बाजार भाव

कापसाला मिळाला 9800 रुपये प्रतिक्विंटल दर ; लगेचच वाचा बाजारभाव

पुणे : कापसाला चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने अजूनही शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठवून ठेवलेला आहे. मात्र, सध्याचे कापूस बाजारभाव बघता कापसाच्या दरात अजूनही वाढ झालेली नाही. दरम्यान, इतर बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव हे 6,800 ते 7,000 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असून पारशिवनी कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला सर्वाधिक दर मिळाला आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचे कापूस बाजारभाव..

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कापसाला अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वसाधारण दर हा 7,065 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर जास्तीत जास्त दर हा 7,130 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच कापसाची सर्वाधिक आवक ही हिंगणघाट कृषी बाजार समितीत झाली असून येथे 10,000 क्विंटल कापसाची आवक झाली. तसेच अकोला (बोरगावमंजू) कृषी बाजार समितीत कापसाला 6,975 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

शहादा येथे 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन | Agroworld Expo 2024 |

या बाजार समितीत मिळाला 9,800 रुपये प्रतिक्विंटल दर

कापसाला सर्वाधिक दर हा पारशिवनी कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला. येथे कापसाला जास्तीत जास्त दर हा 10,000 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सर्वसाधारण दर हा 9,800 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तसेच येथे कापसाची आवक ही 31 क्विंटल इतकी झाली.

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (5/2/2024)

भद्रावती क्विंटल 578 6550
समुद्रपूर क्विंटल 2625 6700
पारशिवनी क्विंटल 31 9800
अकोला क्विंटल 71 7065
अकोला (बोरगावमंजू) क्विंटल 141 6975
उमरेड क्विंटल 727 6450
देउळगाव राजा क्विंटल 5850 6600
वरोरा क्विंटल 3060 6500
वरोरा-खांबाडा क्विंटल 1742 6500
काटोल क्विंटल 319 6600
हिंगणा क्विंटल 50 6725
हिंगणघाट क्विंटल 10000 6400
वर्धा क्विंटल 2375 6750
पुलगाव क्विंटल 8700 6750
सिंदी(सेलू) क्विंटल 2110 6850

 

Planto Krushitantra

 

Wasan Toyota

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

 

Related Articles

Back to top button