवस्थित न उघडलेली किडग्रस्त बोंडे व इतर पालापाचोळा नष्ट करावा. ज्यामुळे या अळीचा जीवनक्रम संपुष्टात येऊन पुढील हंगामात याचा जास्त प्रादुर्भाव होणार नाही. परिणामी या किडींच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांनी जागरूक राहून वेळीच बंदोबस्त करावा व नुकसान टाळावे, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी यावेळी केले. कपाशीच्या खाली झालेल्या शेतात कमी कालावधीची रब्बीची पिके घ्यावीत जेणेकरून पिकबदलही होईल, जमिनीत असलेली ओल तसेच उपलब्ध पाण्यामुळे उत्पादनही मिळेल व गुलाबी बोंडअळीच्या जीवनचक्राची साखळी देखील उध्वस्त करता येईल अशी अशा देखील डॉ. दिवसे यांनी व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रब्बीत पिकबदल करावा.- डॉ सुहास दिवसे
Previous Post

MAIDC ला ५५ वर्षाची कृषी सेवेची परंपरा- महेंद्र बोरसे

Next Post

तूर पिकातील किडींचे नियंत्रण

Next Post
तूर पिकातील किडींचे नियंत्रण

तूर पिकातील किडींचे नियंत्रण

ताज्या बातम्या

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

कृषी उडान

“कृषी उडान”च्या लाभासाठी असा करा अर्ज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

कृषी उडान

जळगाव, नाशिकसह 6 विमानतळांवरून “कृषी उडान” स्वस्तात पाठवा कृषीमाल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.