• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

जगातील आघाडीच्या फळउत्पादक देशात कृषी माल संरक्षणासाठी पोलिसांचा पहारा

शेतकऱ्यांना द्यावा लागतोय गुन्हेगारी टोळ्यांना हफ्ता; परिणामी ग्राहकांवरच दरवाढीचा भुर्दंड

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2023
in यशोगाथा
0
जगातील आघाडीच्या फळउत्पादक देशात कृषी माल संरक्षणा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जगातील आघाडीच्या फळउत्पादक देशात कृषी माल संरक्षणासाठी पोलिसांना पहारा द्यावा लागतोय. तुम्हाला कदाचित हे वाचून आश्चर्याचा धक्का बसेल, पण हे 100% सत्य आहे. या प्रगत, विकसित देशात शेतकऱ्यांना गुन्हेगारी टोळ्यांना हफ्ता द्यावा लागतोय, परिणामी शेवटी ग्राहकांवरच दरवाढीचा भुर्दंड पडतोय. त्यामुळेच गेल्या वर्षभरात इथे फळे-भाज्या आणि कृषी जिन्नसांचे भाव दीड ते दोन पटीने वाढले आहेत.

हा देश आहे मेक्सिको. उत्तर अमेरिकेतील एक कृषिप्रधान देश. जगातील सर्वांत जास्त स्पॅनिशभाषक असलेला हा देश. मेक्सिकोला लॅटिन अमेरिकेचाच एक भाग समजले जाते. गुन्हेगारी आणि अंमली पदार्थ उत्पादन, तस्करीसाठी कुविख्यात असलेला हा देश.

 

 

ॲग्रोवर्ल्ड एक्स्पो (जळगाव, पिंपळगाव)

दरवर्षी 30 लाख टन लिंबू उत्पादन

मेक्सिकोमधील शेती आणि शेतकरी यांची स्थिती काही प्रांतात अतिशय भयावह झाली आहे. मेक्सिकोमध्ये गेल्या वर्षी काही फळांच्या किंमती 58% पेक्षा जास्त वाढल्या आहेत. सध्या लिंबू, संत्री याबाबत इथे अराजकतेची स्थिती आहे. मेक्सिकोत दरवर्षी अंदाजे 30 लाख मेट्रिक टन लिंबू उत्पादन होते.

 

आपल्याकडे टमाट्याच्या चोऱ्या व्हायच्या, तीच स्थिती…

मेक्सिको हा जगातील सर्वात मोठा फळ उत्पादक देश मानला जातो. या देशातील पाककलेवर लिंबू राज्य करतो. त्याचीच शेती आणि विक्री सध्या वांद्यात आहे. आपल्याकडे गेल्या महिन्यात टमाट्याच्या किंमती अचानक वाढून जशी स्थिती उद्भवली होती, चोऱ्या-माऱ्या होऊ लागल्या होत्या, तशीच काहीशी मेक्सिकोत सध्या स्थिती आहे. लिंबूबरोबरच टोमॅटो, केळी आणि आंबाही संकटात आहे. शेतकरी, उत्पादक तसेच वाहतूकदार आणि वितरक यांच्यावर संघटित गुन्हेगारीमुळे होत असलेल्या खंडणीच्या त्रासामुळे तिथे फळांच्या किमती वाढल्या आहेत.

 

पोलिसांचे एस्कॉर्ट : मेक्सिकोतील मिचोआकन या ड्रग कार्टेलने त्रस्त असलेला प्रदेशातील अपाटझिंगान-नुएवा इटालिया महामार्गाने देशातील उर्वरित भागात जाणार्‍या लिंबूच्या ट्रकना पोलिस व सिव्हिल गार्डचे सदस्य सशस्त्र पहाऱ्यात घेऊन जात आहेत.

 

गुन्हेगारी टोळ्यांकडून खंडणी वसुली

मेक्सिकोच्या अपात्झिंगन प्रांतात लिंबू आणि केळीचे प्रचंड उत्पादन होते. इथे शेतकरी, उत्पादक, कंपन्या पीक लागवड करण्यासाठी शेतीची मशागत करत असताना संघटित गुन्हेगारी टोळ्या त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यासाठी येतात. या त्रासाला कंटाळून अनेकांनी या भागातून काढता पाय घेतला असून कित्येक जमिनी पडीक आहेत.

 

पेरणी, विक्रीसाठीही द्यावी लागते खंडणी

सध्या मिचोआकान हा मेक्सिकोमधील सर्वात प्रभावित प्रदेश झाला आहे. कार्टेल जलिस्को नुएवा जेनेरासीओन (CJNG), लॉस व्हायग्रास आणि ला फॅमिलिया मिचोआकाना सारख्या गुन्हेगारी टोळ्यांचे या भागावर नियंत्रण आहे. कायदा-सुव्यवस्थेचे बारा वाजले आहेत. शेतकऱ्यांना पेरणी करतांना आणि पीक कापणीनंतर विकतानाही खंडणी द्यावी लागते..

 

जगात लिंबूचे सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या मेक्सिकोत दरवर्षी सुमारे 30 लाख टन इतके उत्पादन होते.

 

प्रत्येक किलोमागे 10 रुपये विक्रीची हफ्ता वसुली

अंमली पदार्थांच्या तस्करीव्यतिरिक्त इतर कोणत्याही शेती उत्पादनावर इथे गुन्हेगारी टोळ्या शेतकरी, उत्पादक आणि मध्यस्थांवर खंडणी लादतात, त्यांच्याकडून हफ्तावसुली करतात. त्यामुळे लाखो ग्राहकांच्या खिशाला फटका बसतो. शेतकरी, उत्पादक विकत असलेल्या प्रत्येक किलोसाठी अंदाजे सुमारे 0.12 अमेरिकी डॉलर्स वसुली करतात. भारतीय रुपयात ही किंमत 10 रुपयांच्या आसपास होते. या प्रदेशात दिवसाला सुमारे 900 टन लिंबाचे उत्पादन होते.

 

लिंबाला 375 रुपये किलो भाव

या सर्वांचा परिणाम म्हणूनच गेल्या वर्षी लिंबाच्या किमतीत 58.5% वाढ झाली आहे. मेक्सिको सिटीमध्ये, गेल्या महिन्यात चांगल्या लिंबू फळाची किंमत दुप्पट होऊन जवळपास साडेचार अमेरिकी डॉलर्स म्हणजे सुमारे 375 भारतीय रुपये प्रति किलो इतकी झाली होती.

 

लिंबू वाहतुकीला पोलिसांचे एस्कॉर्ट

मिचोआकन, कार्टेलने त्रस्त असलेला प्रदेश आहे. या परिस्थितीमुळे देशातील उर्वरित भागात जाणार्‍या लिंबू वाहतुकीला पोलिसांनी एस्कॉर्ट करण्यास सुरुवात केली आहे. “कोणत्याही अडथळा व लुटीशिवाय फळे गंतव्यस्थानी पोहोचातील, या उद्देशाने आम्ही इतर सुरक्षा दलांसह समन्वित पद्धतीने फळ उत्पादनाची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना सुरक्षा देत आहोत,” असे मिचोआकन प्रांताचे पोलीस प्रमुख जोस ओर्टेगा यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला सांगितले आहे.

खंडणी आणि चोरीमुळे देशातील कंपन्यांना दरवर्षी सुमारे 6.8 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा भुर्दंड बसतो. मेक्सिकोच्या जीडीपीच्या 0.67% इतकी ही रक्कम मोठी आहे.

 

मेक्सिकोच्या मिचोआकन राज्यातील अपाटझिंगन येथील लेमन मार्केटच्या प्रवेशद्वारावर नॅशनल गार्डचे सदस्य पहारा देत आहेत.

 

खंडणीस नकार देणाऱ्या शेतकरी, व्यापाऱ्यांच्या हत्या

चिल्पान्सिंगो सारख्या देशभरातील इतर शहरांमध्ये, यापूर्वी खंडणी देण्यास नकार देणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हत्या केल्या गेल्या होत्या. त्यानंतर अनेकांनी शेती, व्यवसायातून माघार घेतल्याने आता या प्रदेशात नागरिकांना अन्न उत्पादनांच्या टंचाईला मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे.

गुन्हेगारी टोळ्यांचा सामना करण्यासाठी शेतकरी, उत्पादकांनी 2013 मध्ये “हिपोलिटो मोरा”सारख्या स्वत:च्या स्व-संरक्षण गटांची स्थापना केली. नंतर या टोळ्याच गुन्हेगारीत सामील असल्याचा आरोप सातत्याने होत झाला.

 

स्व-संरक्षण गटांच्या प्रमुखाचीही हत्या

“हिपोलिटो मोरा”वर इतर काहीही आरोप होत असले तरी त्याने मादक पदार्थांच्या तस्करांचा तीव्र विरोध करणे सुरूच ठेवले होते. मात्र, जूनमध्ये ला रुआना, मिचोआकानमध्ये कार्टेलने त्याची हत्या केल्याने परिस्थिती पुन्हा बिघडली.

 

मोराची बहीण ग्वाडालुपे म्हणते, “आम्ही तिथे असलेल्या ड्रग कार्टेलमध्ये पूर्णतः भरडले जात आहोत. ते आमच्याकडून प्रत्येक गोष्टीसाठी शुल्क आकारत आहेत. बेसिक बास्केट, किराणा, शीतपेये, बिअर, चिकन सर्वच गोष्टींच्या खरेदी-विक्रीवर वसुली केली जाते. त्यांच्यामुळे सर्व काही खूप महाग होत आहे.”

 

Nirmal Seeds

 

शेतकरी, उत्पादकांनी स्वीकारलीय परिस्थिती

शेतकऱ्यांसाठी या परिस्थितीवर दुसरा कोणताही उपाय सध्या तरी दिसत नाही. अशा स्थितीत, मजूर व कामगारांना वाऱ्यावर सोडण्याऐवजी शेताचे मालक, उत्पादक हफ्ते, खंडणी देत ठामपणे इथे राहून परिस्थितीशी दोन हात करत राहतात.

मिचोआकानमधील वसुली, खंडणीच्या गुन्ह्याचा पाठपुरावा करणार्‍या युनिटचे प्रमुख अभियोक्ता रॉड्रिगो गोन्झालेझ यांनी नागरिकांना पुढे येऊन तक्रारी करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, हिपोलिटो मोरासारखीच हत्या होण्याची भीती असल्याने त्यांना फारसा प्रतिसाद लाभत नाही.

 

 

Ajit seeds

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • पंतप्रधान कृषी सिंचन योजना (PMKSY) : ऑनलाइन अर्ज कसा कराल?
  • कृषी सल्ला : कापूस पाते व बोंड गळ कशी रोखावी

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कृषी माल संरक्षणफळउत्पादकमेक्सिकोलिंबू वाहतुकशेतकरी
Previous Post

पंतप्रधान कृषी सिंचन योजना (PMKSY) : ऑनलाइन अर्ज कसा कराल?

Next Post

आता प्रत्येक तालुक्यात माती परीक्षण केंद्र; शेतकऱ्यांना 7 दिवसात मोबाईलवर मिळणार अहवाल

Next Post
आता प्रत्येक तालुक्यात माती परीक्षण केंद्र; शेतकऱ्यांना 7 दिवसात मोबाईलवर मिळणार अहवाल

आता प्रत्येक तालुक्यात माती परीक्षण केंद्र; शेतकऱ्यांना 7 दिवसात मोबाईलवर मिळणार अहवाल

ताज्या बातम्या

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish