देशात सर्वत्र शेतीमध्ये यंत्रांचा वापर वाढत आहे. महाराष्ट्रातही मजूर समस्येमुळे शेतकरी यांत्रिकीकरणावर भर देत आहेत. अशात आता बाईकच्या किमतीत नांगरणी, खुरपणी करून देणारे ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या दिमतीला आले आहे. त्याची किंमत ऐकून तुम्हीही म्हणाल, चला लगेच घेऊन येऊ….!
नांगरणी आणि खुरपणी करून देणारे हे ट्रॅक्टर रस्त्यावरून जाताना दिमाखदार बुलेटचा फील देणार, आहे, तर शेतात मात्र छोट्या ट्रॅक्टरची सर्व कामे करणार आहे. हे यांत्रिक मॉडेल हरियाणात प्रमाणित करण्यात आले आहे.
हरियाणातील ट्रॅक्टर उत्पादक कंपनी, मॉडेलचे नाव सानेडो
हरियाणातील हिस्सार शहरात या ट्रॅक्टरची उत्पादक कंपनी असून या बुलेट ट्रॅक्टरच्या मॉडेलचे नाव आहे सानेडो! पंजाब-हरियाणात तसेच राजस्थान आणि गुजरातमध्येही असे छोटे ट्रॅक्टर, बुलेट ट्रॅक्टर, मॉडिफाईड यंत्रे अनेक वर्कशॉप बनवून देतात, शेतकरीही ते वापरतात. राजकोट आणि भावनगर शहरातही अशा अनेक कंपन्या आहेत. थोड्याबहुत फरकाने किंमत सारखीच असली तरी सानेडो हे असे पहिलेच प्रमाणित, मान्यताप्राप्त ट्रॅक्टर आहे.
छोट्या शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त
छोट्या शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असा हा यंत्राचा शोध आहे. सामान्य लाहान ट्रॅक्टरप्रमाणेच सानेडो काम करते आणि शेतकऱ्यांना बुलेटचा अनुभव देते. बुलेट, टेम्पो आणि ट्रॅक्टर असे मिश्र स्वरूप असलेले हे यंत्र आहे. शेतातील तण काढण्यासाठी गुजरातमध्ये यापूर्वीच असे यंत्र बनवण्यात आले आहे.
सामान्य ट्रॅक्टर करू शकणारे सर्व काम करते
शेतात आणि बागांमध्ये तण काढण्यासाठी बनवलेले सानेडो मध्यम आणि लहान शेतकऱ्यांना खूप उपयुक्त ठरेल. पॉवर बिडर श्रेणीमध्ये समाविष्ट असलेले सानेडो, सामान्य ट्रॅक्टर करू शकणारे सर्व काम करते. सानेडो तीनचाकी बुलेट ट्रॅक्टरमध्ये हायड्रोलिक सिस्टीमसह 5 फाळ नांगर जोडलेला आहे, ज्याद्वारे दोन पीक ओळींमधील तणांची नांगरणी करता येते. याशिवाय दोन्ही बेडवर मातीही टाकता येते.
पंतप्रधानांनी प्रशंसा करून दिला व्यावसायिक उत्पादनाचा मंत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कृषी प्रदर्शनात हा नवोन्मेष पाहिला आणि मोठ्या प्रमाणावर सामान्य शेतकऱ्यांसाठी उपयुक्त उत्पादन बनवण्याची सूचना केली. यानंतर, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने मशीन अपग्रेड करण्यासाठी आणि त्याची उपयुक्तता प्रमाणित करण्यासाठी उत्तर क्षेत्र फार्म मशीनरी ट्रेनिंग अँड टेस्टिंग इन्स्टिट्यूट (TTC) कडे हे बुलेट ट्रॅक्टर पाठवले. येथे चाचणी केल्यानंतर हे यंत्र शेतीच्या कामासाठी योग्य असल्याचे प्रमाणित करण्यात आले. गुजरातमध्ये तसेच इतर राज्यात अशीच चार चाकी अप्रमाणित बुलेट ट्रॅक्टर सर्रास बनविली व वापरली जातात.
पाच क्विंटलपर्यंत भार खेचू शकते
सानेडो रस्त्यावर पाच क्विंटलपर्यंत भार खेचू शकते. पाच क्विंटल वजनाच्या या यंत्राला सानेडो असे नाव टीटीसी
तज्ज्ञांनीच सुचविले. यात 10 हॉर्स पॉवरचे इंजिन आहे, जे प्रति तास 800 ग्रॅम डिझेल वापरते. सानेडो पाच फाळाचे कल्टिव्हेटर्स खेचू शकतात. याशिवाय तो रोटाव्हेटरही चालवू शकतो.
तीन तासांत एक एकर शेताची नांगरणी
तीनचाकी सानेडो तीन तासांत एक एकर शेत नांगरू शकते. बागायती पिकांमधील तण काढण्यासाठीही याचा उपयोग होतो. चाकाच्या उंचीचा विचार करता, ऊस पिकाच्या पहिल्या खुरपणीमध्ये ते खूप उपयुक्त ठरेल. पंजाब-हरियाणा आणि यूपी-बिहारमधील अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी हे यंत्र वरदान ठरत आहे.
10 हॉर्सपॉवर सानेडो बुलेट ट्रॅक्टरची किंमत फक्त सव्वा लाख रुपये
सध्या मार्केटमध्ये 20 हॉर्सपॉवर ट्रॅक्टरची किंमत साडेसहा लाखांपासून सुरू होते. पाच एकरांपेक्षा कमी जमीन असलेले शेतकरी ते मोठे, महागडे ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत. ओढाताण करून आवाक्याबाहेरचे मोठे ट्रॅक्टर घेतलेच तर तुलनेने कमी काम असल्यामुळे त्यांना नुकसान सहन करावे लागते. मात्र, 10 हॉर्सपॉवर सानेडो बुलेट ट्रॅक्टरची किंमत फक्त सव्वा लाख रुपये आहे, यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल.
बुलेट, टेम्पो आणि ट्रॅक्टरचे मिश्रण असलेले हे यंत्र अवघ्या 1.25 लाख रुपयांमध्ये तयार होऊ शकते आणि प्रति तास डिझेलचा वापरही 800 ग्रॅम आहे. शिवाय, हे मशीन हरियाणातील टीटीसीने प्रमाणित केले आहे.
पॉवर बिडर श्रेणीतील उच्च क्षमतेचे कृषी उपकरण
सानेडोने सर्व प्रकारच्या चाचण्या उत्तीर्ण केल्या आहेत. हे पॉवर बिडर श्रेणीचे कृषी उपकरण आहे, जे मुळात तण काढण्यासाठी डिझाइन केलेले आहे, परंतु त्याच्या उच्च क्षमतेमुळे, ते लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी सर्व प्रकारची कामे करू शकते. देशाच्या सध्याच्या कृषी परिस्थितीसाठी हे अत्यंत उपयुक्त यंत्र ठरेल.
– डॉ. मुकेश जैन
संचालक, उत्तरी क्षेत्र फार्म मशीनरी प्रशिक्षण और परीक्षण संस्थान (टीटीसी), हिस्सार, हरियाणा.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- कापसाला या बाजार समितीत मिळतोय असा भाव
- दसऱ्याला कृषी-औद्योगिक प्रदर्शन भरवण्याची राज्यातली सर्वात मोठ्या हिंगोलीतील दसरा मेळाव्याची परंपरा