• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

सांगलीत ब्लू जावा केळीचा यशस्वी प्रयोग; 100 रुपये किलोने विक्री

राईस एन शाईन बायोटेककडून रोपांची खरेदी

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 16, 2025
in तंत्रज्ञान / हायटेक
0
सांगलीत ब्लू जावा केळीचा यशस्वी प्रयोग
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांनी एकत्र येत केलेला अभिनव प्रयोग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सांगली येथील कृष्णा ब्लूम शेतकरी ग्रुपमधील शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी राईस एन शाईन बायोटेक प्रा. लि. या कंपनीकडून ब्लू जावा या विदेशी केळीच्या वाणाची 100 एकर क्षेत्रावर लागवड केली आहे. सध्या या केळीची यशस्वी हार्वेस्टिंग सुरू असून पनेट पॅकिंगद्वारे 500 ग्रॅम केळी 50 रुपये दराने विक्री केली जात आहे.

भारतात सर्वात दुर्मिळ आणि परदेशी केळी वाण म्हणून ओळखली जाणारी ब्लू जावा केळी आता देशांतर्गत पातळीवर यशस्वीरीत्या पिकवली जात आहे. या केळीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तिची नैसर्गिक निळसर छटा असलेली साल, तसेच आइसक्रीमसारखी मऊ आणि गोड चव. संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन करण्यात आलेली ही केळी साध्या पारंपरिक केळ्यांच्या तुलनेत अधिक पोषक घटकांनी समृद्ध आहे.

 

 

राईस एन शाईनकडून ब्लू जावा केळीच्या रोपांची खरेदी
कृष्णा ब्लूम शेतकरी ग्रुपमध्ये शंभरहून अधिक शेतकऱ्यांचा समावेश असून, या ग्रुपने एकत्र येत ब्लू जावा या विदेशी केळीच्या रोपांची 100 एकर क्षेत्रावर लागवड केली आहे. या लागवडीसाठी ब्लू जावा केळीचे रोपे राईस एन शाईन बायोटेक प्रा. लि. या कंपनीकडून घेण्यात आले आहे. सध्या या केळीची हार्वेस्टिंग सुरू असून, नुकत्याच पार पडलेल्या एका कृषी प्रदर्शनात ब्लू जावा केळीला 100 रुपये प्रति किलो असा दर मिळाला आहे, अशी माहिती शेतकरी रामचंद्र विठ्ठल पवार यांनी ॲग्रोवर्ल्डशी बोलताना दिली. कृष्णा नदीच्या सुपीक पट्ट्यात पहिल्यांदाच 100 एकरांवर ब्लू जावा केळीची लागवड करण्यात आली असून, या संपूर्ण प्रकल्पासाठी राईस एन शाईन बायोटेक प्रा. लि. यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले आहे.

 

 

आज ब्लू जावा केळी सांगलीच्या बाजारात नव्या स्वादाची आणि वेगळ्या ओळखीची छाप उमटवत आहेत. देशभरातील ग्राहक, फळप्रक्रिया उद्योग तसेच प्रीमियम मार्केट्सकडून या केळ्यांना उत्स्फूर्त आणि उत्कृष्ट प्रतिसाद मिळू लागला आहे. तज्ज्ञांच्या मते, “सांगली जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या ब्लू जावा केळीमुळे शेतकऱ्यांना थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडले जाण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.” हे यश केवळ एका पिकाचे नसून, सांगलीतील प्रगतशील शेतकऱ्यांच्या अथक मेहनत, नवकल्पनांचा स्वीकार आणि आधुनिक शेती व्यवस्थापनाच्या प्रभावी अंमलबजावणीचे प्रतीक आहे.

 

 

नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही दिली भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ब्लू जावा केळीला भेट देत या अनोख्या केळी वाणाविषयी सविस्तर माहिती घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी “ही कोणती व्हरायटी आहे? कोणत्या देशातून आणली आहे? रोपे कुठे तयार करण्यात आली आहेत आणि या केळीचे खास वैशिष्ट्य काय आहे?” असे प्रश्न विचारले. यावर माहिती देताना शेतकऱ्यांनी सांगितले की, ब्लू जावा ही इंडोनेशियामधील केळीची व्हरायटी असून ती भारतामध्ये यशस्वीरीत्या पिकवण्यात आली आहे. या केळीची रोपे पुणे येथील थेऊर परिसरातील राईस अँड शाईन बायोटेक कंपनीकडून तयार करण्यात आली असून, सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कोठे मंगळ परिसरात 100 एकर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.

