मुंबई : PM Kisan Yojana… केंद्र सरकार शेतीसह शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक योजना राबवित असते. यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारने सुरु केली होती. या योजनेचा अनेक महत्त्वकांक्षी योजनांमध्ये समावेश आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. दरम्यान, या योजनेतील 14 व्या हफ्त्याचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या अटी पूर्ण कराव्याच लागतील अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत अटी ?…
पीएम किसान योजने (PM Kisan Yojana)चा 13 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. आता शेतकरी 14 व्या हफ्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. पीएम किसान योजने (PM Kisan Yojana)चा 14 वा हफ्ता हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. मात्र, तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटींची पूर्तता करावी लागणार आहे.
या आहेत अटी
शेतकऱ्यांना भूमी अभिलेख अद्यावत करणे, ई-केवायसी प्रमाणिकरण, बँक खाते आधार कार्ड सोबत संलग्न करणे, या तीन अटींची पूर्तता करावी लागणार आहे. तसेच या अटींची पूर्तता न केल्यास 14 वा हफ्ता मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी या अटी पूर्ण कराव्यात, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत शेतकऱ्यांचे आधार कार्ड संलग्न करण्याची मोहीम सुरु आहे. आणि तुम्हाला जर या अटींची पूर्तता करायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्राला (Customer Service Center) भेट देऊ शकता.