 

 

विशेष म्हणजे ब्लू जावा केळी खाल्ल्यानंतर तिची साल फेकून दिली असता ती साधारण दोन तासांनंतर उन्हात पुन्हा निळसर रंग धारण करते, तर सामान्य केळीची साल फक्त सुकून जाते. हेच या केळीचे वेगळेपण ठरते.

ब्लू जावा फार्मर ग्रुप – Krishna Bloom FPO
संपर्क : रामचंद्र विठ्ठल पवार
मोबाइल: 7440407777
पत्ता: आट. मणेरी (Manerajuri), ता. तासगाव, जि. सांगली – 416408, महाराष्ट्र

 

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 

  • राज्यात नवा पणन कायदा: शेतकऱ्यांसाठी वरदान की कॉर्पोरेट कंपन्यांसाठी पायघड्या?
  • नागपूर हिवाळी अधिवेशन : ₹75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या; शेतकऱ्यांच्या पदरात काय?

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Previous Post

राज्यात नवा पणन कायदा: शेतकऱ्यांसाठी वरदान की कॉर्पोरेट कंपन्यांसाठी पायघड्या?

Next Post

कॉफीची लागवड करून शेतकऱ्याची 30 लाखांची कमाई!

Next Post
कॉफीची लागवड

कॉफीची लागवड करून शेतकऱ्याची 30 लाखांची कमाई!

ताज्या बातम्या

कच्च्या तेलाचे भडकलेले दर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरणार सुवर्णसंधी

कच्च्या तेलाचे भडकलेले दर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरणार सुवर्णसंधी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 23, 2026
0

भारतीय शेतकऱ्यांना फटका

इराणी गॅस फील्डवर हल्ल्याचा भारतीय शेतकऱ्यांना फटका; खत संकट दारावर?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 23, 2026
0

अवकाळी पाऊस

अवकाळी पाऊस, गारपीट; राज्यात 51 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; पहा विभागनिहाय माहिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 23, 2026
0

कापूस धाग्याच्या मागणीत वाढ

युद्धाचा धामधुमीत संधी: चीनकडून कापूस धाग्याच्या मागणीत वाढ; भारतीय निर्यातदारांना दिलासा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 21, 2026
0

साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची 5 हजार कोटींची थकबाकी

साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची 5 हजार कोटींची थकबाकी; साखरेच्या किमान विक्री दरात वाढीची ‘इस्मा’ची मागणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 21, 2026
0

अवकाळीच्या तडाख्यातून निसर्गाने "हापूस"ला वाचवले!

अवकाळीच्या तडाख्यातून निसर्गाने “हापूस”ला वाचवले!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 20, 2026
0

हजार किलोमीटरचा पाऊसपट्टा

अरे देवा! हजार किलोमीटरचा पाऊसपट्टा; भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तानवर दुर्मीळ हवामान प्रणाली सक्रिय

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 20, 2026
0

उत्तर महाराष्ट्रावर अवकाळीचे ढग..

उत्तर महाराष्ट्रावर अवकाळीचे ढग..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 17, 2026
0

प्रादेशिक हवामान आढावा

उर्वरित महाराष्ट्र — प्रादेशिक हवामान आढावा (17-22 मार्च)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 17, 2026
0

नाशिकसह उत्तर महाराष्ट्राची उन्हाच्या आगीत होरपळ!

नाशिकसह उत्तर महाराष्ट्राची उन्हाच्या आगीत होरपळ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 16, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

कच्च्या तेलाचे भडकलेले दर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरणार सुवर्णसंधी

कच्च्या तेलाचे भडकलेले दर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरणार सुवर्णसंधी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 23, 2026
0

भारतीय शेतकऱ्यांना फटका

इराणी गॅस फील्डवर हल्ल्याचा भारतीय शेतकऱ्यांना फटका; खत संकट दारावर?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 23, 2026
0

अवकाळी पाऊस

अवकाळी पाऊस, गारपीट; राज्यात 51 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; पहा विभागनिहाय माहिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 23, 2026
0

कापूस धाग्याच्या मागणीत वाढ

युद्धाचा धामधुमीत संधी: चीनकडून कापूस धाग्याच्या मागणीत वाढ; भारतीय निर्यातदारांना दिलासा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 21, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish